Yuvraj Deshmukh PMC | युवराज देशमुख यांची मुख्य अभियंता पदी पदोन्नती!

Categories
Breaking News PMC पुणे

Yuvraj Deshmukh PMC | युवराज देशमुख यांची मुख्य अभियंता पदी पदोन्नती!

Yuvraj Deshmukh PMC | पुणे | महापालिकेच्या बांधकाम विभागात (PMC Building Devlopment Department) अधिक्षक अभियंता पदी काम करणारे युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh PMC) यांना मुख्य अभियंता पदी पदोन्नती (Chief Engineer Promotion) देण्यात आली आहे. देशमुख यांच्याकडे वाहतूक नियोजन विभागाची (PMC Traffic Management Department) जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे अधिक्षक अभियंता (भवन) आणि अधिक्षक अभियंता (बांधकाम) या पदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune News)
पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (Chief Engineer V G Kulkarni) हे सेवानिवृत्त होत आहेत. तसेच याआधी पीएमआरडीए (PMRDA)!कडे प्रतिनियुक्ती वर गेलेले विवेक खरवडकर आणि राजेंद्र राऊत हे देखील निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार अधिकाऱ्यांना या पदावर संधी मिळणार आहे. त्यानुसार या पदासाठी बढती समितीची बैठक (DPC) आयोजित करण्यात आली होती. समितीने शिफारस केल्यानुसार   मुख्य अभियंता पदासाठी दोन अधिकारी पात्र ठरत होते. यामध्ये अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) आणि युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) यांचा समावेश होता. सेवाज्येष्ठतेनुसार पावसकर यांना संधी देण्यात आली आहे. पावसकर यांना पथ विभागाची जबाबदारी देण्यात आली होती तर तर देशमुख हे वेटिंग लिस्ट वर होते. त्यानुसार देशमुख यांना पद रिक्त झाल्यानंतर पदोन्नती देण्यात आली आहे. देशमुख यांच्याकडे वाहतूक नियोजन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे अधिक्षक अभियंता (भवन) आणि अधिक्षक अभियंता (बांधकाम) या पदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.  (Pune Municipal Corporation News)

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : फौजदारी गुन्ह्याबाबत पदोन्नती समितीच निर्णय घेणार! | महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : फौजदारी गुन्ह्याबाबत पदोन्नती समितीच निर्णय घेणार!

|  महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

PMC Security Officer Promotion | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी (PMC Security Department) – (वर्ग-२) या पदाच्या एकूण संख्येच्या ७५% जागा कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 23 लोकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 13 पात्र तर 10 अपात्र ठरले आहेत. त्याची यादी महापालिका वेबसाईट (PMC Website) वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दरम्यान यात काही कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल असताना त्यांना पात्र केले, असा आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला कि सेवाभारती नियमावलीनुसार कर्मचाऱ्यांना पात्र करण्यात आले आहे. मात्र पदोन्नती समिती याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. समितीच या सर्व गोष्टीचा विचार करून निवड करणार आहे. (PMC Pune Employees promotion)
 सुरक्षा अधिकारी (वर्ग-२) या पदाकरिता सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांमधील तपशीलानुसार पात्र/अपात्र सेवकांची तयार करण्यात आलेली सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.  सेवाज्येष्ठता यादी पुणे महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावरील परिपत्रक प्रणालीवर (PMC Website Circular System) प्रसिध्द करण्यात आली आहे.  (PMC Security Department)
मात्र यातील काही सेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही त्यांना सेवाज्येष्ठता यादीत पात्र करण्यात आले. असा आक्षेप काही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करताना सेवाभारती नियमावलीचा आधार घेतला जातो. त्यात असे म्हटले आहे कि जे सद्यस्थितीत शिक्षा भोगत आहेत किंवा ज्यांची विभागीय चौकशी सुरु आहे, त्यांनाच अपात्र करता येते. फक्त गुन्हा दाखल आहे म्हणून त्यांना अपात्र करता येत नाही. त्यामुळे यादीत संबंधित लोकांना पात्र केले आहे. तरीही अंतिम निर्णय हा पदोन्नती समितीचा असतो. काही तक्रारी आल्या तर आम्ही त्या समिती समोर ठेवणार. समितीला वाटले संबंधित कर्मचारी दोषी आहे तर समिती कारवाई करू शकते. त्यामुळे अंतिम निवडीचा अधिकार हा पदोन्नती समितीचाच असणार आहे.

DPC | PMC Employees Promotion | प्रशासन अधिकारी, अधीक्षक सह विविध पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक!

Categories
Breaking News PMC पुणे

DPC | PMC Employees Promotion | प्रशासन अधिकारी, अधीक्षक सह विविध पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक!

DPC | PMC Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक (Superintendent) तसेच इतर पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक (DPC) आयोजित करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) देण्यात आली.
पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा आहे. मात्र उद्याच्या बैठकीत यातील प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदासाठीच पदोन्नती होणार आहे. उपअधिक्षक आणि वरिष्ठ लिपिक बाबत काही काळाने निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय या बैठकीत, मोटर वाहन विभागाकडील विविध पदे, क्षेत्रीय फिल्ड वर्कर आरोग्य विभागाकडील विविध पदे, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर,  नेटवर्क, हार्डवेअर) या पदांसाठी पदोन्नती होणार आहे. संगणक ऑपरेटर व संगणक प्रोग्रॅमर या पदावरून  कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर), कनिष्ठ अभियंता (नेटवर्किंग) पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

उद्याच्या पदोन्नती समिती बैठकीतील पदे

1.  उपअधीक्षक ते अधीक्षक
2. अधीक्षक ते प्रशासन अधिकारी
3. मोटर वाहन विभागाकडील विविध पदे
4.  क्षेत्रीय फिल्ड वर्कर आरोग्य विभागाकडील विविध पदे
5. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक
6. कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर, नेटवर्क, हार्डवेअर)
——-

PMC Employees Time Bound Promotion | कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Time Bound Promotion |  कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

| महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नती (Time Bound Promotion Proposal) महापालिका आयुक्त यांच्याकडून चांगला दिलासा देण्यात आला आहे. याबाबतचे सर्क्युलर महापालिका आयुक्तांनी जारी केले आहे. राज्य सरकारच्या अधीन राहून पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नसणार आहे. विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना हा चांगलाच दिलासा मानला जात आहे.
 (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला  वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees)

मात्र याबाबत महापालिका कामगार संघटनांनी नुकतीच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पदोन्नती बाबत प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले याबाबतचे सर्क्युलर देखील महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे कि, तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करताना पदोन्नती समितीची अंतिम मान्यता घेण्यात येत होती. मात्र आता सादर होणाऱ्या प्रस्तावना अंतिम मंजुरीचे अधिकारी संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे पदोन्नती चा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय याचा फायदा सेवानिवृत्त सेवकांना देखील होणार आहे. कारण यामुळे त्यांची प्रलंबित पेन्शन प्रकरणे लवकर मार्गी लागणार आहेत.
याबाबत पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे उदय भट, पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर तसेच महापालिका मागासवसर्गीय संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.
——
कर्मचाऱ्याच्या कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी झाले आहे. हा कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा आहे. याबाबत प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. मात्र आता तात्काळ प्रक्रिया सुरु करून पदोन्नती द्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन. 
——–
———
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Important news for employees There is no need to submit a proposal before the promotion committee for time-bound promotion! | Final approval authority to Head of Department

PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे पदोन्नतीने होणार सहायक आरोग्य अधिकारी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे पदोन्नतीने होणार सहायक आरोग्य अधिकारी

| महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव

PMC Pune Assistant Health Officer | (Author: Ganesh Mule) महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. त्यानुसार पदोन्नतीने (Promotion) हे पद भरले जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी राजेश दिघे (Rajesh Dighe) यांना सहायक आरोग्य अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबत बढती समितीच्या बैठकीत (pmc promotion committee) निर्णय घेण्यात आला. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समिती (Women and children welfare committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC pune assistant health officer)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ नुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या मंजूर पदांपैकी ३ पदे नामनिर्देशनाने/सरळसेवेने व ४ पदे वैद्यकिय अधिकारी / निवासी वैद्यकिय अधिकारी या संवर्गातून पदोन्नतीने भरणेची तरतुद करण्यात आलेली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या सुधारित आकृतीबंधानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी या संवर्गाची एकूण ७ पदे मंजूर करण्यात आलेली असून ५ पदे आरोग्य विभागाकरिता व २ पदे घनकचरा व्यवस्थापन विभागाकरिता मंजूर करण्यात आलेली आहेत. नामनिर्देशनाने / सरळसेवेने मंजूर करण्यात आलेल्या ३ पदांपैकी २ पदे यापुर्वी भरलेली असून सद्यस्थितीत १ पद रिक्त आहे. तसेच पदोन्नतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ पदांपैकी ३ पदे (तात्पुरत्या/ तदर्थ पदोन्नतीने) भरलेली असून सद्यस्थितीत १ पद रिक्त आहे. (Pmc Pune news)

यासाठी वैद्यकीय अधिकारी राजेश दिघे हे पात्र ठरत आहेत. त्यानुसार बढती समितीने दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्याला महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी महिला बाल कल्याण समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल. (Pune Municipal Corporation News)