PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : शारीरिक तपासणी नंतर 12 लोक पात्र  | पात्र, अपात्र सेवकांची यादी  प्रसिद्ध 

Categories
PMC पुणे

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : शारीरिक तपासणी नंतर 12 लोक पात्र

| पात्र, अपात्र सेवकांची यादी  प्रसिद्ध

PMC Security Officer Promotion | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी (PMC Security Department) – (वर्ग-२), सहायक सुरक्षा अधिकारी (वर्ग 3) या पदाच्या एकूण संख्येच्या ७५% जागा कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.  यासाठी 23 लोकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील पात्र उमेदवारांची शारीरिक तपासणी केली गेली. यामध्ये अंतिम पात्रतेत 12 उमेदवारांची निवड झाली आहे. महापालिका सामान्य प्रशासन विभागाने या सर्व पात्र आणि अपात्र सेवकांची यादी वेबसाईट वर प्रसिद्ध केली आहे.  (Pune Municipal Corporation (PMC)
पात्र, अपात्र सेवकांची यादी येथे पहा | PMC security officer promotion list
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी-(वर्ग-२)  या पदाकरिता पुणे महानगरपालिकेमधील कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यानुसार सुरक्षा अधिकारी  पदाकरिता सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तरतुदीनुसार सुरक्षा अधिकारी व सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदाकरिता शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार सुरक्षा अधिकारी व सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदाकरिता अर्ज केलेल्या सेवकांसाठी शारीरिक तपासणी, गुरुवार, 25 जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता जुना जी.बी. हॉल, ३ रा मजला, मुख्य मनपा भवन (Pune PMC Bhavan) येथे आयोजित केले होती. (Pune Municipal Corporation News)
सामान्य प्रशासन विभागाने अंतिम पात्र आणि अपात्र यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार 12 उमेदवार पात्र झाले आहेत. तर 11 उमेदवार अपात्र झाले आहेत. याची यादी प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सुरक्षा अधिकारी पदावर पदोन्नती झालेले कर्मचारी 
1. राकेश विटकर
2. आनंद केमसे
3. विश्वास माणगावकर
4. प्रविण गायकवाड
5. विशाल कदम
6. वृषाली गायकवाड
7.  बाप्पू साठे
8. मिलिंद घोडके
9. राजू ढाकणे
10. अविनाश गायगवळी
11. मधुकर कदम

12. गणेश मांजरे

—–

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : फौजदारी गुन्ह्याबाबत पदोन्नती समितीच निर्णय घेणार! | महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : फौजदारी गुन्ह्याबाबत पदोन्नती समितीच निर्णय घेणार!

|  महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

PMC Security Officer Promotion | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी (PMC Security Department) – (वर्ग-२) या पदाच्या एकूण संख्येच्या ७५% जागा कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 23 लोकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 13 पात्र तर 10 अपात्र ठरले आहेत. त्याची यादी महापालिका वेबसाईट (PMC Website) वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दरम्यान यात काही कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल असताना त्यांना पात्र केले, असा आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला कि सेवाभारती नियमावलीनुसार कर्मचाऱ्यांना पात्र करण्यात आले आहे. मात्र पदोन्नती समिती याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. समितीच या सर्व गोष्टीचा विचार करून निवड करणार आहे. (PMC Pune Employees promotion)
 सुरक्षा अधिकारी (वर्ग-२) या पदाकरिता सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांमधील तपशीलानुसार पात्र/अपात्र सेवकांची तयार करण्यात आलेली सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.  सेवाज्येष्ठता यादी पुणे महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावरील परिपत्रक प्रणालीवर (PMC Website Circular System) प्रसिध्द करण्यात आली आहे.  (PMC Security Department)
मात्र यातील काही सेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही त्यांना सेवाज्येष्ठता यादीत पात्र करण्यात आले. असा आक्षेप काही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करताना सेवाभारती नियमावलीचा आधार घेतला जातो. त्यात असे म्हटले आहे कि जे सद्यस्थितीत शिक्षा भोगत आहेत किंवा ज्यांची विभागीय चौकशी सुरु आहे, त्यांनाच अपात्र करता येते. फक्त गुन्हा दाखल आहे म्हणून त्यांना अपात्र करता येत नाही. त्यामुळे यादीत संबंधित लोकांना पात्र केले आहे. तरीही अंतिम निर्णय हा पदोन्नती समितीचा असतो. काही तक्रारी आल्या तर आम्ही त्या समिती समोर ठेवणार. समितीला वाटले संबंधित कर्मचारी दोषी आहे तर समिती कारवाई करू शकते. त्यामुळे अंतिम निवडीचा अधिकार हा पदोन्नती समितीचाच असणार आहे.

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नती साठीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नती साठीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

| अंतिम सेवाज्येष्ठता यादी शारीरिक तपासणी नंतर

PMC Security Officer Promotion | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी (PMC Security Department) – (वर्ग-२) या पदाच्या एकूण संख्येच्या ७५% जागा कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 23 लोकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 13 पात्र तर 10 अपात्र ठरले आहेत. त्याची यादी महापालिका वेबसाईट (PMC Website) वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. दरम्यान अंतिम सेवाज्येष्ठता यादी ही शारीरिक तपासणी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (PMC Pune Employees promotion)
 सुरक्षा अधिकारी (वर्ग-२) या पदाकरिता सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांमधील तपशीलानुसार पात्र/अपात्र सेवकांची तयार
करण्यात आलेली सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची सेवाज्येष्ठता यादी पुणे
महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावरील परिपत्रक प्रणालीवर (PMC Website Circular System) प्रसिध्द करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठता यादीतील सेवक/कर्मचारी यांनी स्वतःचे नांव, जात, जातीचा गट, शैक्षणिक पात्रता, जन्मदिनांक, नेमणूकीचे दिनांक इ. सर्व बाबींची पाहणी करुन आपल्या नावांसमोर स्वाक्षरी करावी. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (PMC Security Department)
पात्र/अपात्र सेवाज्येष्ठता यादीमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीबाबत काही आक्षेप/चुका असल्यास ७ दिवसाचे मुदतीत आपले आक्षेप लेखी स्वरुपात, कागदपत्रांच्या पुराव्यासहीत आस्थापना विभाग, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. त्यानुसार सदरच्या नोंदी घेवून व सदर पदाकरिता सुधारीत सेवाप्रवेश नियमामध्ये नमूद प्रमाणे उमेदवारांची शारिरीक तपासणीच्या अधीन राहून अंतिम पात्र सेवकांची सेवाजेष्ठता सूचीस मान्यता घेवून ती प्रसिध्द करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अंतिम पात्र सेवकांची सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्त्या सुचविण्यात आल्यास त्यांची दखल घेतली जाणार नाही व संबंधित सेवक/कर्मचारी यांचे शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राबाबत तक्रार आल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सेवक/कर्मचारी यांची नेमणूक कोणत्याही टप्प्यावर संपुष्टात आणणेबाबत आलाहीदा निर्णय घेण्यात येईल. असे आदेशात म्हटले आहे.