PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे पदोन्नतीने होणार सहायक आरोग्य अधिकारी

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे पदोन्नतीने होणार सहायक आरोग्य अधिकारी

| महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव

PMC Pune Assistant Health Officer | (Author: Ganesh Mule) महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. त्यानुसार पदोन्नतीने (Promotion) हे पद भरले जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी राजेश दिघे (Rajesh Dighe) यांना सहायक आरोग्य अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबत बढती समितीच्या बैठकीत (pmc promotion committee) निर्णय घेण्यात आला. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समिती (Women and children welfare committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC pune assistant health officer)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ नुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या मंजूर पदांपैकी ३ पदे नामनिर्देशनाने/सरळसेवेने व ४ पदे वैद्यकिय अधिकारी / निवासी वैद्यकिय अधिकारी या संवर्गातून पदोन्नतीने भरणेची तरतुद करण्यात आलेली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या सुधारित आकृतीबंधानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी या संवर्गाची एकूण ७ पदे मंजूर करण्यात आलेली असून ५ पदे आरोग्य विभागाकरिता व २ पदे घनकचरा व्यवस्थापन विभागाकरिता मंजूर करण्यात आलेली आहेत. नामनिर्देशनाने / सरळसेवेने मंजूर करण्यात आलेल्या ३ पदांपैकी २ पदे यापुर्वी भरलेली असून सद्यस्थितीत १ पद रिक्त आहे. तसेच पदोन्नतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ पदांपैकी ३ पदे (तात्पुरत्या/ तदर्थ पदोन्नतीने) भरलेली असून सद्यस्थितीत १ पद रिक्त आहे. (Pmc Pune news)

यासाठी वैद्यकीय अधिकारी राजेश दिघे हे पात्र ठरत आहेत. त्यानुसार बढती समितीने दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्याला महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी महिला बाल कल्याण समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल. (Pune Municipal Corporation News)