PMC Fireman Bharti  Results | फायरमन पदाचा अंतिम निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Fireman Bharti  Results | फायरमन पदाचा अंतिम निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात!

| अग्निशमन साहित्याची ओळख याबाबत पुनर्तपासणी केलेल्या सुधारित गुणांची यादी प्रसिद्ध

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत  घेण्यात आली. दरम्यान अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या काही हरकती असल्या तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही हरकती आल्या होत्या. याचे निरसन करून प्रशासनाकडून सुधारित गुणांची यादी मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध  केली आहे. दरम्यान आता निवड समितीच्या बैठकीत या सगळ्या प्रक्रिये बाबत चर्चा करून अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.  फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल प्रसिद्ध केला जाऊ शकतो.  अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन साहित्य ओळख बाबत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी 5 गुण होते. परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत काही हरकती असतील तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. (Pune Mahanagarpalika Bharti)
त्यानुसार काही उमेदवारांनी हरकती घेतल्या आहेत. यामध्ये गुण कमी मिळणे, उत्तर बरोबर असून कमी गुण मिळणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराला जास्त गुण देणे, अशा हरकतींचा समावेश होता. यामुळे प्रशासनाने सर्वच उत्तरपत्रिका पुन्हा एकदा तपासण्याचे आदेश दिले होते. ‘अग्निशमन साहित्याची ओळख’ यामधील उत्तरांबाबत आणि गुणांबाबत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्यात आलेली आहे. पुनर्तपासणीमध्ये बदल झालेल्या उमेदवारांच्या सुधारित गुणांचा तक्ता व संबंधित उत्तरपत्रिका मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली आहे. तसेच यापुढे याबाबत कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

: निवड समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध होणार अंतिम यादी

दरम्यान अंतिम निकालासाठी उमेदवारांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण आता या सगळ्या भरती प्रक्रिये बाबत निवड समितीची बैठक लावली जाणार आहे. या समितीत 8 ते 10 सदस्य असतात. आरक्षण आणि गुण प्रक्रियेवर समितीत चर्चा केली जाईल. त्यानंतर समितीच्या मान्यतेने अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. समितीची बैठक आगामी आठवड्यात होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली. 

PMC Pune Bharti Exam 2023 | पहिल्या सत्रात ७२% तर दुसऱ्या सत्रात ८०% उमेदवारांनी दिली परीक्षा! 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

PMC Pune Bharti Exam 2023 | पहिल्या सत्रात ७२% तर दुसऱ्या सत्रात ८०% उमेदवारांनी दिली परीक्षा!

PMC Pune Bharti Exam 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने ३२० पदासाठी भरती प्रक्रिया (PMC Recuitment) राबवण्यात येत आहे. त्यानुसार यातील ६ पदासाठी आज म्हणजे २२ जूनला परीक्षा (PMC Bharti exam) झाली. पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागपूर अशा ५ शहरात परीक्षा झाली.  पहिल्या सत्रात ७२% तर दुसऱ्या सत्रात ८०% उमेदवारांनी  परीक्षा दिली. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली.  (PMC Pune Bharti Exam 2023)

पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  ३२० पदांसाठी महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ पदांची परीक्षा ही २२ जून ला झाली.  तर काही पदांची परीक्षा ही २ जुलै ला होणार आहे. त्यानुसार आता  परीक्षा घेतली जात आहे.  या परीक्षा केंद्रावर महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेकडून ३७ परीक्षा केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते. ५ शहरात ७ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही परीक्षा घेतली. सकाळच्या सत्रात २३६३ उमेदवार होते. त्यापैकी १७१२ उमेदवारांनी म्हणजे ७२% उमेदवारांनी परीक्षा दिली.  तर दुपारच्या सत्रात ३४३३ उमेदवार होते. त्यापैकी २७७१ उमेदवारांनी म्हणजे ८०% उमेदवारांनी परीक्षा दिली.  (Pune Mahanagarpalika Bharati 2023)

प्रवेश न दिलेल्या उमेदवारांबाबत मनपाचा खुलासा 

उमेदवारांनी कॉल लेटर वर नमूद केलेल्या रिपोर्टिंग वेळेच्या किमान 15 मिनिटे आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. रिपोर्टिंगची वेळ सकाळी 07:30 , परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या एक तास आधी आहे कारण ही वेळ उमेदवारांना प्रवेश देणे, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे, कॉल लेटरवर स्वाक्षरी आणि शिक्का मारणे इ. परीक्षेपूर्वीच्या प्रक्रियेचा विचार करता, परीक्षा सुरू होण्यास उशीर न करता सर्व पूर्वपरीक्षेच्या क्रिया पूर्ण करण्यासाठी गेट बंद करण्याची वेळ (परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 15 मिनिटे) पाळली जाते. त्यामुळे, गेट बंद झाल्यानंतर येणार्‍या उमेदवारांना परीक्षेसाठी परवानगी नाही. तरीही ८:१५ पर्यंत येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला गेला.


News Title |PMC Pune Bharti Exam 2023 | 72% in the first session and 80% in the second session!