Finally, the PMC officers in the engineering cadre have been promoted to the post of Superintending Engineer (Civil)!

Categories
PMC पुणे

  Finally, the PMC officers in the engineering cadre have been promoted to the post of Superintending Engineer (Civil)!

 |  PMC Commissioner’s orders issued

 PMC Officers Promotion |  Pune |  The promotion of some officers in the Pune Municipal Corporation (PMC) engineering cadre (PMC Officers Promotion) was stalled. Even after completing all the procedures, orders were not issued regarding the establishment of posts. The Karbhari also raised the issue.  The Municipal Commissioner has promoted these officers to the post of Superintendent Engineer (Construction).Orders in this regard have been issued recently.(Pune PMC News)
 6 Executive Engineers (Civil) in the Engineering category were eligible for promotion on the basis of seniority.  Accordingly, the promotion committee recommended him for promotion to the post of Superintending Engineer.  It was also approved by the City Reform and General Assembly.  However, these officers were not given orders regarding promotion and appointment.  Despite repeated demands, the administration could not wake up.  Finally, after facing criticism, Municipal Commissioner Vikram Kumar has issued orders in this regard.  (Pune Municipal Corporation Latest News)
 As per the order of the Municipal Commissioner, Amar Shinde PMC has been promoted in his old i.e. Path Department.  Shridhar Yevlekar (PMC) has been given the construction department.  He was earlier in the Department of Sewage, Maintenance and Repairs.  Dinkar Gojare (Dinkar Gojare PMC) has been given the Department of Sewage, Maintenance and Repair.  It was earlier in the path section.  Abhijit Dombe PMC has been promoted to Project Office 1.  Dombey was in the path section.  Shrikant Vaydande (PMC) has been given the water supply department.  He was previously in the construction department.  Rajesh Bankar (Rajesh Bankar PMC) has been given the construction department.  He was earlier in the water supply department.

PMC Officers Promotion | अखेर अभियांत्रिकी संवर्गातील अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) पदी पदोन्नती! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Officers Promotion | अखेर अभियांत्रिकी संवर्गातील अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) पदी पदोन्नती!

| महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

PMC Officers Promotion | पुणे | महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) अभियांत्रिकी संवर्गातील (PMC Engineering Cadre) काही अधिकाऱ्यांची पदोन्नती (PMC Officers Promotion) रखडली होती. सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन देऊन देखील पद स्थापनेबाबत आदेश दिले जात नव्हते. याबाबत The Karbhari ने देखील विषय लावून धरला होता. अखेर महापालिका आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) या पदावर बढती दिली आहे. नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
Also Read this News | हक्काची पदोन्नती उशिरा मिळते; आणि मिळाली तर वरिष्ठाकडून आदेश द्यायला वेळ लावला जातो
अभियांत्रिकी वर्गातील 6 कार्यकारी अभियंता (स्थापत्य)  हे सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती साठी पात्र होते. त्यानुसार त्यांना अधिक्षक अभियंता पदावर पदोन्नती देण्यासाठी पदोन्नती समितीने शिफारस केली होती. तसेच शहर सुधारणा आणि मुख्य सभेने देखील मान्यता दिली होती. तरीही या अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि पद स्थापने बाबत आदेश दिले जात नव्हते. वारंवार मागणी करूनही प्रशासनाला जाग येत नव्हती. अखेर टीका सहन करावी लागल्यानंतर  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation Latest News)
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अमर शिंदे (Amar Shinde PMC) यांना त्यांच्या जुन्या म्हणजे पथ विभागातच पदोन्नती देण्यात आली आहे. श्रीधर येवलेकर (Shridhar Yevlekar PMC) यांना बांधकाम विभाग देण्यात आला आहे. ते याआधी मलनिःस्सारण, देखभाल व दुरुस्ती विभागात होते. दिनकर गोजारे (Dinkar Gojare PMC) यांना मलनिःस्सारण, देखभाल व दुरुस्ती विभाग देण्यात आला आहे. ते आधी पथ विभागात होते. अभिजित डोंबे (Abhijit Dombe PMC) यांना प्रकल्प कार्यालय 1 मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. डोंबे हे पथ विभागात होते. श्रीकांत वायदंडे (Shrikant Vaydande PMC) यांना पाणीपुरवठा विभाग देण्यात आला आहे. ते पूर्वी बांधकाम विभागात होते. राजेश बनकर (Rajesh Bankar PMC)  यांना बांधकाम विभाग देण्यात आला आहे. ते पूर्वी पाणीपुरवठा विभागात होते.
the karbhari - pmc superintendent promotion
अधीक्षक अभियंता पदावर बढती दिल्या बाबतचे आयुक्तांचे आदेश

PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ पदावर प्रतीक्षा यादीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती करावी | रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ पदावर प्रतीक्षा यादीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती करावी |  रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

PMC Chief Labour Officer | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य कामगार अधिकारी पदावरील अधिकारी अरुण खिलारी हे 31 ऑक्टोबर रोजी वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेले आहेत. या अधिकाऱ्याची नियुक्ती पदोन्नतीने सेवाजेष्ठता नुसार पदोन्नती निवड समितीने मार्फत डि.पी.सी (DPC) होऊन झालेली आहे. यावेळी प्रतीक्षा यादीवरती जे उमेदवार निवड झालेले असतील, त्या निवडलेल्या अधिकाऱ्याची  मुख्य कामगार अधिकारी पदी नियुक्ती करावी. अशी मागणी पर्यावरण व्यवस्थापक रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. (PMC Pune News)
शेलार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवाचे वर्गीकरण) नियम २०१४ यामध्ये कामगार विभाग हा प्रशासकिय सेवा या विभगात दर्शविला असून मुख्य कामगार अधिकारी (सल्लागार कामगारया पदासाठी पदोन्नती व प्रतिनियुक्ती नमूद केलेली आहे. माझी नियुक्ती सरळ सेवेने अभियांत्रिकी सर्वगातून मुख्य सुरक्षा अधिकारी (वर्ग १) पदी सन २००९ रोजी झालेली असून प्रतिनियुक्ती नेमणूक पद्धती नुसार मला मुख्य कामगार अधिकारी काम करणेची संधी मिळणेस विनंती आहे. सामान्य प्रशासन विभागकडे मी अर्ज करून कार्यकारी पदी काम करणेसाठी विनंती केलेली आहे. त्यानुसार विचार केला जावा. असे शेलार यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation Marathi News)
याआधी देखील शेलार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.  पुणे महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) सेवानिवृत्त (Retire) झाले आहेत. हे पद पदोन्नती (Promotion) ने भरले जाणार आहे. कामगार अधिकारी नितीन केंजळे (Labour Officer Nitin Kenjale) यांची पदोन्नती समितीने शिफारस देखील केली आहे. मात्र या पदासाठी आपण पात्र आहोत, असा दावा पर्यावरण व्यवस्थापक रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी केला आहे. शिवाय या पदावर काम करण्याची संधी देण्याची मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Pune Municipal Corporation)
 रमेश शेलार यांनी पत्रात म्हटले होते कि, माझी अभियांत्रिकी विभगाकडून सन २००९ मध्ये सरळसेवेने मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी पदासाठी एल.एल.बी पदविका धारकास प्राधान्य अशी अट होती. त्यानुसार माझी निवड झाली. मी या पदाचा कार्यभार पाहत होतो. आता हे पद एकाकी आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि  मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव तसेच मुख्य अभियंता या पैकी कुठलेही पदावर काम करण्याची संधी मला देण्यात यावी. (PMC Labour Welfare Department)
दरम्यान पदोन्नती समितीने मुख्य कामगार पदासाठी कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची शिफारस केली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवला आहे. मात्र याला अजून मान्यता दिलेली नाही. अशातच आता या पदासाठी रमेश शेलार यांनी दावा केला आहे. तसेच आता शेलार यांनी प्रतीक्षा यादीचा मुद्दा पुढे आणला आहे. तसेच शेलार यांनी अतिरिक्त आयुक्त पदावर देखील दावा केला आहे. त्यावर आता प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. (Ramesh Shelar News)

——-

 PMC Officers Promotion | General Body Meeting | मुख्य अभियंता पदावर बढती देण्यात मुख्य सभेची मंजूरी

Categories
Breaking News PMC पुणे

 PMC Officers Promotion | General Body Meeting | मुख्य अभियंता पदावर बढती देण्यास मुख्य सभेची मंजूरी |

PMC Officers Promotion | General body Meeting | मुख्य अभियंता पदावर पात्र अधिकाऱ्याला बढती देण्यास मुख्य सभेने नुकतीच मंजूरी दिली. मात्र मुख्य कामगार अधिकारी पदावर बढती देण्याचा प्रस्ताव विधी समितीत होऊ शकला नाही. समिती तहकूब करण्यात आली. आता पुढील सभेत या प्रस्तावाबाबत चर्चा होईल.
पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (Chief Engineer V G Kulkarni) आणि मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (Chief Labour Officer Arun Khilari) हे सेवानिवृत्त होत आहेत. तसेच याआधी पीएमआरडीए (PMRDA)!कडे प्रतिनियुक्ती वर गेलेले विवेक खरवडकर हे देखील निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या जागा रिक्त होणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार अधिकाऱ्यांना या पदावर संधी मिळणार आहे. त्यानुसार या पदासाठी बढती समितीची बैठक (DPC) आयोजित करण्यात आली होती. समितीने शिफारस करून याबाबतचे प्रस्ताव शहर सुधारणा समिती आणि विधी समितीच्या माध्यमातून मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवले होते.(PMC Pune)
 मुख्य अभियंता पदासाठी दोन अधिकारी पात्र ठरत होते. यामध्ये अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) आणि युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) यांचा समावेश होता. सेवाज्येष्ठतेनुसार पावसकर यांना संधी देण्यात आली आहे. तर देशमुख हे वेटिंग लिस्ट वर असतील. मुख्य कामगार अधिकारी पदासाठी कामगार अधिकारी नितीन केंजळे पात्र ठरत होते. त्यानुसार त्यांना संधी देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation News)
बढती समितीची शिफारस आल्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ हे प्रस्ताव शहर सुधारणा समिती व विधी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवण्यात आले होते. मात्र मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता (विद्युत) याच पदावर बढती देण्यास सभेने मंजूरी दिली. इतर विधी समिती तहकूब झाल्याने मुख्य कामगार अधिकारी पदाचा प्रस्ताव मान्य होऊ शकाल नाही. यावर आता पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. (Pune Municipal Corporation General Body)
——-

DPC | PMC Officers Promotion | मुख्य अभियंता, मुख्य कामगार अधिकारी पदासाठीची बढती समितीची ची बैठक संपन्न

Categories
Breaking News PMC पुणे

DPC | PMC Officers Promotion | मुख्य अभियंता, मुख्य कामगार अधिकारी पदासाठीची बढती समितीची ची बैठक संपन्न

| अधिक्षक आणि कार्यकारी अभियंता पदासाठी देखील झाली बैठक

DPC | PMC Officers Promotion | पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (Chief Engineer V G Kulkarni) आणि मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (Chief Labour Officer Arun Khilari) हे सेवानिवृत्त होत आहेत. तसेच याआधी पीएमआरडीए (PMRDA)!कडे प्रतिनियुक्ती वर गेलेले विवेक खरवडकर हे देखील निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या जागा रिक्त होणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार अधिकाऱ्यांना या पदावर संधी मिळणार आहे. त्यानुसार या पदासाठी काल बढती समितीची बैठक (DPC) आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या बैठका पार पडल्या (PMC Pune)
सामान्य प्रशासन विभागाच्या (PMC General Administration Department) माहितीनुसार मुख्य अभियंता पदासाठी दोन अधिकारी पात्र ठरत होते. यामध्ये अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) आणि युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) यांचा समावेश होता. सेवाज्येष्ठतेनुसार पावसकर यांना संधी देण्यात आली आहे. तर देशमुख हे वेटिंग लिस्ट वर असतील. मुख्य कामगार अधिकारी पदासाठी कामगार अधिकारी नितीन केंजळे पात्र ठरत होते. त्यानुसार त्यांना संधी देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation News)
या पदाशिवाय अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत) या पदांसाठी देखील बैठक झाली. यामध्ये प्रत्येकी 5-6 अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यानुसार लवकरच या अधिकाऱ्यांच्या ऑर्डर काढल्या जातील. असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.
——-