FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल!

Categories
Breaking News PMC social पुणे

FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल!

FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse |  पुणे | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे (PMC HOD of Water Supply Department) प्रमुख तथा मुख्य अभियंता (PMC Chief Engineer) यांना शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या (PMC Engineers Association) निषेधानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात (Chatushrungi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बळ मिळाले आहे.  (Pune Municipal Corporation Latest News)

 पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार धंगेकर यांच्याविरुद्ध कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोखलेनगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दरम्यान, संबंधित कार्यक्रमास कॉंग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून आमदार धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

दरम्यान, महापालिकेच्या अभियंता संघाने याप्रकरणी सोमवारी सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे गाठून धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.