PMC Water Supply Department | खैरेवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली व्यवस्था 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Supply Department | खैरेवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली व्यवस्था

No Water No Vote – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या खैरेवाडी परिसरात नागरिकांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती. या त्रासाला कंटाळून नागरिकानी ‘नो वॉटर नो वोट’ अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. याबाबत जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी  गंभीरपणे लक्ष देत पुणे महापालिका आयुक्तांना (Pune Municipal Corporation Commissioner) यात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. (PMC Water Supply Department)
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील खैरेवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत बॅनर लावले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले होते. लोकांना मतदानावर बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोकांना पाणी द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले होते. (Loksabha Election Voting)
याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सांगितले कि, विद्यापीठ परिसरात  24*7 योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. ही टाकी कार्यान्वित करून त्याला खैरेवाडी भाग जोडून दिला आहे. त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जगताप यांनी सांगितले कि  गणेशखिंड परिसरात रस्त्याचे काम चालू असल्याने बरीच पेंडिंग कामे होती. त्यामुळे पाणी मिळण्यास उशीर होत होता. मात्र आता जवळपास 5 हजार लोकांची पाण्याची समस्या सुटली आहे.

PMC Water Tanker | टँकर चालकांनी पैसे मागितल्यास पुणे महापालिकेकडे तक्रार करा | महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Tanker | टँकर चालकांनी पैसे मागितल्यास पुणे महापालिकेकडे तक्रार करा

| महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

PMC Water Tanker- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमधील (Pune Municipal Corporation (PMC) नवीन समाविष्ट गावांमध्ये तसेच, जुन्या हद्दीतील ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत टँकर दिले जातात. हे टँकर पूर्णपणे मोफत दिले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. तथापि,  नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार संबंधित टँकर चालक किंवा ड्रायव्हर सदर टँकरकरिता पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. (PMC Water Supply Department)

त्यामुळे महापालिकेने नागरिकांना असे आवाहन केले आहे की, अशा प्रकरणी टँकर चालक, ड्रायव्हर किंवा तदनुषंगिक अन्य व्यक्तीस पैसे देण्यात येवू नयेत. कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केल्यास सदर टँकर क्रमांक, संबंधित व्यक्तीचे नाव, तक्रारदाराचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह पुणे महानगरपालिकेचा टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ व व्हॉट्सॲप
मोबाईल क्रमांक ८८८८२५१००१ वर तक्रार करण्यात यावी किंवा PMC CARE App डाउनलोड करुन त्यावर फोटो आणि पुराव्यासह तक्रार नोंदवावी.  तक्रारीची पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत तात्काळ दखल घेण्यात येईल. असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!

 

FIR on Ravindra Dhangekar PMC Chief Engineer Abuse | Pune | Abusing the PMC HOD of Water Supply Department and the Chief Engineer of Pune Municipal Corporation has done well to MLA Ravindra Dhangekar. A case has been registered against Dhangekar at Chatushrungi Police Station on Monday night after the protest of PMC Engineers Association. (Pune Municipal Corporation Latest News)

PMC Chief Engineer Nandkishore Jagtap, Head of Water Supply Department of Pune Municipal Corporation, has filed a complaint in this matter. Based on that, a case has been registered against MLA Dhangekar under section 353 for obstructing the government work and for abusing him. The Municipal Corporation organized a program on the Republic Day to inaugurate the water tank constructed by the Municipal Corporation at Ashanagar in Gokhalenagar area.

Meanwhile, MLA Dhangekar had threatened Nandkishore Jagtap, the head of water supply department of the Municipal Corporation, by abusing him in Aravachy language, accusing the Congress party of dropping the relevant program. His video went viral on social media.

Meanwhile, the Municipal Corporation’s Engineer’s Association held a meeting on Monday and protested against Dhangekar’s action. After that, the officials reached the Chatushringi police station and registered a case against Dhangekar.

FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल!

Categories
Breaking News PMC social पुणे

FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल!

FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse |  पुणे | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे (PMC HOD of Water Supply Department) प्रमुख तथा मुख्य अभियंता (PMC Chief Engineer) यांना शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या (PMC Engineers Association) निषेधानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात (Chatushrungi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बळ मिळाले आहे.  (Pune Municipal Corporation Latest News)

 पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार धंगेकर यांच्याविरुद्ध कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोखलेनगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दरम्यान, संबंधित कार्यक्रमास कॉंग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून आमदार धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

दरम्यान, महापालिकेच्या अभियंता संघाने याप्रकरणी सोमवारी सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे गाठून धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Pune Water Cut | शहरातील 5 प्रभागात 8 ते 22 जानेवारी दरम्यान फक्त एक वेळ पाणीपुरवठा! 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut | शहरातील 5 प्रभागात 8 ते 22 जानेवारी दरम्यान फक्त एक वेळ पाणीपुरवठा!

 

Pune Water Cut | पर्वती येथील MLR टाकी वरून अस्तित्वातील ९०० मि.मी. व्यासाच्या मोठ्या प्रमाणात लिकेज Prestres Line वरून खालील ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पर्वती MLR टाकी ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या १४७३ मि.मी. व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे. सदर लाईनच्या जोडणीची कामे सोमवार दिनांक ०८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहेत. यासाठी काही भागातील पाणीपुरवठा ८०० मि.मी. व्यासाच्या पर्यायी लाईन मधून एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. एकूण 5 प्रभागात 1 वेळ पाणी मिळणार आहे. परिसरामध्ये सोमवार ०८ पासून ते २२ जानेवारी अखेर पाणीपुरवठा एक वेळ व कमी दाबाने होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)

पर्यायी लाईन मधून एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणारा भाग:-

प्र. क्र. १८ – स्वारगेट पोलीस लाईन, झगडेवाडी खडकमाळ आळी, घोरपडी पेठचा संपूर्ण परिसर, मोमिनपुरा पूर्ण, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत, इत्यादी भाग.
प्र. क्र. १९ – लोहिया नगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रोड, पूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, टिंबर मार्केट, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भाग
प्र.क्र. २०- भगवान दास चाळ, वायमेकर चाळ न्यु नानापेठ परिसर, राजेवाडी, पत्राचाळ SRA, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी इत्यादी भाग
प्र. क्र. २८ – मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, C.P.W.D. Quarter, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रोड एस. टी. स्टॅन्ड ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी,
प्र. क्र. २९ – लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी इत्यादी भाग

PMC Water Supply Department | पुणेकरांनो तयार राहा  | आता पाणीपट्टी थकीत ठेवल्यास दरमहा 1% व्याज! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Supply Department | पुणेकरांनो तयार राहा  | आता पाणीपट्टी थकीत ठेवल्यास दरमहा 1% व्याज!

| महापालिका पाणीपुरवठा विभागाचा निर्णय

PMC Water Supply Department | पुणेकरांना आता अजून एका व्याजासाठी तयार राहावे लागणार आहे. मिळकत करानंतर (Property tax) आता पाणीपट्टी (Water Bill) थकीत ठेवल्यास व्याज भरावे लागणार आहे. त्याची सुरुवात 1 एप्रिल पासून करण्यात येणार आहे. दरम्यान 31 जानेवारी पर्यंतची थकबाकी भरण्यासाठी 60 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

पुणे मनपाच्या (PMC Pune) जाहीर आवाहनानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यावसायिक व काही निवासी ग्राहकांना यापूर्वीपासून मीटरद्वारे बिलाची आकारणी होत आहे. तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांमधील सर्व ग्राहकांना पाण्याच्या वापरानुसार मीटरद्वारे बिल आकारणी करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याच्या थकित बिलावर कोणतीही व्याजाची आकारणी करण्यात येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर बिलाच्या रकमेची थकबाकी वाढत असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. (Pune PMC News)

यास्तव मीटर बिलाच्या दिनांकापासून ६० दिवसांत बिल न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे प्रकरण आठ, कराधान नियम यातील नियम ४१ नुसार थकबाकी रकमेवर प्रतिमहा १% दराने दंडात्मक व्याज आकारण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे.  निर्णय हा नव्याने घेण्यात आला असल्याने दिनांक ३१ जानेवारी 2025 रोजीची थकबाकी भरणेस दिनांक ३१ मार्च अखेर ६० दिवसांची मुदत देण्यात येत आहे. 1 एप्रिल पासून थकबाकी रकमेवर व त्यानंतरच्या कोणत्याही थकित रकमेवर १% प्रतिमहा दंडात्मक व्याज आकारण्यात येणार आहे याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी. असे आवाहनात म्हटले आहे.
मीटरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व ग्राहकांना बिले पुणे मनपाकडून देण्याची व्यवस्था केली आहे. तथापि, ग्राहकांना बिले न मिळाल्यास त्यांचे 31 जानेवारी 2024 पर्यंतचे पाण्याचे मीटर बिल लष्कर पाणीपुरवठा विभाग/स्वारगेट पाणीपुरवठा विभाग/एसएनडीटी-चतुश्रुंगी पाणीपुरवठा विभाग येथून प्राप्त करुन घ्यावे व 31 मार्च पूर्वी थकबाकी रकमेचा भरणा करावा. असे आवाहन जगताप यांनी केले आहे.