PMC Water Supply Department | पुणेकरांनो तयार राहा  | आता पाणीपट्टी थकीत ठेवल्यास दरमहा 1% व्याज! 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Water Supply Department | पुणेकरांनो तयार राहा  | आता पाणीपट्टी थकीत ठेवल्यास दरमहा 1% व्याज!

| महापालिका पाणीपुरवठा विभागाचा निर्णय

PMC Water Supply Department | पुणेकरांना आता अजून एका व्याजासाठी तयार राहावे लागणार आहे. मिळकत करानंतर (Property tax) आता पाणीपट्टी (Water Bill) थकीत ठेवल्यास व्याज भरावे लागणार आहे. त्याची सुरुवात 1 एप्रिल पासून करण्यात येणार आहे. दरम्यान 31 जानेवारी पर्यंतची थकबाकी भरण्यासाठी 60 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

पुणे मनपाच्या (PMC Pune) जाहीर आवाहनानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यावसायिक व काही निवासी ग्राहकांना यापूर्वीपासून मीटरद्वारे बिलाची आकारणी होत आहे. तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांमधील सर्व ग्राहकांना पाण्याच्या वापरानुसार मीटरद्वारे बिल आकारणी करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याच्या थकित बिलावर कोणतीही व्याजाची आकारणी करण्यात येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर बिलाच्या रकमेची थकबाकी वाढत असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. (Pune PMC News)

यास्तव मीटर बिलाच्या दिनांकापासून ६० दिवसांत बिल न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे प्रकरण आठ, कराधान नियम यातील नियम ४१ नुसार थकबाकी रकमेवर प्रतिमहा १% दराने दंडात्मक व्याज आकारण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे.  निर्णय हा नव्याने घेण्यात आला असल्याने दिनांक ३१ जानेवारी 2025 रोजीची थकबाकी भरणेस दिनांक ३१ मार्च अखेर ६० दिवसांची मुदत देण्यात येत आहे. 1 एप्रिल पासून थकबाकी रकमेवर व त्यानंतरच्या कोणत्याही थकित रकमेवर १% प्रतिमहा दंडात्मक व्याज आकारण्यात येणार आहे याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी. असे आवाहनात म्हटले आहे.
मीटरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व ग्राहकांना बिले पुणे मनपाकडून देण्याची व्यवस्था केली आहे. तथापि, ग्राहकांना बिले न मिळाल्यास त्यांचे 31 जानेवारी 2024 पर्यंतचे पाण्याचे मीटर बिल लष्कर पाणीपुरवठा विभाग/स्वारगेट पाणीपुरवठा विभाग/एसएनडीटी-चतुश्रुंगी पाणीपुरवठा विभाग येथून प्राप्त करुन घ्यावे व 31 मार्च पूर्वी थकबाकी रकमेचा भरणा करावा. असे आवाहन जगताप यांनी केले आहे.