PBP Paris Competition | नाशिकच्या विभव शिंदेचे पॅरिस-ब्रेस्ट- पॅरिस (पीबीपी) स्पर्धेत अभुतपूर्व यश!

Categories
Breaking News social Sport देश/विदेश महाराष्ट्र
Spread the love

PBP Paris Competition | नाशिकच्या विभव शिंदेचे पॅरिस-ब्रेस्ट- पॅरिस (पीबीपी) स्पर्धेत अभुतपूर्व यश!

 PBP Paris Competition |    पॅरिस-ब्रेस्ट- पॅरिस (PBP) ही जागतिक स्तरावर सायकल क्षेत्रातील बहुमानांकित,नामांकित व प्रतिष्ठित अशी स्पर्धा आहे.या स्पर्धेला सायक्लिंगचा वर्ल्डकप समजला जातो. ऑडॅक्स क्लब पॅरिसियन आयोजित 1891 पासून दर चार वर्षांनी सत्ताविसाव्या वेळी फ्रान्समधील पॅरिस येथे 20 ते 24 ऑगस्ट 2023 पर्यंत जागतिक पातळीवर पार पडलेल्या पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस (PBP) -2023, रॅन्डोनिअर ह्या स्वयं-आधारित 1220 कि. मी. ब्रेव्हेट व्यावसायिक स्पर्धैत जगभरातील एकूण 8000 स्पर्धकांपैकी नाशिकचा अल्ट्रा- सायकलपटू विभव शिंदे  (Cyclist Vibhav Shinde) याने निर्धारित 90 तासापेक्षा केवळ 67 तास 51 मि. व 6 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. (PBP Paris Competition)
    या सतत चार दिवस चाललेल्या जीवघेण्या बाॅन प्रवास मोहिमेत विभव ने भारतात चौथा तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवून स्वत:चे भारतात आगळेवेगळे स्थान प्राप्त करून भारताचा तिरंगा पॅरिस येथे फडकावला.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ विश्वनाथ शिंदे यांचा विभव चिरंजीव आहे.तो बेंगलोरच्या CISCO  मध्ये इंटरनेट कन्सल्टंट असून तो आयर्नमॅन, अल्ट्रा- सायक्लिस्ट म्हणून ओळखला जातो.
     ह्या स्पर्धेसाठी विभव दररोज सातत्याने  सराव करीत होता. डायटमधील आवश्यक प्रोटीन व न्यट्रियंट्स कडेही तो बारकाईने लक्ष ठेवून होता.अशाप्रकारच्या स्पर्धेत मानसिक व शारीरिक सहनशक्ती बरोबरच (Endurance) दृश्यमान ज्ञान, (Visualization),प्रतिमा,स्वयंप्रेरणा, इच्छाशक्ती, दिर्घकालीन ध्येय आणि सातत्य महत्वाचे असते असे तो हमखास सांगतो. त्याच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे एक गंमत होती. एक चार दिवसाचा बाॅन व्हाॅयेज होता. त्याच्यासाठी जापनीज बुध्दिष्ठ लोक दरवर्षी ऑगस्ट मध्ये मृत्यमाणसासाठी सन्मान म्हणून आनंदोत्सव (बाॅन व्हाॅयेज) साजरा करतात. अगदी त्याप्रमाणेच ही स्पर्धा विभवला वाटली असे मत त्याने स्पर्धा संपल्यानंतर व्यक्त केले.’If wishes were horses then beggars would ride’. अर्थात, हरणाला मारण्यासाठी सिंहाला पुरूषार्थ करावाच लागतो. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण प्रवेश करत नाही’ असे विभव जोर देऊन म्हणाला.
     कोणतेही यश व्यक्तीच्या पाठीमागे असलेल्या सामूहिक शक्तीमुळे येत असते हे आवर्जून उल्लेख करताना नाशिक सायक्लिस्ट असोशिएशन,बेंगलोर रॅन्डोनिअर, आई-वडील, पत्नी, मित्र आणि नातेवाईक यांचा सिंहाचा वाटा असतो हे विभव सांगायला विसरला नाही.
—–