PMC Gardens : उद्यानातील बंद अवस्थेमधील फुलराणी कारंजे, खेळणी सुरु करा  : कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News cultural PMC पुणे
Spread the love

उद्यानातील बंद अवस्थेमधील फुलराणी कारंजे, खेळणी सुरु करा

: कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुणे शहरातील सर्व उद्याने आता खुली झाली आहेत. शहरातील उद्यानमध्ये पर्यटक,लहान मुले ,नागरिकांची गर्दी होत आहे.मात्र  उद्यानामध्ये गेल्यावर फुलराणी बंद असल्यामुळे त्यांची निराशा होत आहे. त्यामुळे उद्यानातील फुलराणी आणि कारंजे सुरु करावी, अशी मागणी कॉंग्रेस चे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे..

बालगुडे यांच्या पत्रानुसार शहरातील सर्व उद्याने आता खुली झाली आहेत. शहरातील उद्यानमध्ये पर्यटक,लहान मुले ,नागरिकांची गर्दी होत आहे. यातील पेशवे उद्यान,नानासाहेब पेशवे जलाशय,सरदार घोरपडे उद्यान,वडगाव शेरी,कर्वेनगर जावळकर उद्यान, यामध्ये फुलराणी सुरु करण्यात आल्या होत्या. या सर्व फुलराणी काही तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत,तर काही उद्यानामध्ये असणारे कारंजे ,खेळणी हे सुधा नादुरस्त आहेत.पर्यटक,लहान मुलांना सुट्ट्या असल्यामुळे पालक त्यांना उद्यानामध्ये गेल्यावर फुलराणी बंद असल्यामुळे त्यांची निराशा होत आहे. महापालिका प्रशासन यांच्या दुर्लक्ष पणामुळे या फुलराणी, कारंजे खेळणी हि अवस्था झाली आहे,
तरी  आपण व्यक्तिगत लक्ष घालावे, या सुविधा लवकरात लवकर चालू कराव्यात. असे पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply