PMC Water Tanker | टँकर चालकांनी पैसे मागितल्यास पुणे महापालिकेकडे तक्रार करा | महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Water Tanker | टँकर चालकांनी पैसे मागितल्यास पुणे महापालिकेकडे तक्रार करा

| महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

PMC Water Tanker- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमधील (Pune Municipal Corporation (PMC) नवीन समाविष्ट गावांमध्ये तसेच, जुन्या हद्दीतील ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत टँकर दिले जातात. हे टँकर पूर्णपणे मोफत दिले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. तथापि,  नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार संबंधित टँकर चालक किंवा ड्रायव्हर सदर टँकरकरिता पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. (PMC Water Supply Department)

त्यामुळे महापालिकेने नागरिकांना असे आवाहन केले आहे की, अशा प्रकरणी टँकर चालक, ड्रायव्हर किंवा तदनुषंगिक अन्य व्यक्तीस पैसे देण्यात येवू नयेत. कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केल्यास सदर टँकर क्रमांक, संबंधित व्यक्तीचे नाव, तक्रारदाराचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह पुणे महानगरपालिकेचा टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ व व्हॉट्सॲप
मोबाईल क्रमांक ८८८८२५१००१ वर तक्रार करण्यात यावी किंवा PMC CARE App डाउनलोड करुन त्यावर फोटो आणि पुराव्यासह तक्रार नोंदवावी.  तक्रारीची पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत तात्काळ दखल घेण्यात येईल. असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.