PMC Water Tanker | टँकर चालकांनी पैसे मागितल्यास पुणे महापालिकेकडे तक्रार करा | महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Tanker | टँकर चालकांनी पैसे मागितल्यास पुणे महापालिकेकडे तक्रार करा

| महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

PMC Water Tanker- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमधील (Pune Municipal Corporation (PMC) नवीन समाविष्ट गावांमध्ये तसेच, जुन्या हद्दीतील ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत टँकर दिले जातात. हे टँकर पूर्णपणे मोफत दिले जातात. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. तथापि,  नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार संबंधित टँकर चालक किंवा ड्रायव्हर सदर टँकरकरिता पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. (PMC Water Supply Department)

त्यामुळे महापालिकेने नागरिकांना असे आवाहन केले आहे की, अशा प्रकरणी टँकर चालक, ड्रायव्हर किंवा तदनुषंगिक अन्य व्यक्तीस पैसे देण्यात येवू नयेत. कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केल्यास सदर टँकर क्रमांक, संबंधित व्यक्तीचे नाव, तक्रारदाराचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह पुणे महानगरपालिकेचा टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ व व्हॉट्सॲप
मोबाईल क्रमांक ८८८८२५१००१ वर तक्रार करण्यात यावी किंवा PMC CARE App डाउनलोड करुन त्यावर फोटो आणि पुराव्यासह तक्रार नोंदवावी.  तक्रारीची पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत तात्काळ दखल घेण्यात येईल. असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची हद्द अजून वाढणार | नगरसेवकांची संख्या देखील वाढणार!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची हद्द अजून वाढणार | नगरसेवकांची संख्या देखील वाढणार!

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची हद्द (PMC Pune Limit) अजून वाढणार आहे. समाविष्ट गावांमुळे ही हद्द वाढली होती. आता पुणे जिल्ह्यातील पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Pune Cantonment board and Khadaki Cantonment board) पुणे महापालिकेत (PMC) विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लष्कराच्या संस्था आणि केंद्रीय संस्था वगळून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशी भाग पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त (PMC commissioner) आणि कॅन्टोन्मेंट बोर्डांचे प्रतिनिधी (Cantonment board representatives) यांच्यात झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे  महापालिकेत लाखोंची लोकसंख्या समाविष्ट होणार असून नगरसेवकांची (corporators) संख्या देखील वाढणार आहे.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून लष्कराच्या 62 छावण्या म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. आता ही कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून त्यातील नागरी वस्तीचा समावेश महापालिकांमध्ये करण्याचा तर लष्कराच्या ताब्यातील भाग एक्स्क्लुजिव्ह मिलिटरी स्टेशन्स म्हणून लष्कराच्या ताब्यात ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठीची प्रक्रिया केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांकडून सुरू करण्यात आली आहे. यामुळे लष्कराच्या ताब्यातील लाखो हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात जाऊन विकासासाठी खुली होणार आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा बदल सुचवला आहे. (PMC Pune Cantonment board)

महाराष्ट्रातील  कॅन्टोन्मेंट बोर्ड

महाराष्ट्रात पुणे, खडकी, देहू रोड, औरंगाबाद, अहमदनगर, देवळाली (नाशिक) आणि नागपूर अशी सात कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. ही सातही कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थानिक महापालिकांच्या हद्दीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. (Cantonment board)

62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि लाखो हेक्टर जागा

देशातील वेगवगेळ्या राज्यांमध्ये 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या ताब्यात एक लाख साठ हजार एकर जागा आहे. 50 लाखाहून अधिक लोकसंख्या या कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये राहते. कॅन्टोन्मेंट हद्दीतील खाजगी मालमत्ता देखील लष्कराच्या ताब्यात आहे. लष्कराकडून मूळ मालकांशी दर काही वर्षांनी त्यासाठी भाडेकरार देखील केला जातो. लष्करी कार्यालयांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्टोन्मेंट हद्दीत विकास कामे आणि बांधकामासाठीच्या एफएसआयला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. (Pune News)

महापालिकेत गेल्याने विकास होईल का?

महापालिकेत गेल्यास रस्ते, पाणी, स्वच्छता यासारख्या सुविधा महापलिककडून मिळतील असं कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या काही नागरिकांना वाटते. हा निर्णय अंमलात आल्यास कॅन्टोन्मेंट हद्दीतील लाखो एकर जागा विकासासाठी खुली होणार असल्याने त्यावर डोळा ठेऊन हा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यामुळे लष्करी संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो. तर दुसरीकडे समाविष्ट गावे महापालिका हद्दीत येऊनही पायाभूत सुविधा देणे महापालिकेला जमले नाही. आता सीमा वाढल्याने महापालिकेवर अजून बोजा वाढणार आहे. याचे नियोजन महापालिका कसे करणार, हे पाहणे महत्वाचे आहे. (PMC Pune Marathi News)

——

News Title | Pune Municipal Corporation | The limits of Pune Municipal Corporation will increase further The number of councilors will also increase!