PMPML Bus Student Passes |विद्यार्थ्यांनो पीएमपीच्या सवलतीच्या पासेस चा लाभ घ्या | जाणून घ्या पासेस ची सर्व प्रक्रिया 

Categories
Breaking News Education social पुणे

PMPML Bus Student Passes |विद्यार्थ्यांनो पीएमपीच्या सवलतीच्या पासेस चा लाभ घ्या | जाणून घ्या पासेस ची सर्व प्रक्रिया

PMPML Bus Student Passes | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Limits) हद्दीतील विद्यार्थ्यांना पीएमपी प्रशासनाच्या (PMPML Administration)  वतीने सवलतीच्या दरात पासेस (PMPML Bus Pass) देण्यात येतात. पुणे  महानगरपालिकेच्या शाळेतील (PMC Pune Schools) इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास दिला जातो.  तसेच पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील (Private schools) इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% अनुदानित मोफत बस प्रवास पास दिला जातो. याचा लाभ घेण्याचे आवाहन पीएमपीच्या वतीने करण्यात आले. आहे. (PMPML Bus Student Passes)

 

सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील (Pune Municipal Corporation Schools)इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरू करण्यात आली आहे. पासेससाठी  १२/०६/२०२३ पासून अर्जाचे वाटप सर्व आगारामधून व सर्व पासकेंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विदयार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. (PMPML Pune)

तसेच अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार
नाही. खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून (PMPML Depot) त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पुणे मनपा हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. (PMPML Pune Marathi News)

 

पासेसकरीताचे अर्ज वितरण १२/०६/२०२३ पासून महामंडळाच्या सर्व आगारामधून करण्यात येईल. प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पुणे मनपाचे शाळेतील
व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. (Pune News)

अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४


News Title |PMPML Student Passes | Students Avail PMP Discount Passes | Know all procedures of passes

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची हद्द अजून वाढणार | नगरसेवकांची संख्या देखील वाढणार!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची हद्द अजून वाढणार | नगरसेवकांची संख्या देखील वाढणार!

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची हद्द (PMC Pune Limit) अजून वाढणार आहे. समाविष्ट गावांमुळे ही हद्द वाढली होती. आता पुणे जिल्ह्यातील पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Pune Cantonment board and Khadaki Cantonment board) पुणे महापालिकेत (PMC) विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लष्कराच्या संस्था आणि केंद्रीय संस्था वगळून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशी भाग पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त (PMC commissioner) आणि कॅन्टोन्मेंट बोर्डांचे प्रतिनिधी (Cantonment board representatives) यांच्यात झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे  महापालिकेत लाखोंची लोकसंख्या समाविष्ट होणार असून नगरसेवकांची (corporators) संख्या देखील वाढणार आहे.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून लष्कराच्या 62 छावण्या म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. आता ही कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून त्यातील नागरी वस्तीचा समावेश महापालिकांमध्ये करण्याचा तर लष्कराच्या ताब्यातील भाग एक्स्क्लुजिव्ह मिलिटरी स्टेशन्स म्हणून लष्कराच्या ताब्यात ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठीची प्रक्रिया केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांकडून सुरू करण्यात आली आहे. यामुळे लष्कराच्या ताब्यातील लाखो हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात जाऊन विकासासाठी खुली होणार आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा बदल सुचवला आहे. (PMC Pune Cantonment board)

महाराष्ट्रातील  कॅन्टोन्मेंट बोर्ड

महाराष्ट्रात पुणे, खडकी, देहू रोड, औरंगाबाद, अहमदनगर, देवळाली (नाशिक) आणि नागपूर अशी सात कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. ही सातही कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थानिक महापालिकांच्या हद्दीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. (Cantonment board)

62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि लाखो हेक्टर जागा

देशातील वेगवगेळ्या राज्यांमध्ये 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या ताब्यात एक लाख साठ हजार एकर जागा आहे. 50 लाखाहून अधिक लोकसंख्या या कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये राहते. कॅन्टोन्मेंट हद्दीतील खाजगी मालमत्ता देखील लष्कराच्या ताब्यात आहे. लष्कराकडून मूळ मालकांशी दर काही वर्षांनी त्यासाठी भाडेकरार देखील केला जातो. लष्करी कार्यालयांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्टोन्मेंट हद्दीत विकास कामे आणि बांधकामासाठीच्या एफएसआयला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. (Pune News)

महापालिकेत गेल्याने विकास होईल का?

महापालिकेत गेल्यास रस्ते, पाणी, स्वच्छता यासारख्या सुविधा महापलिककडून मिळतील असं कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या काही नागरिकांना वाटते. हा निर्णय अंमलात आल्यास कॅन्टोन्मेंट हद्दीतील लाखो एकर जागा विकासासाठी खुली होणार असल्याने त्यावर डोळा ठेऊन हा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यामुळे लष्करी संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो. तर दुसरीकडे समाविष्ट गावे महापालिका हद्दीत येऊनही पायाभूत सुविधा देणे महापालिकेला जमले नाही. आता सीमा वाढल्याने महापालिकेवर अजून बोजा वाढणार आहे. याचे नियोजन महापालिका कसे करणार, हे पाहणे महत्वाचे आहे. (PMC Pune Marathi News)

——

News Title | Pune Municipal Corporation | The limits of Pune Municipal Corporation will increase further The number of councilors will also increase!