Tag: PMC pune Schools
PMC School Audit | पुणे मनपाच्या शाळांमधील विना वापरांच्या वस्तूंचे ऑडिट करा | पृथ्वीराज सुतार यांची आयुक्ताकडे मागणी
Education Commissioner | शिक्षण आयुक्तांनी पुणे महापालिका शिक्षण विभागाला दिले हे महत्वाचे आदेश
Education Commissioner | राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhre) यांनी नुकतीच पुणे महापालिकेच्या काही शाळात (Pune Municipal Corporation Schools) भेट दिली. त्यावेळी त्यांना विद्यार्थ्यांच्या क्षमता बाबत मार्गदर्शनाचा अभाव जाणवला. यानंतर त्यांनी महापालिका शिक्षण विभागाला (PMC Education Department) काही मौलिक सूचना केल्या आहेत. (Education Commissioner)
याबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले कि, पुणे महापालिका क्षेत्रातील एका समुपदेशन कार्यक्रमास उपस्थित राहिलो. एकंदरीत पाहता विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, आजारपण, शाळेतील विषय निरस वाटणे तसेच बिनचूक मार्गदर्शनाचा अभाव अशा कारणांमुळे विद्यार्थी किमान क्षमता प्राप्त करू शकत नाहीत, असे मला त्यांच्या बोलताना जाणवले. या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. (Pune Education News)
१. सर्व विद्यार्थ्यांची जुलै मधील परीक्षेसाठी नोंदणी करावी
२. विद्यार्थ्यांची विषयावर विभागणी करून स्वतंत्र वर्ग त्या त्या विषय शिक्षकांनी घ्यावेत
३. हे वर्ग घेताना नेमक्या कोणत्या कारणाने विद्यार्थी क्षमता प्राप्त करू शकले नाहीत त्याचे निदान करावे व तसे उपचार करावेत
४. किमान आवश्यक गुण प्राप्त होतील तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कॅप्सुल कोचिंग करावे या विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त विद्यार्थी आगामी परीक्षेत क्षमता प्राप्त करतील त्या शिक्षकांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करणेत येईल. (PMC Pune News)
News Title |Education Commissioner The Commissioner of Education gave this important order to the Pune Municipal Education Department
PMPML Bus Student Passes |विद्यार्थ्यांनो पीएमपीच्या सवलतीच्या पासेस चा लाभ घ्या | जाणून घ्या पासेस ची सर्व प्रक्रिया
PMPML Bus Student Passes | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Limits) हद्दीतील विद्यार्थ्यांना पीएमपी प्रशासनाच्या (PMPML Administration) वतीने सवलतीच्या दरात पासेस (PMPML Bus Pass) देण्यात येतात. पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील (PMC Pune Schools) इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास दिला जातो. तसेच पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील (Private schools) इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% अनुदानित मोफत बस प्रवास पास दिला जातो. याचा लाभ घेण्याचे आवाहन पीएमपीच्या वतीने करण्यात आले. आहे. (PMPML Bus Student Passes)
सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील (Pune Municipal Corporation Schools)इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरू करण्यात आली आहे. पासेससाठी १२/०६/२०२३ पासून अर्जाचे वाटप सर्व आगारामधून व सर्व पासकेंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विदयार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. (PMPML Pune)
तसेच अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार
नाही. खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून (PMPML Depot) त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पुणे मनपा हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. (PMPML Pune Marathi News)
पासेसकरीताचे अर्ज वितरण १२/०६/२०२३ पासून महामंडळाच्या सर्व आगारामधून करण्यात येईल. प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पुणे मनपाचे शाळेतील
व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. (Pune News)
अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४
News Title |PMPML Student Passes | Students Avail PMP Discount Passes | Know all procedures of passes
महापालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थी संगणकीय कौशल्यानी विकसित व्हावा | आयुक्त विक्रम कुमार
“येणाऱ्या काळात प्रत्येक विद्यार्थी संगणकीय कौशल्यानी विकसित व्हावा आणि भविष्यवेधी रचनांचा पाया मजबूत बनावा. जेणेकरून येणाऱ्या संगणकीय युगासाठी एक प्रगत नागरिक तयार होतील आणि समस्या निर्मुलन व कार्यक्षेत्र यामध्ये प्रगत युवकांची पिढी तयार होईल” असे प्रतिपादन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Pune commissioner Vikram Kumar) यांनी केले.
| पुणे महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी शिकणार अधुनिक संगणक कौशल्य (PMC school Students)
पुणे महानगरपालिका आणि पायजम फाउंडेशन व बजाज फिनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेच्या २५ शाळांमध्ये आधुनिक स्वरूपाच्या ‘पाय लॅब’ (Pi Lab) प्रकल्पाची उभारणी करण्यात करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे उद्घाटन श्रीकांत भडके प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्र. १०५ बी संदेश नगर येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मविक्रम कुमार यांच्या हस्ते पार पडले.(PMC Pune Schools)
ज्यामध्ये,
. ८ ते १० संगणक संच
• Raspberry-Pi संगणक Sensor kits
• प्रशिक्षक (२ शाळांसाठी एक याप्रमाणे)
विविध सेन्सर्स आणि आधुनिक विचारसरणी आणि कॉम्पुटेशनल थिंकींग यांच्या आधारावर विद्यार्थी अभ्यासक्रमासोबतच दैनंदिन जीवनातील समस्या कशा प्रकारे सोडवता येतील. यावर नमुना आवृत्ती तयार करण्यासाठी सक्षम बनतील, तसेच सदर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यासाठी देखील तयार होतील. (Pune Municipal Corporation school)