PMC Schools | महापालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थी संगणकीय कौशल्यानी विकसित व्हावा | आयुक्त विक्रम कुमार 

Categories
Breaking News Education PMC social पुणे
Spread the love

महापालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थी संगणकीय कौशल्यानी विकसित व्हावा | आयुक्त विक्रम कुमार

“येणाऱ्या काळात प्रत्येक विद्यार्थी संगणकीय कौशल्यानी विकसित व्हावा आणि भविष्यवेधी रचनांचा पाया मजबूत बनावा. जेणेकरून येणाऱ्या संगणकीय युगासाठी एक प्रगत नागरिक तयार होतील आणि समस्या निर्मुलन व कार्यक्षेत्र यामध्ये प्रगत युवकांची पिढी तयार होईल” असे प्रतिपादन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Pune commissioner Vikram Kumar) यांनी केले.

| पुणे महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी  शिकणार अधुनिक संगणक कौशल्य (PMC school Students)

 

पुणे महानगरपालिका आणि पायजम फाउंडेशन व बजाज फिनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेच्या २५ शाळांमध्ये आधुनिक स्वरूपाच्या ‘पाय लॅब’ (Pi Lab) प्रकल्पाची उभारणी करण्यात करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे उद्घाटन श्रीकांत भडके प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्र. १०५ बी संदेश नगर येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मविक्रम कुमार यांच्या हस्ते पार पडले.(PMC Pune Schools)

या उपक्रमा अंतर्गत Pi Lab द्वारे संगणकीय अभ्यासक्रम आणि २१व्या शतकातील आधुनिक कौशल्ये विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहेत याचा ७००० हून अधिक विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे, तसेच महानगरपालिका शाळांमधील शिक्षकांना देखील आधुनिक संगणक कौशल्ये अवगत होणार आहेत. (PMC Pune)
पाय जॅम फाउंडेशन, पुणे महानगरपालिकेच्या २५ शाळांमध्ये Pi-Labs ची उभारणी करणार आहे
ज्यामध्ये,
. ८ ते १० संगणक संच
• Raspberry-Pi संगणक Sensor kits
• प्रशिक्षक (२ शाळांसाठी एक याप्रमाणे)
विविध सेन्सर्स आणि आधुनिक विचारसरणी आणि कॉम्पुटेशनल थिंकींग यांच्या आधारावर विद्यार्थी अभ्यासक्रमासोबतच दैनंदिन जीवनातील समस्या कशा प्रकारे सोडवता येतील. यावर नमुना आवृत्ती तयार करण्यासाठी सक्षम बनतील, तसेच सदर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यासाठी देखील तयार होतील. (Pune Municipal Corporation school)
सदर उद्घाटन प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, बजाज फिनसर्वच्या लिना रंजन पाय जाम फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शोएब दास, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी सुभाष सताव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.