License fee | Street vendor | PMC Pune | नियमित परवाना शुल्क भरणाऱ्या पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार | अतिक्रमण विभागाचे आदेश 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

नियमित परवाना शुल्क भरणाऱ्या पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार

| अतिक्रमण विभागाचे आदेश

पुणे | शहरातील नोंदणीकृत / परवानाधारक व यापूर्वी प्रत्यक्ष
जागेवर व्यवसाय करीत असणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या पथविक्रेत्यांना कळविण्यात येते की, ज्या पथविक्रेत्यांनी त्यांचे संबंधित मनपा क्षेत्रिय कार्यालयाकडे दि.२०/०९/२०२२ पूर्वी लेखी अर्ज देवून स्वतःचे पुनर्वसन करणेस व दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करणेबाबतची मागणी केलेली असेल, अशा पथविक्रेत्यांनी संबंधित क्षेत्रिय कार्यालयामार्फत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपले नावे परवाना शुल्काची आकारणी करून घेण्याची कार्यवाही दि. ०७/१०/२०२२ पर्यंत तात्काळ करून घ्यावयाची आहे. नियमित परवाना शुल्क भरणाऱ्या पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. त्यामुळे शुल्क भरणा करावा, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
केंद्र शासनाकडील पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम २०१४ चे मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने तयार केलेले नियम व आदेशान्वये शहरातील नोंदणीकृत पथविक्रेत्यांच्या मधून त्यांच्या एकूण ८ प्रतिनिधींची निवडणूक घेणेकामी यापूर्वी दि.२०/०८/२०२२
रोजी शहरातील दोन दैनिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रकटन देवून नोंदणीकृत पथविक्रेत्यांची प्रारूप मतदार यादी पथविक्रेते / नागरिकांच्या हरकती व सूचना घेणेकरिता प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शहरातील पथविक्रेत्यांच्या आलेल्या हरकती व सूचना तसेच शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने पुणे शहरातील पदपथांवर प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत / प्रमाणपत्रधारक व्यवसायधारकांकडून दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करून वसुली करणेचा निर्णय प्रशासनामार्फत घेण्यात आलेला आहे. त्यानुसार  शहरातील नोंदणीकृत / परवानाधारक व यापूर्वी प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय करीत असणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या पथविक्रेत्यांना कळविण्यात येते की, ज्या पथविक्रेत्यांनी त्यांचे संबंधित मनपा क्षेत्रिय कार्यालयाकडे दि.२०/०९/२०२२ पूर्वी लेखी अर्ज देवून स्वतःचे पुनर्वसन करणेस व दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करणेबाबतची मागणी केलेली असेल, अशा पथविक्रेत्यांनी संबंधित क्षेत्रिय कार्यालयामार्फत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपले नावे परवाना शुल्काची आकारणी करून घेण्याची कार्यवाही दि. ०७/१०/२०२२ पर्यंत तात्काळ करून घ्यावयाची आहे. ज्या पथविक्रेत्यांनी या कार्यालयाकडील नोंदणी करून प्रमाणपत्र घेतले आहे, व मनपाच्या रस्ता, पदपथांवर अनेक दिवसापासून अधिकृतपणे / अनधिकृतपणे सद्यस्थितीत व्यवसाय करीत आहे अशा पथविक्रेत्यांनी वर दिलेल्या मुदतीपूर्वी सध्या करीत असलेल्या व्यवसाय जागेनुसार संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडून दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करणेबाबचे लेखी शिफारसपत्र दि. ०७/१०/२०२२ पर्यंत या कार्यालयाकडे सादर करावे.
त्यानुसार संबंधित परवाना लेखनिक यांचेकडून आपले नावे दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करून घेवून आकारणी केलेल्या एकवट परवाना शुल्काचा भरणा ठरवून दिलेल्या हप्त्यांनुसार त्वरित मनपा कोषागारात भरून भरणा चलनाची प्रत त्याचवेळी संबंधित परवाना लेखनिकाकडे सादर करावी. अशा पद्धतीने नव्याने परवाना शुल्काचा भरणा करणाऱ्या तसेच यापूर्वी ज्या पथविक्रेत्यांचे रितसर पुनर्वसन करून नियमानुसार परवाना शुल्काचा भरणा नियमित करीत आहेत, अशाच पथविक्रेत्यांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये घेण्यात येणार असून, अशा पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.