Madhav Jagtap | PMC Pune | भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही! | परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही!

| परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

पुणे | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडेतत्वावर (On Rent) देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक (Hawkers) अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने (Encroachment department) अशा पथारीधारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीय कार्यालय (Ward Office) स्तरावर अशा पथारी धारकांवर तीव्र कारवाई सुरु करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या पथारी धारकाचा परवाना (License) रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) यांनी दिली.
महापालिकेच्या (PMC Pune) अतिक्रमण विभागाने शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. याबाबत उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले कि, अशा फेरीवाल्याना अगोदर समाज देण्यात आली आहे. आता विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करतील. त्यावेळी संबंधित दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील. त्यावरून लक्षात येईल कि दुकान भाडेतत्वावर आहे कि नाही. दुकान भाडेतत्वावर असेल तर तात्काळ संबंधित मालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. आता ही कारवाई तीव्र करण्यात येत आहे. असेही माधव जगताप म्हणाले. (Pune Municipal Corporation)

Food walking Plaza | अतिक्रमण विभागा ऐवजी भवन विभाग करणार फूड वॉकिंग प्लाझाचे काम | बजेटमध्ये 7.5 कोटींची तरतूद

Categories
Breaking News PMC social पुणे

अतिक्रमण विभागा ऐवजी भवन विभाग करणार फूड वॉकिंग प्लाझाचे काम 

– बजेटमध्ये 7.5 कोटींची तरतूद 

पुणे | सारसबागेत प्रवेश करण्यासाठी या परिसरातील विक्रेत्यांनी अस्ताव्यस्त मांडलेल्या टेबल-खुर्च्या, त्यापुढे विविध खेळणी आणि इतर विक्रेत्यांचे अतिक्रमण अशी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यामुळे येथील चौपाटीची पुनर्रचना करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. सारसबाग चौपाटी येथे ‘फूड वॉकिंग प्लाझा’ प्रस्तावित असून, त्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. तसेच यासाठी 8 कोटी 73 लाखाचा खर्च येणार आहे. इस्टिमेट कमिटीने याला मान्यता दिली आहे. हे काम अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार होते. मात्र आता हे काम भवन विभाग करणार आहे. महापालिका आयुक्तांनी बजेट मध्ये त्यासाठी 7.5 कोटींची तरतूद केली आहे.



सारस बाग परिसरातील विक्रेत्यांना अटी-शर्तींनुसार खुर्च्या व छतासाठी जागा निश्चित करून दिली जाईल. त्यामुळे उर्वरित जागेत नागरिकांना निर्धास्तपणे चालणे शक्य होणार आहे.  रस्त्यावर दुतर्फा खाद्यपदार्थांचे स्टॉल; तसेच मुलांसाठी लहान-मोठ्या खेळण्यांचेही स्टॉल आहेत. महापालिकेने या परिसरात ५३ जणांना व्यवसाय परवाने दिले आहेत. मात्र, व्यावसायिकांनी स्टॉलला हॉटेलचे स्वरूप दिले असून, अनेकांचे कामगारही तेथेच राहतात. त्यामुळे नियमभंग होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १४ मे रोजी येथील ५३ स्टॉल सील केले होते. परवानगी दिलेल्या जागेतच व्यवसाय करू, अतिक्रमण करणार नाही, कामगार येथे मुक्कामी राहणार नाहीत, असे हमीपत्र दिल्यासच या स्टॉलचे सील काढण्यात येईल, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली होती.

पथारी व्यावसायिक संघटनांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली होती. यानुसार आता वॉकिंग प्लाझाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वॉकिंग प्लाझा तयार झाल्यानंतर चौपाटी परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पेशवे उद्यानाजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत आपली वाहने नेता येतील. त्यामुळे सारसबागेत येणाऱ्यांना आता या रस्त्यावर निर्धास्तपणे चालणे शक्य होईल.
आतापर्यंतचे सगळे काम अतिक्रमण विभागाकडून करण्यात आले आहे. आराखडा तयार करणे पासून ते 8 कोटी 73 लाखांचे इस्टिमेट करण्यापर्यंत आणि त्याची मंजुरी घेण्यापर्यंत सर्व कामे अतिक्रमण विभागाने केली आहेत. मागील बजेटमध्ये अतिक्रमण विभागाला यासाठी 2 कोटी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आगामी सालच्या म्हणजे 2023-24 च्या बजेटमध्ये या कामासाठी भवन विभागाला 7.5 कोटीचे बजेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता हे काम भवन विभाग करणार आहे. शिवाय उपलब्ध केलेली ही तरतूद देखील अपूरी आहे. त्यासाठी वर्गीकरण करण्याची आवश्यकता भासणार आहे. 

License fee | Street vendor | PMC Pune | नियमित परवाना शुल्क भरणाऱ्या पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार | अतिक्रमण विभागाचे आदेश 

Categories
Breaking News PMC social पुणे

नियमित परवाना शुल्क भरणाऱ्या पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार

| अतिक्रमण विभागाचे आदेश

पुणे | शहरातील नोंदणीकृत / परवानाधारक व यापूर्वी प्रत्यक्ष
जागेवर व्यवसाय करीत असणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या पथविक्रेत्यांना कळविण्यात येते की, ज्या पथविक्रेत्यांनी त्यांचे संबंधित मनपा क्षेत्रिय कार्यालयाकडे दि.२०/०९/२०२२ पूर्वी लेखी अर्ज देवून स्वतःचे पुनर्वसन करणेस व दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करणेबाबतची मागणी केलेली असेल, अशा पथविक्रेत्यांनी संबंधित क्षेत्रिय कार्यालयामार्फत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपले नावे परवाना शुल्काची आकारणी करून घेण्याची कार्यवाही दि. ०७/१०/२०२२ पर्यंत तात्काळ करून घ्यावयाची आहे. नियमित परवाना शुल्क भरणाऱ्या पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. त्यामुळे शुल्क भरणा करावा, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
केंद्र शासनाकडील पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम २०१४ चे मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने तयार केलेले नियम व आदेशान्वये शहरातील नोंदणीकृत पथविक्रेत्यांच्या मधून त्यांच्या एकूण ८ प्रतिनिधींची निवडणूक घेणेकामी यापूर्वी दि.२०/०८/२०२२
रोजी शहरातील दोन दैनिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रकटन देवून नोंदणीकृत पथविक्रेत्यांची प्रारूप मतदार यादी पथविक्रेते / नागरिकांच्या हरकती व सूचना घेणेकरिता प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शहरातील पथविक्रेत्यांच्या आलेल्या हरकती व सूचना तसेच शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने पुणे शहरातील पदपथांवर प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत / प्रमाणपत्रधारक व्यवसायधारकांकडून दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करून वसुली करणेचा निर्णय प्रशासनामार्फत घेण्यात आलेला आहे. त्यानुसार  शहरातील नोंदणीकृत / परवानाधारक व यापूर्वी प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय करीत असणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या पथविक्रेत्यांना कळविण्यात येते की, ज्या पथविक्रेत्यांनी त्यांचे संबंधित मनपा क्षेत्रिय कार्यालयाकडे दि.२०/०९/२०२२ पूर्वी लेखी अर्ज देवून स्वतःचे पुनर्वसन करणेस व दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करणेबाबतची मागणी केलेली असेल, अशा पथविक्रेत्यांनी संबंधित क्षेत्रिय कार्यालयामार्फत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आपले नावे परवाना शुल्काची आकारणी करून घेण्याची कार्यवाही दि. ०७/१०/२०२२ पर्यंत तात्काळ करून घ्यावयाची आहे. ज्या पथविक्रेत्यांनी या कार्यालयाकडील नोंदणी करून प्रमाणपत्र घेतले आहे, व मनपाच्या रस्ता, पदपथांवर अनेक दिवसापासून अधिकृतपणे / अनधिकृतपणे सद्यस्थितीत व्यवसाय करीत आहे अशा पथविक्रेत्यांनी वर दिलेल्या मुदतीपूर्वी सध्या करीत असलेल्या व्यवसाय जागेनुसार संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडून दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करणेबाबचे लेखी शिफारसपत्र दि. ०७/१०/२०२२ पर्यंत या कार्यालयाकडे सादर करावे.
त्यानुसार संबंधित परवाना लेखनिक यांचेकडून आपले नावे दैनंदिन परवाना शुल्काची आकारणी करून घेवून आकारणी केलेल्या एकवट परवाना शुल्काचा भरणा ठरवून दिलेल्या हप्त्यांनुसार त्वरित मनपा कोषागारात भरून भरणा चलनाची प्रत त्याचवेळी संबंधित परवाना लेखनिकाकडे सादर करावी. अशा पद्धतीने नव्याने परवाना शुल्काचा भरणा करणाऱ्या तसेच यापूर्वी ज्या पथविक्रेत्यांचे रितसर पुनर्वसन करून नियमानुसार परवाना शुल्काचा भरणा नियमित करीत आहेत, अशाच पथविक्रेत्यांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये घेण्यात येणार असून, अशा पथविक्रेत्यांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.

Encroachment Dept.| PMC | पथारी व्यावसायिकांना दिलासा | जुलै अखेर पर्यंत तीन हफ्त्यात थकबाकी द्यावी लागणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

पथारी व्यावसायिकांना दिलासा | जुलै अखेर पर्यंत तीन हफ्त्यात थकबाकी द्यावी लागणार

| अतिक्रमण विभागाकडून हमीपत्र घेण्यास सुरुवात

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून थकबाकी न देणाऱ्या नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विभागाने तुळशी बाग, सारस बाग येथील व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांना व्यवसाय करण्यास बंदी आणली होती. मात्र याला प्रचंड विरोध होऊ लागला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी काही अटींवर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार अतिक्रमण विभागाने हमीपत्र तयार केले आहे. हमीपत्र भरून देणाऱ्यांनाच व्यवसाय करायला परवानगी दिली जात आहे. या हमीपत्रानुसार जुलै अखेर पर्यंत तीन हफ्त्यात थकबाकी द्यावी लागणार आहे. प्रशासनाने तीन वेगवेगळी हमीपत्र तयार केली आहेत.

तुळशीबागेतील व्यावसायिकांसाठी असे असेल हमीपत्र

मी खाली सही करणार या हमीपत्राद्वारेवर लिहून देते/देतो की, दि. / / २०२२ रोजी माझे वरील व्यवसाय जागेवर वरिष्ठ अतिक्रमण अधिकारी यांचेमार्फत अचानक तपासणी करण्यात आली असून त्यावेळी
माझ्याकडून झालेल्या परवाना अटी/शर्तीचा भंग झालेबाबत त्यांचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने त्यांनी माझे व्यवसाय साधन बंद करून त्यास कार्यालयीन सील लावण्यात आले होते व सदर बाब मला मान्य आहे.
नेमून दिलेल्या जागेवर मान्य व्यवसाय करताना भविष्यात माझेकडून परवान्यामधील/प्रमाणपत्रामधील नमूद कोणत्याही अटी/शर्तीचा भंग होणार नाही, याची मी कायम दक्षता घेईन. मनपाने नेमून दिलेल्या मान्य
मापाच्या जागेवर मान्य साधनामध्ये स्वतः मान्य व्यवसाय करीन. माझा परवाना इतर कोणासही भाड्याने अथवा अनाधिकृतपणे चालविणेस देणार नाही. मनपाकडील मान्य परवानाशुल्काची माहे जून २०२२ अखेरपर्यंत असलेली थकबाकी माहे जुलै २०२२ अखेर पर्यंत ३ हत्यांमध्ये अथवा एकवट रकमेद्वारे मी भरून घेईन. दिलेल्या मुदतीनंतर थकबाकी राहिल्यास मनपाकडून माझेवर जी कारवाई केली जाईल ती मला मान्य राहील. तसेच यापुढील परवाना शुल्क नियमानुसार मुदतीमध्ये भरले जाईल. वरील नमूद सर्व बाबींची पूर्तता करणेची संपूर्ण जबाबदारी माझी असून ती मी सातत्याने पाळणार असलेबाबत हे स्वयंघोषित हमीपत्र मी लिहून देत आहे व ते माझ्यावर संपूर्णपणे बंधनकारक आहे.

सारस बागेतील व्यावसायिकांसाठी असे असेल हमीपत्र

मी खाली सही करणार या हमीपत्राद्वारेवर लिहून देते/देतो की, दि. / / २०२२ रोजी माझे वरील व्यवसाय जागेवर वरिष्ठ अतिक्रमण अधिकारी यांचेमार्फत अचानक तपासणी करण्यात आली असून त्यावेळी माझ्याकडून झालेल्या परवाना अटी/शर्तीचा भंग झालेबाबत त्यांचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने त्यांनी माझे व्यवसाय साधन बंद करून त्यास कार्यालयीन सील लावण्यात आले होते व सदर बाब मला मान्य आहे. नेमून दिलेल्या जागेवर मान्य व्यवसाय करताना भविष्यात माझेकडून परवान्यामधील/प्रमाणपत्रामधील नमूद कोणत्याही अटी/शर्तीचा भंग होणार नाही, याची मी कायम दक्षता घेईन. तसेच सदर माझे परवान्यासंबंधित खालील बाबींची
देखील माझ्याकडून पूर्तता करण्यात येईल.
१) स्टॉल समोरील मनपा जागेत गिहाईकांकरिता अनधिकृतपणे टेबल, खुर्च्या मांडल्या जाणार नाहीत. तसेच अनधिकृतपणे पत्राशेड / ओनियन शेड टाकण्यात येणार नाही. महानगरपालिकेकडून रितसर परवानगी मिळाल्यानंतरच टेबल, खुर्च्या यांचा वापर सुरु करील.
२) मान्य मापाच्या स्टॉलमध्ये स्वतः व्यवसाय करीन. सदर स्टॉलमध्ये कामगारांना रात्रीच्यावेळी राहण्यास ठेवले जाणार नाही. स्टॉल बाहेरील जागेत कोणतीही अनधिकृत पक्क्या स्वरूपातील अतिक्रमणे केली जाणार
नाहीत.
३) महानगरपालिकेकडून नव्याने सदर ठिकाणी फूड प्लाझा (खाऊगल्ली) बाबत धोरण निश्चित करून नियोजित प्लॅन / योजना मान्य करून अमलात आणली जाईल, त्यावेळेस त्यामधील सर्व अटी, शर्ती व नवीन परवाना
शुल्क दर मला मान्य राहील.
४) स्टॉल समोरील यापूर्वी टाकलेल्या फरशा/काँक्रीट व मागील मनपा जागेवरील अनधिकृत पक्क्या स्वरूपातील बांधकामे स्वखर्चाने काढून पुन्हा अशी अतिक्रमणे केली जाणार नाहीत.
वरिल बाबींची कायदेशीर पूर्तता आजपासून १५ दिवसांचे आत मी स्वतः जबाबदारीने पूर्ण करून घेईन. याबाबत मी मनपास कोणतीही तोशिष लागू देणार नाही. याबाबतचे हे स्वयंघोषित हमीपत्र लिहून देत आहे.

शहरातील सर्व नोंदणीकृत व्यावसायिकांसाठी असे असेल हमीपत्र

मी खाली सही करणार या हमीपत्राद्वारेवर लिहून देते/देतो की, दि. / / २०२२ रोजी माझे वरील व्यवसाय जागेवर संबंधित अतिक्रमण निरीक्षक / इतर मनपा अधिकारी / सेवक यांचेमार्फत अचानक तपासणी
करण्यात आली असून त्यावेळी माझ्याकडून झालेल्या परवाना अटी/शर्तीचा भंग झालेबाबत त्यांचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने त्यांनी माझे व्यवसाय साधन बंद करून त्यास कार्यालयीन सील लावण्यात आले होते
व सदर बाब मला मान्य आहे. नेमून दिलेल्या जागेवर मान्य व्यवसाय करताना भविष्यात माझेकडून परवान्यामधील/प्रमाणपत्रामधील नमूद कोणत्याही अटी/शर्तीचा भंग होणार नाही, याची मी कायम दक्षता घेईन. मनपाने नेमून दिलेल्या मान्य मापाच्या जागेवर मान्य साधनामध्ये स्वतः मान्य व्यवसाय करीन. माझा परवाना इतर कोणासही भाड्याने अथवा अनाधिकृतपणे चालविणेस देणार नाही. मनपाकडील मान्य परवानाशुल्काची माहे जून २०२२ अखेरपर्यंत असलेली थकबाकी माहे जुलै २०२२ अखेर पर्यंत ३ हत्यांमध्ये
अथवा एकवट रकमेद्वारे मी भरून घेईन. दिलेल्या मुदतीनंतर थकबाकी राहिल्यास मनपाकडून माझेवर जी कारवाई केली जाईल ती मला मान्य राहील. तसेच यापुढील परवाना शुल्क नियमानुसार मुदतीमध्ये भरले
जाईल याची या हमीपत्राद्वारे मी हमी देतो. वरील नमूद सर्व बाबींची पूर्तता करणेची संपूर्ण जबाबदारी माझी असून ती मी सातत्याने पाळणार असलेबाबत हे स्वयंघोषित हमीपत्र मी लिहून देत आहे व ते माझ्यावर संपूर्णपणे बंधनकारक राहील.