Madhav Jagtap | PMC Pune | भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही! | परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही!

| परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

पुणे | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडेतत्वावर (On Rent) देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक (Hawkers) अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने (Encroachment department) अशा पथारीधारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीय कार्यालय (Ward Office) स्तरावर अशा पथारी धारकांवर तीव्र कारवाई सुरु करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या पथारी धारकाचा परवाना (License) रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) यांनी दिली.
महापालिकेच्या (PMC Pune) अतिक्रमण विभागाने शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. याबाबत उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले कि, अशा फेरीवाल्याना अगोदर समाज देण्यात आली आहे. आता विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करतील. त्यावेळी संबंधित दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील. त्यावरून लक्षात येईल कि दुकान भाडेतत्वावर आहे कि नाही. दुकान भाडेतत्वावर असेल तर तात्काळ संबंधित मालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. आता ही कारवाई तीव्र करण्यात येत आहे. असेही माधव जगताप म्हणाले. (Pune Municipal Corporation)