PMC Pune Services | नागरी सुविधा केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता क्षेत्रीय कार्यालयाचा समन्वय अधिकारी

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

PMC Pune Services | नागरी सुविधा केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता क्षेत्रीय कार्यालयाचा समन्वय अधिकारी

PMC Pune Services | महापालिका सहाय्यक आयुक्त (PMC Assistant commissioner) यांनी नागरी सुविधा केंद्रावरील (PMC CFC centre’s) कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी व  त्यांची नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्र.याची माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे ७ दिवसाच्या आत कळविण्यात यावी. जेणेकरून नागरी सुविधा केंद्रावरील ऑपरेटरवर व कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. असे आदेश माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून (PMC IT Department) सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. (PMC Pune Service’s)

माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून काढण्यात आलेल्या पत्रकानुसार पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) नागरिकांना विविध प्रकारच्या कार्यालयीन सेवा नागरी सुविधा
केंद्रामार्फत (सीएफसी) पुरविल्या जातात. त्यामध्ये मिळकतकर भरणा व त्या संबंधित इतर सर्व दाखले, जन्म-मृत्यू दाखले, नळजोडणी व मीटर जोडणी संबंधीतील कामे, पाणी मीटर बिल वॉटर टँक रिसीट, आरोग्य खात्याकडील नर्सिंग होम व हॉस्पिटल यांचे परवाने विविध खात्यातील ना- हरकत दाखले, अतिक्रमण विभागातील दंडात्मक कारवाईबाबतच्या रकमा स्विकारणे इ. प्रकारच्या सेवा नागरी सुविधा केंद्रातून सर्व क्षेत्रिय कार्यालय, संपर्क कार्यालय व नवीन समाविष्ट गावे अशा ठिकाणी देण्यात येत आहेत. (PMC Pune)

सद्यस्थितीत नागरी सुविधा केंद्र चालविण्याचे कामकाज क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कार्यालयीन वेळेत क्षेत्रिय कार्यालयाच्या शिस्तीनुसार केले जात आहे. नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजा अंतर्गत नागरिकांकडून दररोज विविध सेवांतर्गत रोख रकमा, डीडी व चेक जमा होतात. यामध्ये या रकमा स्विकारल्यानंतर नागरिकांना पोच पावती दिली जाते. सदर नागरी सेवा सुविधा मार्फत रोख रक्कम,डीडी व चेक नियमितपणे नागरी सुविधा केंद्रावरील (सीएफसी) सेवकांमार्फत आयसीआयसीआय या बँकेमध्ये जमा करण्यासाठी बँक कर्मचारी (CMS) यांच्याकडे दिल्या जातात. या सर्व व्यवहाराबाबत प्रत्येक दिवसा अखेर अहवाल (स्क्रोल) काढला जात असून त्यावर बँक कर्मचाऱ्यांची पोच घेतली जाते. (Pune Mahanagarpalika)
सदरची सर्व स्क्रोल तसेच रक्कम भरणाबाबतच्या पावत्या सद्यस्थितीत मनपा सीएफसी सेवकांमार्फत संकलित करून ठेवण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दर वर्षी होणाऱ्या लेखापरीक्षणास सदर पावत्या व स्क्रोल तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व फाईल्स व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. याबाबत सदर स्क्रोल व पोच पावर्तीवर पुणे मनपाच्या कर्मचाऱ्यांचे / अधिकाऱ्यांचे नियंत्रण व जबाबदारी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदरचे दैनंदिन स्क्रोल सर्टिफाईड करणे, नागरी सुविधा केंद्रावरील (सीएफसी) सेवकांवर नागरी सुविधा केंद्रावरील ट्रान्झॅक्शन व कॅशची तपासणी करणे, नागरिकांना कार्यालयाकडील वरिष्ठ सेवकांमार्फत होणे अपेक्षित आहे. तदनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाकडील वरिष्ठ सेवकांद्वारे सीएफसीमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी तेथील कामकाजावर नियंत्रण ठेवणे व तेथे जमा होणाऱ्या भरणा (कॅश + डीडी +चेक) वर देखरेख ठेवणे, तसेच तेथे दिल्या जाणाऱ्या विविध खात्यातील सोयी सुविधा पुरविल्यानंतर तयार होणाऱ्या पावत्या व त्यांचे स्क्रोल व्यवस्थितरीत्या फाईलिंग करून संकलित करणे व आवश्यकतेनुसार संबंधित कार्यालयास माहिती पुरविणे व समन्वय ठेवणे, नागरी सुविधा केंद्रावरील ऑपरेटर यांची हजेरी तपासणे, दर महिन्याच्या हजेरीवर आपल्याकडील नियुक्त वरिष्ठ सेवकांच्या हजेरीवर स्वाक्षरी करणे, त्याबरोबर त्यावर क्षेत्रिय कार्यालयाचा शिक्का असणे इ. कामे करणे आवश्यक आहे.
सदरची नागरी सुविधा केंद्र ही क्षेत्रिय कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याने नागरिकांना गतिमानरित्या सुविधा पुरविणेसाठी नागरिकांना सदर सेवा देताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व
तसेच तेथील कामकाजाच्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार योग्य ती कारवाई क्षेत्रिय कार्यालयामार्फत करणे आवश्यक आहे. (PMC Pune News)

तदनुषंगाने सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी नागरी सुविधा केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी व त्यांची नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्र.याची माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे ७ दिवसाच्या आत कळविण्यात यावी. जेणेकरून नागरी सुविधा केंद्रावरील ऑपरेटरवर व कामकाजावर नियंत्रण ठेवणेशक्य होईल. असे आदेशात म्हटले आहे.
—/—

News Title: PMC Pune Services | Coordinating Officer of the ward Office now to control the operations at the Civic Facility Centre

Madhav Jagtap | PMC Pune | भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही! | परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

भाडेतत्वावर पथारी देणाऱ्या पथारी धारकांची खैर नाही!

| परवाना रद्द करणार असल्याची उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

पुणे | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडेतत्वावर (On Rent) देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक (Hawkers) अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने (Encroachment department) अशा पथारीधारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीय कार्यालय (Ward Office) स्तरावर अशा पथारी धारकांवर तीव्र कारवाई सुरु करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या पथारी धारकाचा परवाना (License) रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) यांनी दिली.
महापालिकेच्या (PMC Pune) अतिक्रमण विभागाने शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. याबाबत उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले कि, अशा फेरीवाल्याना अगोदर समाज देण्यात आली आहे. आता विभागाचे कर्मचारी शहरात ठिकठिकाणी पाहणी करतील. त्यावेळी संबंधित दुकानात जाऊन मालकाचे सर्टिफिकेट स्कॅन करतील. त्यावरून लक्षात येईल कि दुकान भाडेतत्वावर आहे कि नाही. दुकान भाडेतत्वावर असेल तर तात्काळ संबंधित मालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. आता ही कारवाई तीव्र करण्यात येत आहे. असेही माधव जगताप म्हणाले. (Pune Municipal Corporation)

Hoarding Action | होर्डिंग वर कारवाई होत नाही म्हणून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली! 

Categories
Breaking News PMC पुणे

होर्डिंग वर कारवाई होत नाही म्हणून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली!

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा

पुणे | शहरातील अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्याची बाब महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे घेतली आहे. मात्र काही क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई तीव्र होत नाही. नगर रोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसापासून व्यवस्थित कारवाई होत नाही. यामुळे महापालिका आयुक्तांनी आकाशचिन्ह विभाग आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त सोमनाथ अधिकारी सोमनाथ बनकर यांच्याकडून क्षेत्रीय अधिकारी पदाचा अधिकार काढून घेतला आणि ती जबाबदारी उपअभियंता नामदेव बजबळकर यांच्यावर सोपवली आहे. यामुळे सर्व क्षेत्रिय कार्यालये चांगलीच हादरून गेली आहेत.
आगामी काळात शहरात होर्डिंग, फ्लेक्स, बोर्ड लावायचे (Hoarding) असतील, तर आणखी ज्यादा दर मोजावे लागणार आहेत.  शहरात 222 रुपये प्रति चौरस फुट दर लागू होता. मात्र आता हे दर वाढवले  आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून (PMC sky sign dept) याबाबतचा प्रस्ताव तयार करून  तो स्थायी समिती च्या (Standing Committee) माध्यमातून मुख्य सभेसमोर (General body) ठेवला होता. त्यानुसार २०१३-१४ ते २०२२-२३ पर्यंत दरवर्षी १०% दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर 580 प्रती चौरस फुट होणार आहेत. तसेच नवीन महापालिका हद्दी साठी देखील नवीन दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मुख्य सभेने नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने यावर कार्यवाही करणे सुरु केले आहे. त्यानुसार प्रस्ताव देखील घेणे सुरु झाले आहे.
दरम्यान महापालिका आयुक्त यांच्याकडून अनधिकृत होर्डिंगच्या कारवाई वर गंभीरपणे लक्ष दिले आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला उद्दिष्टे देखील देण्यात आली आहेत. आकाशचिन्ह विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यासाठी शनिवारी आणि रविवारी देखील कामावर हजर राहण्यास सांगितले जात आहे. होर्डिंग वर कारवाई करताना समाविष्ट गावात काही कर्मचाऱ्यांना मारहाण देखील झाली आहे. कारवाईच्या वेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे काही क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करताना हयगय केली जात आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान नगर रोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून होर्डिंग कारवाई करण्यात हलगर्जीपणा केला म्हणून महापालिका आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांची तडकाफडकी बदली देखील केली. त्यांच्या जागी क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता नामदेव बजबळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बनकर यांच्याकडे स्थानिक संस्था कर या पदाचा पदभार तसाच ठेवण्यात आला आहे. तसेच आयुक्तांनी नवीन अधिकाऱ्यांना कारवाई कडक करण्यास सांगितले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेने मात्र आकाशचिन्ह विभागाकडे काम करणारे कर्मचारी मात्र हादरून गेले आहेत.

Kothrud : Girish Gurnani : पावसाळ्यापूर्वी कोथरूडमधील सर्व कामे पूर्ण करावीत : गिरीश गुरनानी यांची मागणी

Categories
PMC पुणे

पावसाळ्यापूर्वी कोथरूडमधील सर्व कामे पूर्ण करावीत

: कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांची मागणी

पुणे : पावसाळा सुरू होण्यास काही महिनेच उरले आहेत. प्रत्येक वर्षी पावसामुळे कोठे ना कोठे मोठे नुकसान होत असते. याचीच दक्षता म्हणून कोथरूडमध्ये पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत. मागच्याचवर्षी काही झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरले, काही भागात झाडे पडली, फलक उन्मळून पडली, उघड्या डींपीमध्ये पाणी शिरले, अशा भरपूर गोष्टींमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, असे निवेदन कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड क्षेत्रिय अधिकारी केदार वझे यांना यावेळी दिले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्यावर्षीप्रमाणे यावषी ही परिस्थिती येऊ नये यासाठी आपण पावसात पाणी तुंबणाऱ्या भागांची पाहणी करावी, चेंबर साफ करावी, पूरनियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा. पावसाळ्यात गटारे तुबुंन घाणीचे साम्राज्य पसरले जाते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो त्याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच मान्सून पूर्व नियंत्रण उपाययोजनांशी स॔ब॔धित कामे प्राधान्याने पार पाडावीत, इ. सर्व कामे जर पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्यास नागरिकांना होणाऱ्या मोठ्या त्रासातून मुक्तता होईल.

यावेळी राष्ट्रवादी युवक चे शशांक काळभोर, सौरभ ससाणे,संकेत शिंदे आदि उपस्थित होते.