Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन

Categories
Breaking News cultural Education social पुणे महाराष्ट्र
Spread the love

अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर, ता-जुन्नर,जि-पुणे. येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने , “जागतिक पुस्तक दिन”मोठ्या आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी दिली.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विविध ग्रंथांचे पूजन करण्यात आले. ग्रंथांमध्ये सर्व धर्मांचे धर्मग्रंथ तसेच भारताचे संविधान व इतर अनेक ग्रंथ ठेवण्यात आले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एम. शिंदे यांच्या शुभहस्ते कै.श्रीकृष्ण तांबे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रंथ दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. ढोल, ताशा,सनई, टाळ. मृदुंग,या पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजवलेल्या बैलगाडी मधून ही मिरवणूक कै.श्रीकृष्ण तांबे ग्रंथालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती. सदर मिरवणुक व ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थी – विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य करत व फुगड्या खेळत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून “माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा” माजी विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर गायकवाड, श्री भूपेंद्र शेटे, श्री अक्षय शेटे, श्री दीपक वाघमोडे, संतोष आहेर, श्री प्रणीत पारधी यांच्या आर्थिक सहकार्यातून महाविद्यालयात साकार करण्यात आलाआहे. त्याचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. उपप्राचार्य डॉ. एस.एफ. ढाकणे उपप्राचार्य.डॉ.के.डी सोनावणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अमृत बनसोडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल डॉ. निलेश हांडे मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंत गावडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अनिल लोंढे, श्री प्रमोद थोरवे ,श्री गणेश डुंबरे व निखिल काकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.