FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!

 

FIR on Ravindra Dhangekar PMC Chief Engineer Abuse | Pune | Abusing the PMC HOD of Water Supply Department and the Chief Engineer of Pune Municipal Corporation has done well to MLA Ravindra Dhangekar. A case has been registered against Dhangekar at Chatushrungi Police Station on Monday night after the protest of PMC Engineers Association. (Pune Municipal Corporation Latest News)

PMC Chief Engineer Nandkishore Jagtap, Head of Water Supply Department of Pune Municipal Corporation, has filed a complaint in this matter. Based on that, a case has been registered against MLA Dhangekar under section 353 for obstructing the government work and for abusing him. The Municipal Corporation organized a program on the Republic Day to inaugurate the water tank constructed by the Municipal Corporation at Ashanagar in Gokhalenagar area.

Meanwhile, MLA Dhangekar had threatened Nandkishore Jagtap, the head of water supply department of the Municipal Corporation, by abusing him in Aravachy language, accusing the Congress party of dropping the relevant program. His video went viral on social media.

Meanwhile, the Municipal Corporation’s Engineer’s Association held a meeting on Monday and protested against Dhangekar’s action. After that, the officials reached the Chatushringi police station and registered a case against Dhangekar.

FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल!

Categories
Breaking News PMC social पुणे

FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल!

FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse |  पुणे | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे (PMC HOD of Water Supply Department) प्रमुख तथा मुख्य अभियंता (PMC Chief Engineer) यांना शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या (PMC Engineers Association) निषेधानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात (Chatushrungi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बळ मिळाले आहे.  (Pune Municipal Corporation Latest News)

 पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार धंगेकर यांच्याविरुद्ध कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोखलेनगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दरम्यान, संबंधित कार्यक्रमास कॉंग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून आमदार धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

दरम्यान, महापालिकेच्या अभियंता संघाने याप्रकरणी सोमवारी सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे गाठून धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके चे प्रकाशन

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके चे प्रकाशन

 

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके (PMC Engineer Association Calendar) चे प्रकाशन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांचे हस्ते करण्यात आले. (Pune Municipal Corporation)

यावेळी अतिरिक्त महा आयुक्त   रविन्द्र बिनवडे , डॉ. कुणाल खेमनार , शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे, सुनिल कदम , मुकुंद बर्वे, संजय पोळ, अजय मोरे हे उपस्थित होते.

Engineer’s Day | PMC Cycle Rally | पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन च्या सायकल रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News PMC social पुणे

Engineer’s Day | PMC Cycle Rally | पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन च्या सायकल रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

Engineer’s Day | PMC Cycle Rally | अभियंता दिनाचे (Engineers Day) औचित्य साधून पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन (PMC Engineers Association) च्या वतीने शनिवार ३० सप्टेंबर  रोजी पुणे शहरात भव्य सायकल रॅलीचे (Cycle Rally) आयोजन करण्यात आले. सायकल रॅलीस पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशी माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)
सायकल रॅली दरम्यान पर्यावरण विषयक जनजागृती व स्वच्छता चे संदेश देण्यात आले. यावेळी गोवा येथील वर्ल्ड चैम्पियनशिप  स्पर्धा पूर्ण करणारे विशाल पाटील आणि एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेक आणि ईतर सायकल रैली करणारे नितीन  देडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane),  मनपा अधिकारी, सेवक उपस्थित होते. रॅली जंगली महाराज रस्त्याने अलका चौक, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता मार्गाने मनपा भवन या मार्गे संपन्न झाली. (PMC Pune)

Engineer Day | PMC Cycle Rally | पीएमसी इंजिनिअर असोसिएशन कडून अभियंता दिन सायकल रॅलीचे आयोजन 

Categories
Breaking News PMC social पुणे

Engineer Day | PMC Cycle Rally | पीएमसी इंजिनिअर असोसिएशन कडून अभियंता दिन सायकल रॅलीचे आयोजन

 

Engineer Day | PMC Cycle Rally | पीएमसी इंजिनिअर असोसिएशन (PMC Engineers Association) कडून अभियंता दिनानिमित्त Engineer Day)) शनिवारी अभियंता दिन सायकल रॅली २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीसाठी मर्यादीत प्रवेश असून ५०० सायकल स्वारासाठी प्रवेश असणार आहेत. अशी माहिती असोसिअशन चे सुनील कदम (Sunil Kadam) यांनी दिली.

रॅलीमार्ग :

मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – अलका टॉकीज चौक – टिळक रोड – अभिनव कॉलेज – बाजीराव रोड – मनपा भवन.
सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे फॉर्म भरावा. प्रथम सहभाग घेणाऱ्या ५०० सायकलस्वारांना टि- शर्ट देण्यात येणार आहे. तसेच अल्पोपहार व चहाची सोय करण्यात आली आहे. प्रवेश विनामूल्य काही शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा.

संपर्क क्रमांक : ९६८९९३१७७७ / ९६८९९३७२७५ / ९९२१९७६९३८ / ८६६८७१२३८२ / ९६८९९३१५१४ / ९६८९९३९७९८ / ९६८९९३१०९४

१) शनिवार दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७:०० वाजता पुणे महानगरपालिका मुख्य भवन शिवाजीनगर, पुणे ४११००५ या ठिकाणी जमावे. रॅली समाप्ती नंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
२) प्रथम सहभाग घेणाऱ्या ५०० सायकलस्वारांना टिशर्ट वाटप कर करण्यात येणार आहे. टी शर्ट सकाळी ६:३० वाजल्या पासून देण्यात येणार आहेत.

सायकल रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करुन आपला सहभाग लवकरात लवकर निश्चित करावा. असे आवाहन असोसिअशन च्या वतीने करण्यात आले आहे.

 

Link for registration
https://forms.gle/YTWZnjPnWTDqZJmdA

PMC Engineer’s Association | पुणे महापालिकेतील अभियंता संवर्गाची सेवाजेष्ठता यादी चुकीची | पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन चा आरोप

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Engineer’s Association | पुणे महापालिकेतील अभियंता संवर्गाची सेवाजेष्ठता यादी चुकीची

| पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन चा आरोप

| यादी दुरुस्त करून सरळ सेवा भरती रद्द करण्याची मागणी

PMC Engineer’s Association  | पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) मधिल अभियंता संवर्गाची (Engineer Cadre) सेवा जेष्ठता यादी (Seniority List) नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठीची (Junior Engineer) सेवा जेष्ठता यादी पूर्णपणे चुकीची आहे. असा आरोप पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन (PMC Engineers Association) ने केला आहे. तसेच अभियंता संवर्गाची सेवा जेष्ठता यादी रुजू दिनांकापासून गृहीत धरून दुरुस्त करण्यात यावी आणि कार्यकारी अभियंता पदासाठी राबविण्यात येणारी सरळ सेवाभरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. अशी मागणी असोसिएशन कडून महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे करण्यात आली आहे. (PMC Engineer’s Association)

असोसिएशन च्या अध्यक्ष मुक्ता मनोहर (Mukta Manohar) यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत नुकतेच पत्र दिले आहे. त्यानुसार कनिष्ठ अभियंता पदाच्या सेवाज्येष्ठता  यादीमध्ये महापालिके मध्ये रुजू झाल्याचा दिवस गृहीत न धरता भरती परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर सेवा जेष्ठता गृहीत धरली आहे. यामुळे अनेक अभियंत्यांची सेवा जेष्ठता डावलली गेली असून अशा अभियंत्यांवर अन्याय होत आहे. या बाबत अनेक अभियंत्यांनी हरकत नोंदविली आहे. मात्र या हरकतींवर सुनावणी न घेता सदर सेवा जेष्ठता यादी मे. राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. यापूर्वी कोणतीही सेवा जेष्ठता यादी. राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेली नाही. मग हिच यादी राज्य शासनाकडे पाठविण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्न असोसिएशन ने विचारला आहे. (PMC Pune Employees)
पत्रात पुढे म्हटले आहे कि, त्याच प्रमाणे पुणे महानगरपालिके मध्ये कार्यकारी अभियंता पदावर सरळ सेवा भरतीने अभियंत्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याच्या बातम्या विविध वर्तमानपत्रां मधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता या पदासाठी पात्र अभियंते नसल्याने सरळ भरती होणार  असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. ही बाबही चुकीची आहे. पुणे महानगरपालिके मध्ये कार्यकारी अभियंता या पदासाठी आवश्यकती पात्रता अभियंते कार्यरत आहेत. या सर्व अभियंत्यांची किमान २० वर्ष सेवा झालेली आहे. यातील अनेक अभियंते दविपदवीधर आहेत. या सर्वांना पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. हे अभियंते अनेक वर्ष बढतीच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. या अभियंत्यांना डावलून बाहेरून भरती केल्यास त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार असून त्यांच्यावर अन्याय होणार आहे. या दोन्ही निर्णयांमुळे अभियंता संवर्गात तीव्र नाराजी पसरली असून सर्व अभियंते आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत आले आहेत. यामुळे या दोन्ही निर्णयांचा तातडीने फेरविचार करणे आवश्यक आहे.
तरी पुणे महानगरपालिके मधिल अभियंता संवर्गाची सेवा जेष्ठता यादी रुजू दिनांकापासून गृहीत धरून दुरुस्त करण्यात यावी आणि कार्यकारी अभियंता पदासाठी राबविण्यात येणारी सरळ सेवाभरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. (PMC Pune Employees Promotion)
News Title | PMC Engineer’s Association |  Seniority list of Engineer cadre is incorrect
 |  Allegation of PMC Engineers Association