Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water cut on Thursday | गुरूवार  रोजी पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर, व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, वारजे माळवाडी व रामनगर परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा  दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा
केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग :- संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्पीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी..
जुने वारजे जलकेंद्र:- माळवाडी, विठठलनगर ज्ञानेश सोसायटी, अमरभारत सोसायटी, गणपतीमाथा परिसर, सहयोगनगर, गोकूळनगर पठार, अहिरेगाव, रामनगर, गणेशपुरी सोसायटी, पॉप्युलर कॉलनी व इतर
गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन
गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती,
कॅनॉल रोड, राम नगर, शिवणे इंडस्ट्रीयल एरिया.
पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ.
वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर:- कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०
चतुश्रुंगी टाकी परिसर :- सकाळनगर औंधं रोड, आयटीआय रोड, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी पाषाण निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण काही भाग चव्हाण नगर पोलीस लाईन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध
उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्ती पर्यंत,बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इत्यादी.
एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) टाकी परिसर :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी ,गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण

Pune Water Crisis | PMC Pune | यंदा उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) मोठया प्रमाणात पाणीकपात करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र महापालिकेला असे करणे परवडणारे नाही. नागरिक आणि राजकीय लोकांचा रोष महापालिकेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने संयत  भूमिका घेत सध्या तरी पाणीकपात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीकपाती बाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे  पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी The Karbhari शी बोलताना सांगितले. (Pune Water Cut)
शहरी आणि ग्रामीण भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी डिसेंबर पासून दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून (Department of Water Resources) महापालिकेला (PMC Pune) करण्यात आल्या आहेत. (PMC Pune News)

जलसंपदा विभागाने म्हटले आहे कि, सद्यस्थितीतखडकवासला प्रकल्पामध्ये ७६८.२८ दलघमी ( २५.२२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी लागणारे पाणी ८.५४ टीएमसी वजा जाता १६.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे मनपास २७४ दिवसांसाठी १६२५ एमएलडी प्रमाणे २०.९४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतू सध्याच्या पाणीवापराप्रमाणे पुणे मनपास २४४ दिवसांसाठी १३०० ते १२५० एमएलडी प्रमाणे २.८० ते
३.२३ टीएमसी इतका पाणीवापर होईल. म्हणजे पालिकेला दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान जलसम्पदा विभागाच्या पत्रावर पालिकेने अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. याबाबत जगताप यांनी सांगितले कि पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे.

| महापालिका 200 एमएलडी पाणी वाचवणार

जगताप यांनी सांगितले कि महापालिका येत्या 8 दिवसात कुठलीही कपात न करता महापालिका 150 MLD पाणी बचत करणार आहे. कारण फुरसुंगी गावाला 172 एमएलडी पाणी कॅनॉल मधून दिले जाते. खडकवासला धरणातून हे पाणी दिले जाते. फुरसुंगी गावाची गरज ही 22 एमएलडी ची आहे. मात्र पाणी गळती जमेस धरून एवढे पाणी सोडावे लागते. मात्र आता हे पाणी बंद पाईपलाईन मधून घेतले जाणार आहे. बंद पाईपलाईन झाल्याने महापालिका फक्त आवश्यक 22 एमएलडी च पाणी उचलणार आहे. बाकी 150 एमएलडी पाणी बचत होणार आहे. तसेच जगताप यांनी सांगितले कि अजून 50 एमएलडी पाण्याची बचत आम्ही करू शकतो. असे 200 एमएलडी पाणी आम्ही बचत आम्ही कुठलीही कपात न करता करणार आहोत. याबाबत लवकरच पाटबंधारे विभागाला अवगत केले जाईल.

PMC pune Officers | पथ विभागाची जबाबदारी अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे तर पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी नंदकिशोर जगताप यांच्याकडे | मुख्य कामगार अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार नितीन केंजळे यांच्याकडे

Categories
Breaking News PMC पुणे

PMC pune Officers |  पथ विभागाची जबाबदारी अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे तर पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी नंदकिशोर जगताप यांच्याकडे

| मुख्य कामगार अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार नितीन केंजळे यांच्याकडे

PMC Pune Officers | पुणे | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) सेवेतून मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी आणि मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यानुसार या जागेवर पदोन्नतीने पात्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune News)
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पथ विभागाची (PMC Road Department) जबाबदारी ही मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पाणीपुरवठा विभागाची (PMC Water Supply Department) जबाबदारी मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांच्याकडे देण्यात आली आहे. या दोघांनाही अधिक्षक अभियंता या पदावरून मुख्य अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पावसकर यांना नुकतीच पदोन्नती देण्यात आली. तर जगताप यांना यापूर्वीच पदोन्नती देण्यात आली होती. (Pune Municipal Corporation News)
दरम्यान मुख्य कामगार अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार हा कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale) यांच्याकडे देण्यात आला आहे. कारण केंजळे यांच्या पदोन्नतीची शिफारस पदोन्नती समितीने केली असली तरी विधी समितीने आणि मुख्य सभेने याबाबतचा प्रस्ताव मान्य केलेला नाही. त्यामुळे त्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

PMC Chief Engineer | मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीने नंदकिशोर जगताप यांची केलेली शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप

Categories
Breaking News PMC पुणे

PMC  Chief Engineer | मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीने नंदकिशोर जगताप यांची केलेली शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप

| पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

PMC Chief Engineer | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) पदोन्नती समितीने (Promotion Committee) नुकतीच अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtgp) यांची मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती करण्यासाठी शिफारस केलेली आहे. मात्र ही शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (INC Pune City President Arvind Shinde) यांनी केला आहे. तसेच ही शिफारस मान्य करू नये, असे पत्र देखील त्यांनी महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) दिले आहे. (PMC Chief Engineer)

शिंदे यांच्या पत्रानुसार पदोन्नत्तीसाठी केवळ सेवा ज्येष्ठता हा निकष लागू केलेला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. वास्तविक मुख्य अभियंता हे पद अतिशय
जबाबदारीचे असून त्या पदाअंर्तगत पूर्ण पुणे शहराचा तांत्रिक कार्यभार येत आहे. नंदकिशोर जगताप हे अकार्यक्षम बेजबाबदार, बिनकामाचे अधिकारी असून अधिक्षक अभियंता पदी त्यांची कामगिरी कागदोपत्री व शिक्क्याने समाधानकारक दाखवली गेली असली तरी वास्तवात अतिशय सुमार आहे. २४ x ७ पाणीयोजना हा प्रकल्प रखडण्यामागे जगताप यांची सुमार दर्जाचा प्रशासकिय अमंल ठेकेदार धार्जिणा व्यवहार, लोक प्रतिनिधींसमोर सपशेल शरणागती पत्करून नियमबाह्य
काम करण्याची उपजत प्रवृत्ती ह्या गोष्टी आहेत. २४ x ७ पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी टेंडर काम सुरू असताना देखील अनेक खाजगी सोसायट्यांमध्ये नियम बाह्य पाणी कनेक्शन देण्यामागे जगताप यांचा हात असल्याचे वारंवार मी प्रभारी मुख्य अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. (Pune Municipal Corporation News)
पत्रात शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, जगताप यांना पाणी पुरवठा सारख्या सवेंदनशिल विभागाचे पुणे शहराचा कार्यभार सुपूर्त करणे ही पुणेकरांसाठी निश्चितच त्रासदायक बाब आहे. पदोन्नती समितीने राजकीय तसेच आर्थिक दबावापोटी केलेली आक्षेपार्ह शिफारस ही पुणे शहरासाठी अडचणीची ठरू शकते.  जगताप यांच्या कामगिरीचा वस्तुनिष्ठ अहवाल, त्रयस्त निमशासकीय समितीवर अवलोकित यावा. याशिवाय श्री. जगताप यांचे पदोन्नतीची शिफारस मुख्य सभेने मान्य करू नये. अन्यथा कायदेशिर दाद मागितली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे. (PMC Pune Promotion)
—-
News Title | PMC Chief Engineer | Allegation that the recommendation of Nandkishore Jagtap by the Promotion Committee for the post of Chief Engineer was objectionable

PMC Pune Chief Engineer | नंदकिशोर जगताप यांची मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीकडून शिफारस!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Chief Engineer | नंदकिशोर जगताप यांची मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीकडून शिफारस!

PMC Pune Chief Engineer | (Author: Ganesh Mule) | महापालिकेतील मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समिती ने नंदकिशोर जगताप यांची शिफारस केली आहे. सेवाज्येष्ठतेने (seniority) पदोन्नतीच्या (Promotion) माध्यामातून हे पद भरले जाणार आहे. यासाठी महापालिकेतील तीन अधिक्षक अभियंता पात्र होत होते. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे प्रकरण तयार करून ते महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीच्या बैठकी (Promotion Committee) समोर ठेवले होते. समितीने यासाठी नंदकिशोर जगताप यांची शिफारस केली आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. (PMC Pune Chief Engineer)

पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता हे पद रिक्त आहे. राजेंद्र राऊत सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.  मुख्य अभियंता हे पद पदोन्नतीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाज्येष्ठता हा निकष लागू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने मागील वर्षी जून महिन्यात पदोन्नतीची प्रक्रिया सुरु केली होती.  नंतर काही तांत्रिक कारणाने ऑगस्ट महिन्यापर्यंत  वेळ वाढवून देण्यात आला. पुन्हा ही मुदत 31 मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली. कारण काही अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल (Confidential Report) मिळाले नाहीत. गोपनीय अहवालामुळे याला उशीर झाला. त्यानंतर प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली होती. (PMC Pune Chief engineer)
सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीनुसार पदोन्नतीच्या माध्यमातून यासाठी तीन अधिकारी पात्र होत होते. त्यात अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) , अधिक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) आणि अधिक्षक अभियंता  नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांचा समावेश होता. प्रशासनाने हे प्रकरण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समिती बैठकीत ठेवले होते. त्यानुसार या पदासाठी  समितीने नंदकिशोर जगताप यांची शिफारस केली आहे. आता याबाबतचे विषयपत्र विधी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवले जाईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune water supply department chief engineer)
—-
News Title |PMC Pune Chief Engineer | The promotion committee recommended Nandkishore Jagtap for the post of Chief Engineer!

Audit | Water Reservior | महापालिका पाण्याच्या टाक्यांचे करणार ‘ऑडिट’!  | पाण्याची गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिका पाण्याच्या टाक्यांचे करणार ‘ऑडिट’!

| पाण्याची गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न

पुणे | पाण्याचा प्रत्यक्ष वापर करावा, त्याचप्रमाणे पाण्याची गळती लक्षात घेऊन त्याची दुरुस्ती करावी, यासाठी महापालिका आता पाण्याच्या टाक्यांचे ऑडिट करणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत गंभीरपणे लक्ष दिले असून पाणीपुरवठा विभागाला तशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने देखील याचे नियोजन सुरु केले आहे. अशी माहिती अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.
शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट झालेली 34 गावे यामुळे महापालिकेचा पाणीवापर वाढला आहे. सद्यस्थितीत महापालिका दिवसाला 1650 MLD पेक्षा अधिक पाणी वापरत आहे. म्हणजेच प्रतिमहिना 1.5 TMC पाण्याची आवश्यकता महापालिकेला आहे. खडकवासला धरण साखळी, भामा आसखेड, पवना अशा वेगवेगळ्या धरणातून महापालिका पाणी उचलत आहे. असे असतानाही शहरच्या काही भागातून पाणी कमी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तर दुसरीकडे महापालिका पाणी वापर जास्त करते, असा आरोप जलसंपदा विभागाकडून वारंवार केला जातो. याकडे आता महापालिका आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. पाण्याचा प्रत्यक्ष वापर करावा, त्याचप्रमाणे पाण्याची गळती लक्षात घेऊन त्याची दुरुस्ती करावी, यासाठी महापालिका आता पाण्याच्या टाक्यांचे ऑडिट करणार आहे.
याबाबत अधीक्षक अभियंता जगताप यांनी सांगितले कि शहरात सद्यस्थितीत पाण्याच्या जुन्या टाक्या 83 आहेत. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 41 टाक्या बांधून झाल्या आहेत. त्यानुसार या टाक्यांचे ऑडिट होईल. यामध्ये धरणातून उचलले जाणारे पाणी, पाणी टाकीपर्यंत येताना होणारी गळती, टाकीत किती पाणी पोहोचते, टाकीतून संबंधित परिसराला किती पाणी जाते, जेवढ्या लोकसंख्येला आवश्यक आहे तेवढे पाणी जाते का, तिथे जाताना किती गळती होते, या सगळ्याचा अभ्यास केला जाईल. यामध्ये पाणी गळती होत असेल तर दुरुस्त करून पाणी वाचवणे हा मुख उद्देश आहे.

| मशीन टू मशीन होणार काम

जगताप पुढे म्हणाले, हे काम मशीन टु मशीन केले जाणार आहे. शहरात 90 हजार मीटर लागले आहेत. पाण्याच्या टाक्यांना देखील मीटर बसवण्याचे काम सुरु आहे. यामुळे सगळा डेटा मशीनमध्येच फीड होऊन जाईल. हातोहात काम करण्याची कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. त्याचा अहवाल तयार करून आयुक्तांना दिला जाईल.