CHS Portal | PMC Health Service | CHS पोर्टल वर माहिती नाही भरली कर्मचाऱ्यांना पत्र दिले जाणार नाही | अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

CHS Portal | PMC Health Service | CHS पोर्टल वर माहिती नाही भरली कर्मचाऱ्यांना पत्र दिले जाणार  नाही

| अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

CHS Portal | PMC Health Service | पुणे महापालिका कर्मचारी (PMC Pune Employees) आणि आजी माजी नगरसेवकांना (Corporators) आरोग्य सुविधा देण्यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) अंशदायी वैद्यकीय सहायता योजना (CHS) चालवली जाते.  या योजनेसाठी महापालिका प्रशासनाकडून एक पोर्टल (CHS Portal) तयार करण्यात आले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती ऑनलाईन भरण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत. मात्र ही माहिती देण्याबाबत कर्मचाऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे आता आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी माहिती नाही भरल्यास कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधेचा लाभ देण्याबाबतचे पत्र दिले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. (CHS Portal | PMC Health Service) 

अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या सेवकांसाठी व सेवानिवृत्त सेवकांसाठी आरोग्य कार्यालयामार्फत अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना राबविण्यात येते. या योजनेची ओळखपत्र (CHS कार्ड) सभासदांना देताना सभासदांची माहिती ऑफलाईन (Offline) पद्धतीने रजिस्टर मध्ये नोंदविण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation). या योजनेच्या सभासदांना त्यांचेवर अवलवून असणाऱ्या कुटुंबीयांची माहिती Online पद्धतीने भरण्यासाठी http://chs.punecorporation.org ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये सभासदांनी त्यांची व त्यांचेवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांची CHS कार्ड वर असणारी माहिती या लिंक वर भरावी. ही माहिती जून अखेर पर्यंत भरावी, असे आदेशात म्हटले होते. मात्र याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. (PMC CHS Portal)

अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वॉर्ड ऑफिस मधील 7423 पैकी फक्त 3554 कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे. शिक्षण विभागातील 2356 पैकी फक्त 755 कर्मचारी, झोनल कार्यालयातील 110 पैकी 105 कर्मचाऱ्यांनी, आरोग्य विभागातील 1663 पैकी 915 कर्मचाऱ्यांनी, पाणीपुरवठा विभागातील 937 पैकी फक्त 384 कर्मचाऱ्यांनी माहिती भरली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले कि कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिलेली असताना देखील कर्मचारी माहिती देण्याबाबत उदासीन दिसत आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर माहिती भरणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना पत्र दिले जाणार नाही.
—–
ही माहिती फक्त आरोग्य विभागाच्या माहितीसाठी घेतली जात आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा दिली जाईल. ही माहिती कुठल्या त्रयस्थ संस्थेला बिलकुल ही दिली जाणार नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी निर्धास्त असावे.
रविंद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 
——
News Title |