CHS Portal | PMC Health Service | CHS पोर्टल वर माहिती नाही भरली कर्मचाऱ्यांना पत्र दिले जाणार नाही
| अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा कर्मचाऱ्यांना इशारा
अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या सेवकांसाठी व सेवानिवृत्त सेवकांसाठी आरोग्य कार्यालयामार्फत अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना राबविण्यात येते. या योजनेची ओळखपत्र (CHS कार्ड) सभासदांना देताना सभासदांची माहिती ऑफलाईन (Offline) पद्धतीने रजिस्टर मध्ये नोंदविण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation). या योजनेच्या सभासदांना त्यांचेवर अवलवून असणाऱ्या कुटुंबीयांची माहिती Online पद्धतीने भरण्यासाठी http://chs.punecorporation.org ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये सभासदांनी त्यांची व त्यांचेवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांची CHS कार्ड वर असणारी माहिती या लिंक वर भरावी. ही माहिती जून अखेर पर्यंत भरावी, असे आदेशात म्हटले होते. मात्र याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे. (PMC CHS Portal)
ही माहिती फक्त आरोग्य विभागाच्या माहितीसाठी घेतली जात आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा दिली जाईल. ही माहिती कुठल्या त्रयस्थ संस्थेला बिलकुल ही दिली जाणार नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी निर्धास्त असावे.