Bankrupt banks | MP Supriya Sule | बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी |खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश महाराष्ट्र

बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी

|खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

दिल्ली| बुडीत बॅंकांच्या (Bankrupt Banks) ठेवीदार आणि खातेदारांचे (Consumers) पैसे (Deposits) परत लवकरात लवकर त्यांना मिळावेत यासाठी अशा बँकांची कर्ज वसुली, संपत्ती जप्ती आदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आज लोकसभेत (Lok sabha) प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान (Question Hour) केली.

एखादी बँक जेव्हा बुडीत जाहीर केली जाते. त्यावेळी त्या बँकेचे खातेदारांना आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यास खूप मोठा कालावधी लागतो. संबंधित बॅंकेच्या बुडीत कर्जदारांची संपत्ती अटॅच करणे त्यानंतर तडजोड किंवा विक्री करुन त्यातून उभा राहिलेल्या पैशातून खातेदार आणि ठेवीदारांचे पैसे देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न चांगला आहे. पण त्यासाठी मोठा कालावधी लागतो. या प्रक्रियेदरम्यान संबंधीत बँकेच्या खातेदारांना आपले पैसे कधी मिळणार याची शाश्वती नसते. त्यांना बँक, किंवा प्रशासकांकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नाही. महाराष्ट्रातील पीएमसी बँक हे त्याचे उदाहरण म्हणून सांगता येईल, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

बुडीत बँकांच्या ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता, या बँकांची कर्ज प्रकरणे आणि ती वसुली तसेच संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. बँक बुडविणारे तुरुंगात जातात, पण सर्वसामान्य खातेदार व ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास अनेक अडचणी येतात. त्यांची खाती गोठविली जातात. परिणामी त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. त्यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा यावेळी खसदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

अर्थमंत्र्यांकडून सुप्रिया सुळे यांचे कौतुक

ही मागणी अगदी योग्यच असल्याचे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खासदार सुळे यांचे कौतुक तर केलेच शिवाय ही प्रक्रिया न्यायालयीन तपास यंत्रणेमुळे आणखी क्लिष्ट होत जाते. त्यामुळे अनावश्यक वेळ जातो, असे स्पष्ट केले. एखाद्या अशा बँकेच्या थकीत कर्जरदाराची संपत्ती जप्त केलेली असते. ते जप्ती प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असते. तो तपास आणि त्या संपत्ती मधील नेमका कोणता वाटा बँकेला मिळणार आहे, आणि त्यातून ग्राहकांच्या ठेवी परत करण्यास मदत होईल, याबाबत न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत काहीही निर्णय घेता येत नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागतो. असे असले तरी खातेदारांना न्याय मिळायला हवा. हे लक्षात घेऊन यासाठी काय करता येईल, ही प्रक्रिया कशी सोपी करता येईल, यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Bank employees strike| महत्वाची कामे उरकून घ्या | बँक कर्मचाऱ्यांचा ‘5-डे वीक’च्या मागणीसाठी संप | तीन दिवस बँका राहणार बंद

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

बँक कर्मचाऱ्यांचा ‘5-डे वीक’च्या मागणीसाठी संप

|तीन दिवस बँका राहणार बंद

देशातील सरकारी बँकांचे कर्मचारी या महिन्यात संपावर जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी येत्या २७ जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बँकांच्या एकूण ९ कर्मचारी संघटनांनी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्मचारी जर २७ जून रोजी संपावर गेले तर सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. कारण २५ जून रोजी या महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि २६ जून रोजी रविवार आहे. त्यात २७ जून रोजी कर्मचाऱ्यांनी संप केल्यास सलग तीन दिवस बँकांचं कामकाज बंद राहील. त्यामुळे तुमचं काही बँकेचं महत्वाचं काम असेल तर या कालावधीआधीच उरकून घ्या. नाहीतर अडचणींचा सामना करावा लागेल.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनकडून गेल्या अनेक महिन्यांपासून कामकाज आठवड्यातून ५ दिवसांचं असावं अशी मागणी केली जात आहे. दर आठवड्यात फक्त पाच दिवसांचं काम असावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. खासगी क्षेत्रातील अनेक बँकांमध्ये या संबंधिचा नियम लागू आहे असं सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा आणि पेन्शन संबंधिच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत, तर कर्मचारी २७ जून रोजी संप करतील अशी भूमिका बँकांच्या युनियननं घेतली आहे.

मनी कंट्रोल डॉट कॉमच्या वृत्तानुसार युनायडेट फोरम ऑफ बँक युनियनमध्ये (UFBU) देशातील एकूण ९ बँक युनियन्सचा समावेश आहे. याशिवाय ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्लॉई असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर यांनीही संपात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे.

तीन दिवस बँका राहणार बंद
बँक कर्मचारी २७ जून रोजी संपावर गेले तर ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. कारण २७ जून रोजी संपाचा दिवस सोमवार आहे. २६ जून रोजी रविवार आणि २५ जून महिन्याचा शेवटचा शनिवार आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहतील.

Banking Time : बँकांच्या वेळेबाबत महत्वपूर्ण बातमी  : ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

बँकांच्या वेळेबाबत महत्वपूर्ण बातमी

: ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार

: आरबीआयची माहिती

नवी दिल्ली : बँक  संबंधित काम पूर्ण करण्यासाठी आता १ तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. १८ तारखेपासून बँका सकाळी १० च्या ऐवजी सकाळी ९ वाजल्यापासून उघडण्यास ससुरुवात झाली आहे. आरबीआयने बँका उघडण्याचे तास बदलले आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी १ तास अतिरिक्त मिळेल; मात्र बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे पूर्वीच्या वेळेत बँका बंद होतील.

परकीय चलन बाजार आणि सरकारी रोख्यांमधील व्यवहार आता बदललेल्या वेळेनुसार होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह, रुपयाचे व्याजदर डेरिव्हेटिव्ह, कॉर्पोरेट बाँडमधील रेपो इत्यादी फॉरेन एक्स्चेंज (एफसीआय)/भारतीय रुपया यातील व्यवहार सकाळी १० वाजता ऐवजी ९ वाजता पासून सुरू झाले आहेत.

सर्व बँकांना नियम होणार लागू –


कोरोना विषाणूच्या साथीमुळे आरबीआयने बँकिंगचे तास कमी केले होते. बँकेत एकाच दिवसात जास्त लोक नसावेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता; मात्र आता हे नियम पुन्हा सामान्य करण्यात आले आहेत. देशात एसबीआयसह ७ सरकारी बँका आहेत. याशिवाय देशात २० हून अधिक खासगी बँका आहेत. नवा नियम या सर्व बँकांना लागू होणार आहे.

कार्डलेस एटीएममधून लवकरच व्यवहाराची सुविधा
–  आरबीआय लवकरच ग्राहकांना यूपीआय वापरून बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची परवानगी देणार आहे.
–  कार्डलेस म्हणजेच कार्डलेस व्यवहार वाढविण्यासाठी आरबीआय हे करणार आहे.
–  यासाठी सर्व बँका  त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा यूपीआयद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पर्सनल, वाहन, गृह कर्ज महागले –

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व मुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदानेही कर्जाच्या व्याजदरात नुकतीच वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना आता पर्सनल, वाहन आणि गृह कर्जासाठी अधिक इएमआय द्यावा लागेल.

एसबीआयच्या संकेतस्थळानुसार, ग्राहकांसाठी एका रात्रीपासून ते तीन महिन्यांसाठी कर्ज दर (एमसीएलआर) आता ६.६५ टक्केऐवजी ६.७५ टक्के असेल.

याचवेळी तो सहा महिन्यांसाठी ६.९५% ऐवजी ७.०५% इतका झाला आहे. नवीन दर १५ एप्रिलपासून लागू झाले आहेत. त्यामुळे आता बँक ऑफ बडोदासह एसबीआयचे कर्ज घेणे महाग होणार आहे.