Bank employees strike| महत्वाची कामे उरकून घ्या | बँक कर्मचाऱ्यांचा ‘5-डे वीक’च्या मागणीसाठी संप | तीन दिवस बँका राहणार बंद

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश
Spread the love

बँक कर्मचाऱ्यांचा ‘5-डे वीक’च्या मागणीसाठी संप

|तीन दिवस बँका राहणार बंद

देशातील सरकारी बँकांचे कर्मचारी या महिन्यात संपावर जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी येत्या २७ जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बँकांच्या एकूण ९ कर्मचारी संघटनांनी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्मचारी जर २७ जून रोजी संपावर गेले तर सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. कारण २५ जून रोजी या महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि २६ जून रोजी रविवार आहे. त्यात २७ जून रोजी कर्मचाऱ्यांनी संप केल्यास सलग तीन दिवस बँकांचं कामकाज बंद राहील. त्यामुळे तुमचं काही बँकेचं महत्वाचं काम असेल तर या कालावधीआधीच उरकून घ्या. नाहीतर अडचणींचा सामना करावा लागेल.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनकडून गेल्या अनेक महिन्यांपासून कामकाज आठवड्यातून ५ दिवसांचं असावं अशी मागणी केली जात आहे. दर आठवड्यात फक्त पाच दिवसांचं काम असावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. खासगी क्षेत्रातील अनेक बँकांमध्ये या संबंधिचा नियम लागू आहे असं सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा आणि पेन्शन संबंधिच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत, तर कर्मचारी २७ जून रोजी संप करतील अशी भूमिका बँकांच्या युनियननं घेतली आहे.

मनी कंट्रोल डॉट कॉमच्या वृत्तानुसार युनायडेट फोरम ऑफ बँक युनियनमध्ये (UFBU) देशातील एकूण ९ बँक युनियन्सचा समावेश आहे. याशिवाय ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्लॉई असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर यांनीही संपात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे.

तीन दिवस बँका राहणार बंद
बँक कर्मचारी २७ जून रोजी संपावर गेले तर ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. कारण २७ जून रोजी संपाचा दिवस सोमवार आहे. २६ जून रोजी रविवार आणि २५ जून महिन्याचा शेवटचा शनिवार आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहतील.

Leave a Reply