PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा 2 लाख करा | दिपाली धुमाळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा 2 लाख करा | दिपाली धुमाळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC Shahari Garib Yojana | पुणे | शहरातील नागरिकांना पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा (PMC Shahari Garib Yojana) लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार आहे. तरी ती वाढवून २ लाख रुपये करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच योजनेतील सवलती पूर्वीप्रमाणे ठेवाव्यात, अशीही मागणी धुमाळ यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation)

धुमाळ यांच्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये शहरी गरीब सहाय्य योजनेचा लाभ अनेक नागरिक घेत आहे व अनेक नागरिकांनी घेतलेला आहे. पूर्वी या योजनेच्या अंतर्गत रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंतची सर्व दिवसांचे जे काही हॉस्पिटलचा फी किंवा बिल दिले जायचे त्याच्या निम्मे ५०% बिल माफ करण्यात यायचे. परंतु सध्या पालिकेने यामध्ये बदल केला असून रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर जोपर्यंत शहरी गरीब योजनेचे कार्ड ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करतो तेव्हा पासून पुढचे बिलात सवलत दिली जाते. पूर्वी सारखे संपूर्ण दिवसाच्या बिलात सवलत दिली जात नाही. यामुळे अनेक रुग्णांना नागरिकांना आर्थिक भुर्दड बसत असून अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना सावकारी कर्ज काढण्याची वेळ येत आहे. (PMC Urban Poor Health Scheme)

धुमाळ यांनी पुढे म्हटले आहे कि, त्यामुळे या  योजनेत नव्याने बदल न करता पूर्वीप्रमाणे सवलती मिळाव्यात. तसेच या योजनेचा लाभ अनेक गोर गरीब नागरिक घेत आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार आहे. तरी ती वाढवून २ लाख रुपये करण्यात यावी. असे ही धुमाळ यांनी म्हटले आहे.