PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा 2 लाख करा | दिपाली धुमाळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा 2 लाख करा | दिपाली धुमाळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC Shahari Garib Yojana | पुणे | शहरातील नागरिकांना पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा (PMC Shahari Garib Yojana) लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार आहे. तरी ती वाढवून २ लाख रुपये करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच योजनेतील सवलती पूर्वीप्रमाणे ठेवाव्यात, अशीही मागणी धुमाळ यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation)

धुमाळ यांच्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये शहरी गरीब सहाय्य योजनेचा लाभ अनेक नागरिक घेत आहे व अनेक नागरिकांनी घेतलेला आहे. पूर्वी या योजनेच्या अंतर्गत रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंतची सर्व दिवसांचे जे काही हॉस्पिटलचा फी किंवा बिल दिले जायचे त्याच्या निम्मे ५०% बिल माफ करण्यात यायचे. परंतु सध्या पालिकेने यामध्ये बदल केला असून रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर जोपर्यंत शहरी गरीब योजनेचे कार्ड ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करतो तेव्हा पासून पुढचे बिलात सवलत दिली जाते. पूर्वी सारखे संपूर्ण दिवसाच्या बिलात सवलत दिली जात नाही. यामुळे अनेक रुग्णांना नागरिकांना आर्थिक भुर्दड बसत असून अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना सावकारी कर्ज काढण्याची वेळ येत आहे. (PMC Urban Poor Health Scheme)

धुमाळ यांनी पुढे म्हटले आहे कि, त्यामुळे या  योजनेत नव्याने बदल न करता पूर्वीप्रमाणे सवलती मिळाव्यात. तसेच या योजनेचा लाभ अनेक गोर गरीब नागरिक घेत आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार आहे. तरी ती वाढवून २ लाख रुपये करण्यात यावी. असे ही धुमाळ यांनी म्हटले आहे.

PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या  शहरी गरीब योजनेच्या (PMC Shahari Garib Yojana) उपचारांची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवण्यात यावी. तसेच दुर्धर आजारांसाठी अडीच लाखापर्यंत उपचार देण्यात यावेत. अशी राष्ट्रवादी काँग्रेस कडून (NCP Pune) शहर अध्यक्ष दीपक मानकर (Dipak Mankar) आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव (Bhaiyyasaheb Jadhav) यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार महापालिकेकडून (PMC Pune) शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून 1 लाख 60 हजार रूपये केली आहे. त्यामुळे शहरातील गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. महापालिकेने 2011 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत अद्यापही नागरिकांना 1 लाख रूपयां पर्यंतचे उपचार महापालिकेच्या पॅनेलवरील रूग्णालयात मिळतात. तर काही दुर्धर आजारांसाठी 2 लाखांचे उपचार मिळतात. मात्र, वैद्यकीय उपचाराचा वाढलेला खर्च तसच महागाई लक्षात घेऊन उपचाराच्या खर्चाची मर्यादाही वाढविणे आवश्‍यक असून या योजनेतील कार्डधारकांना सरासकट 2 लाखांचे उपचार मिळावेत तसेच दुर्धंर आजारासाठी अडीच लाखां पर्यंत उपचार केले जावेत. महापालिकेत लोकप्रतिनिधीं नसल्याने शहराचे प्रशासक म्हणून आपल्या पातळीवर हा निर्णय घेतल्यास सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा मिळणार असून याबाबत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.
—-

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 1 लाख 60 हजार करण्यास स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभेसमोर प्रस्ताव

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 1 लाख 60 हजार करण्यास स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभेसमोर प्रस्ताव

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या (PMC Pune )शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेत (Urban poor medical support scheme) आता महापालिका प्रशासनाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी प्रशासनाने ऑनलाईन (Online) सुविधा तयार करत बोगस लाभार्थ्यांना लगाम घातला होता.  या योजनेत आता पर्यंत 1 लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा (Income Limit) असलेल्या कुटूंबानाच सभासद होता येत होते. मात्र, ही उत्पन्न मर्यादा आता 1 लाख 60 हजार रूपये केली जाणार आहे. राज्यशासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या (Mahatma Jyotiba Phule Health scheme) धर्तीवर ही उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. दरम्यान आता आधी महात्मा फुले योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. तो नाही मिळाला तरच शहरी गरिबचा लाभ दिला जाईल. तसेच शहरात परिमंडळ स्तरावर नवीन 5 सेंटर तयार केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (Standing Committee) समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला समितीने नुकतीच मंजूरी दिली आहे. हा प्रस्ताव आता मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे. यावर पुढील बैठकीत चर्चा केली जाईल. (PMC Shahari Garib Yojana)

| पुणे महापालिकेची  शहरी गरीब योजना काय आहे? (what is PMC Punes Urban poor medical support scheme)

महापालिकेने 2008-09 पासून ही योजना सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य असले तरी, महापालिकेकडून केवळ वैद्यकीय केंद्र चालविले जातात. तर काही ठराविक दवाखाने वग़ळता महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रिया, उपचार, तपासण्या होत नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना खासगी दवाखान्यांमद्ये भरमसाठ पैसे मोजून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नागरिकांसाठी पालिकेने 2008-09 पासून ही वैद्यकीय सेवा योजना सुरू केली आहे. त्यात, प्रमुख निकष संबधित कुटूंब महापालिका हद्दीतील असावे तसेच त्यांचे उत्पन्न 1 लाखांच्या आत असावे हे आहे. तर या योजनेसाठी महापालिकेने शहरातील खासगी रूग्णालयांचे पॅनेल तयार केले असून या रूग्णालयात या योजनेत 1 लाखांपर्यंतचे तर इतर काही आजारांसाठी 2 लाखांपर्यंत उपचार दिले जातात. मात्र, 1 लाखांच्यावर 1 रूपया अधिक उत्पन्न असले तरी अनेकांना आर्थिक दुर्बल असूनही उपचार मिळत नाहीत. त्यामुळे, पालिकेने आता उत्पन्न मर्यादा 1 लाख 60 हजार रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Municipal Corporation)

नवीन 5 सेंटर तयार केले जाणार

शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिकेकडून महापालिका भवनात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही लोकांना महापालिका भवनात येण्यासाठी कसरत करावी लागते. याबाबत काही लोकप्रतिनिधींनी महापालिकेकेला शहरात सर्व ठिकाणी सेंटर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 5 परिमंडळ स्तरावर 5 सेंटर तयार केले जाणार आहेत. यासाठी प्रति वर्ष 24 लाखाचा खर्च केला जाणार आहे. (PMC Pune News)

शहरी गरीब योजनेअंतर्गत संगणक प्रणाली राबविताना या असतील  नवीन अटी शर्ती
१. शहरी गरीब योजनेच्या काळात पॅनेलवरील हॉस्पिटलमध्ये अंतर्ररुग्ण उपचार व पुणे मनपा दवाखान्यांमध्ये घेण्यात येणारी जेनेरिक औषधे व कंज्युमेबल्स अशी दोन्ही मिळून मर्यादा ही एक लाखापर्यंत असेल व किडनी, डायलिसीस, हृदयविकार उपचाराची मर्यादा दोन लाखापर्यंत असेल.
२. रेशनिंग कार्डमध्ये समावेश असलेले कुटुंब (पती, पत्नी, २५ वर्षा आतील पहिले २ अपत्य व आई-वडील) या सगळ्यांचे पुणे मनपा हद्दीत रहिवाशी असल्याचा पुरावा व सर्वांचे आधारकार्ड आवश्यक राहील.
३. पॅनेलवरील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णास प्रथम जर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल तर त्या रुग्णास त्या योजनेचा लाभ देण्यात यावा. सदर रुग्णास काही कारणास्तव या योजनेचा लाभ अमान्य झाल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अमान्य झालेला फॉर्म पुणे मनपा मध्ये जमा करून तदनंतरच त्या रुग्णास शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यात येईल.
४. रुग्ण दाखल झाल्यानंतर सर्व हॉस्पिटल्सनी कार्ड ऑनलाईन खातरजमा करून ऑनलाईन पूर्व मान्यता घेणे बंधनकारक राहील.
५. शहरी गरीब योजनेच्या अंतर्गत खोटी कागदपत्रे सादर करून बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणे व त्याचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.
—-
News Title | PMC Shahari Garib Yojana | Approval of the Standing Committee to limit the urban poor scheme to 1 lakh 60 thousand Proposal before the general body meeting

PMC Pune Shahari Garib Yojana | गरिबांनाच मिळतो आहे शहरी गरीब योजनेचा लाभ! | येरवडा परिसरातील गरिबांनी घेतला सगळ्यात जास्त लाभ

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Pune Shahari Garib Yojana | गरिबांनाच मिळतो आहे शहरी गरीब योजनेचा लाभ! | येरवडा परिसरातील गरिबांनी घेतला सगळ्यात जास्त लाभ

| पुणे महापालिका योजनेच्या लाभावरून समाधानी

PMC Pune Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) वतीने शहरी गरिबांसाठी आरोग्य योजना (Shahari Garib Yojana) सुरु केली आहे. वार्षिक उत्पन्न 1 लाख असणाऱ्या गरिबांना याचा लाभ दिला जातो. मात्र मागील काळात श्रीमंत लोक देखील याचा लाभ घेताना दिसत होते. मात्र पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) ही योजना ऑनलाईन करत यावर चाप बसवला आहे. त्यानुसार आता गरिबांनाच याचा लाभ मिळतो आहे. अशी महापालिकेची खात्री झाली आहे. कारण येरवडा, भवानी पेठ, धनकवडी, हडपसर अशा क्षेत्रीय कार्यालय (Ward Offices) अंतर्गत येणाऱ्या झोपडी धारकांनीच याचा जास्त लाभ घेतलेला दिसत आहे. अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ मनीषा नाईक (Assistant Health Officer Dr Manisha Naik) यांनी दिली. (PMC Pune Shahari Garib Yojana)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) ही पुणे मनपा (PMC Pune) कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असलेल्या दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनिंगकार्ड व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Yearly income) १ लाख पर्यंत असणाऱ्या कुटूंबीयांना लागू करण्यात आलेली आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना सभासदत्व देण्यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करुन पूर्णपणे कार्यान्वीत करणेत येत आहे. त्यानुसार नागरिकांचे सभासदत्व रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन प्रोसेस, प्री-अॅथोरायझेशन, बिलींग प्रोसेस याबाबत कार्यवाही करणेत येत आहे. चालू आर्थिक वर्षांपासून याची सुरवात करण्यात आली आहे. सुरुवातीला नागरिकांना याबाबतच्या गोंधळाला सामोरं जावे लागले. मात्र आता यात सुसूत्रितपणा आला आहे. तसेच पूर्वी जी महापालिकेची फसवणूक केली जायची ती देखील कमी झाली आहे. (PMC Pune Health Department)
शिवाय महापालिकेची खात्री झाली आहे कि या योजनेचा लाभ हा गरिबांनाच मिळतो आहे. कारण भवानी पेठ, येरवडा, हडपसर, धनकवडी, कसबा विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या झोपडीधारकांना याचा चांगला लाभ होताना दिसत आहे. यात सगळ्यात कमी संख्या ही औंध, वानवडी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिसरातील आहे. दरम्यान एप्रिल पासून आतापर्यंत महापालिका आरोग्य विभागाकडून 11 हजाराहून जास्त कार्ड दिले आहेत. सगळ्यात जास्त कार्ड भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय परिसरात म्हणजे 1802 दिले आहेत. त्या खालोखाल धनकवडी-सहकारनगर 1522, येरवडा 1177, तर कसबा 1017 कार्ड दिले आहेत. 
—-
 
शहरी गरीब योजना ऑनलाईन केल्यामुळे शहरातील खऱ्या गरिबांना लाभ घेता आला आहे. यामुळे योजनेत सुधारणा करण्याची संधी मिळाली. याचा लाभ  झोपडीतील लोकांना मिळतंय हे लक्षात आलं आहे.
 
डॉ मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी. 
—-

Ward Office Name and SGY 

1. AUNDH- BANER  – 279
2. BHAVANI PETH – 1802
3. BIBVEWADI – 583
4. DHANKAWADI-SAHAKAR NAGAR – 1522
5. DHOLE PATIL ROAD – 294
6. HADPSAR-MUNDHAWA – 1021
7. KASBA -VISHRAMBAG WADA – 1017
8. KONDHAWA YEOLEWADI – 130
9. KOTHRUD-BAVDHAN – 837
10. NAGAR ROAD-VADGAON SHERI – 446
11. SHIVAJI NAGAR-GHOLE ROAD – 811
12. SINGHAD ROAD – 535
13. VANWADI-RAMTEKDI – 104
14. WARJE-KARVE NAGAR – 616
15. YERWADA-KALAS-DHANORI – 1177

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा आता 1 लाख 60 हजार | नवीन 5 सेंटर तयार केले जाणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा आता 1 लाख 60 हजार | नवीन 5 सेंटर तयार केले जाणार

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या (PMC Pune )शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेत (Urban poor medical support scheme) आता महापालिका प्रशासनाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी प्रशासनाने ऑनलाईन (Online) सुविधा तयार करत बोगस लाभार्थ्यांना लगाम घातला होता.  या योजनेत आता पर्यंत 1 लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा (Income Limit) असलेल्या कुटूंबानाच सभासद होता येत होते. मात्र, ही उत्पन्न मर्यादा आता 1 लाख 60 हजार रूपये केली जाणार आहे. राज्यशासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या (Mahatma Jyotiba Phule Health scheme) धर्तीवर ही उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. दरम्यान आता आधी महात्मा फुले योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. तो नाही मिळाला तरच शहरी गरिबचा लाभ दिला जाईल. तसेच शहरात परिमंडळ स्तरावर नवीन 5 सेंटर तयार केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. यावर पुढील बैठकीत चर्चा केली जाईल. (PMC Shahari Garib Yojana)

| पुणे महापालिकेची  शहरी गरीब योजना काय आहे? (what is PMC Punes Urban poor medical support scheme)

महापालिकेने 2008-09 पासून ही योजना सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य असले तरी, महापालिकेकडून केवळ वैद्यकीय केंद्र चालविले जातात. तर काही ठराविक दवाखाने वग़ळता महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रिया, उपचार, तपासण्या होत नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना खासगी दवाखान्यांमद्ये भरमसाठ पैसे मोजून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नागरिकांसाठी पालिकेने 2008-09 पासून ही वैद्यकीय सेवा योजना सुरू केली आहे. त्यात, प्रमुख निकष संबधित कुटूंब महापालिका हद्दीतील असावे तसेच त्यांचे उत्पन्न 1 लाखांच्या आत असावे हे आहे. तर या योजनेसाठी महापालिकेने शहरातील खासगी रूग्णालयांचे पॅनेल तयार केले असून या रूग्णालयात या योजनेत 1 लाखांपर्यंतचे तर इतर काही आजारांसाठी 2 लाखांपर्यंत उपचार दिले जातात. मात्र, 1 लाखांच्यावर 1 रूपया अधिक उत्पन्न असले तरी अनेकांना आर्थिक दुर्बल असूनही उपचार मिळत नाहीत. त्यामुळे, पालिकेने आता उत्पन्न मर्यादा 1 लाख 60 हजार रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Municipal Corporation)

नवीन 5 सेंटर तयार केले जाणार

शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिकेकडून महापालिका भवनात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही लोकांना महापालिका भवनात येण्यासाठी कसरत करावी लागते. याबाबत काही लोकप्रतिनिधींनी महापालिकेकेला शहरात सर्व ठिकाणी सेंटर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 5 परिमंडळ स्तरावर 5 सेंटर तयार केले जाणार आहेत. यासाठी प्रति वर्ष 24 लाखाचा खर्च केला जाणार आहे. (PMC Pune News)

शहरी गरीब योजनेअंतर्गत संगणक प्रणाली राबविताना या असतील  नवीन अटी शर्ती
१. शहरी गरीब योजनेच्या काळात पॅनेलवरील हॉस्पिटलमध्ये अंतर्ररुग्ण उपचार व पुणे मनपा दवाखान्यांमध्ये घेण्यात येणारी जेनेरिक औषधे व कंज्युमेबल्स अशी दोन्ही मिळून मर्यादा ही एक लाखापर्यंत असेल व किडनी, डायलिसीस, हृदयविकार उपचाराची मर्यादा दोन लाखापर्यंत असेल.
२. रेशनिंग कार्डमध्ये समावेश असलेले कुटुंब (पती, पत्नी, २५ वर्षा आतील पहिले २ अपत्य व आई-वडील) या सगळ्यांचे पुणे मनपा हद्दीत रहिवाशी असल्याचा पुरावा व सर्वांचे आधारकार्ड आवश्यक राहील.
३. पॅनेलवरील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णास प्रथम जर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल तर त्या रुग्णास त्या योजनेचा लाभ देण्यात यावा. सदर रुग्णास काही कारणास्तव या योजनेचा लाभ अमान्य झाल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अमान्य झालेला फॉर्म पुणे मनपा मध्ये जमा करून तदनंतरच त्या रुग्णास शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यात येईल.
४. रुग्ण दाखल झाल्यानंतर सर्व हॉस्पिटल्सनी कार्ड ऑनलाईन खातरजमा करून ऑनलाईन पूर्व मान्यता घेणे बंधनकारक राहील.
५. शहरी गरीब योजनेच्या अंतर्गत खोटी कागदपत्रे सादर करून बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणे व त्याचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.
—-
News Title | PMC Shahari Garib Yojana | The limit of urban poor scheme is now 1 lakh 60 thousand 5 new centers will be created

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण नाही!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण नाही!

| महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले स्पष्ट

PMC shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरातील गरीब लोकांना (Poor People) आरोग्य सुविधा (Health service) मिळावी यासाठी शहरी गरीब योजना सुरु केली आहे. मात्र यातून गरिबांपेक्षा धनदांडग्याचाच लाभ होताना दिसत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या योजनेचे संगणकीकरण (Online) केले आहे. या माध्यमातून महापालिकेला खरा गरीब कोण हे शोधता येणे सोपे झाले आहे. दरम्यान या योजनेचे खाजगीकरण केले जाणार, अशा चर्चा केल्या जात होत्या. मात्र महापालिका प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत या योजनेचे खाजगीकरण (Privatization) केले जाणार नाही. असे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी सांगितले आहे. (PMC Shahari Garib Yojana)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) ही पुणे मनपा (PMC Pune) कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असलेल्या दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनिंगकार्ड व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Yearly income) १ लाख पर्यंत असणाऱ्या कुटूंबीयांना लागू करण्यात आलेली आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना सभासदत्व देण्यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करुन पूर्णपणे कार्यान्वीत करणेत येत आहे. त्यानुसार नागरिकांचे सभासदत्व रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन प्रोसेस, प्री-अॅथोरायझेशन, बिलींग प्रोसेस याबाबत कार्यवाही करणेत येत आहे. चालू आर्थिक वर्षांपासून याची सुरवात करण्यात आली आहे. सुरुवातीला नागरिकांना याबाबतच्या गोंधळाला सामोरं जावे लागले. मात्र आता यात सुसूत्रितपणा आला आहे. तसेच पूर्वी जी महापालिकेची फसवणूक केली जायची ती देखील कमी झाली आहे. (PMC Pune Health Department)
दरम्यान महापालिकेच्या CHS योजनेप्रमाणे शहरी गरीब योजनेचे देखील खाजगीकरण केले जाणार, योजना विमा कंपनीला चालवण्यासाठी दिल्या जाणार, अशा चर्चा केल्या जात होत्या. मात्र अशा कुठल्याही चर्चामध्ये तथ्य नसल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले कि, या योजनेचा गरीब लोकांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळे हि योजना महापालिकाच चालवणार आहे. याचा online पद्धतीने लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा मिळेल, याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच ही योजना संगणकीय दृष्ट्या अजून मजबूत केली जाणार आहे. त्यामुळे लोकांनी खाजगीकरणाच्या वावड्या वर विश्वास ठेऊ नये, असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. (Pune Municipal Corporation)
—–
News Title | PMC Shahari Garib Yojana | There is no privatization of Urban Poor Scheme of Pune Municipal Corporation under any circumstances!| Municipal Additional Commissioner Ravindra Binwade clarified

PMC Shahari Garib Yojana |  पुणे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा लाभ हवा असेल तर ही माहिती जाणून घ्या  

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Shahari Garib Yojana |  पुणे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा लाभ हवा असेल तर ही माहिती जाणून घ्या

PMC Shahari Garib Yojana | २०२३ – २०२४ च्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक आर्थिक वर्षात शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेच्या (PMC Pune Urban Poor Medical Assistance scheme) नियम व अटीशूर्तीनुसार पुणे मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पॅनेलवरील समाविष्ट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अडमिट पेशंटसाठी हमीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्याकरीता शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार (Shahari Garib yojana policy) सदर योजनेचे सभासद कार्ड (Shahari Garib yojana card) अॅडमिशन पूर्वी तयार केलेले असणे पेशंटला अनिवार्य आहे. कार्ड नसल्यास साहाय्य करता येणार नाही. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (PMC Assistant Health officer) यांनी दिली. (PMC Shahari Garib Yojana)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पिवळे रेशनकार्डधारक, ग.व.नि सेवाशुल्क धारक व केशरी रेशनकार्डधारक ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणाऱ्या गरीब कुटुंबियासाठी दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत लागू करण्यात येते. तथापि ही सवलत फक्त जे नागरीक आरोग्य विमा योजनेचे सभासद होतील त्यांच्यापुरतीच लागू राहील. तसेच हि योजना फक्त जनरल वॉर्डसाठी लागू आहे. सेमी-प्रायव्हेट, प्रायव्हेट व डिलक्स रूम घेणाऱ्या रुग्णाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. (PMC Health Schemes)
शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत पॅनेलवरील प्रायव्हेट हॉस्पिटल मधील अंर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने ५०% किंवा १००% हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख (किडनी, हृद्यरोग व कॅन्सर) या कमाल मर्यादेपर्यंत खर्च करण्यात येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च सबंधित रुग्णाने भरणे आवश्यक आहे. (PMC Pune Health Department)

योजनेचे सभासदत्व घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) मनपा झोपडपट्टीत राहत असल्याचे ग.व.नि. विभागाचे चालू आर्थिक वर्षाचे सेवा शुल्क भरलेली पावती किंवा दारिद्र्य रेषेखालील असलेले पिवळे रेशनकार्ड पुरावा व वरील व्यतिरिक्त पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रात राहत- असलेल्या केशरी रेशनकार्डधारक ज्यांचे वार्षिक उत्पन्न र.रु. एक लाखपर्यंत असलेला मा. तहसीलदार, पुणे यांचा दाखला.
२) पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
३) आपत्यांचे आधार कार्ड (वय वर्ष २५ खालील)
४) कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधारकार्ड (पुणे मनपा कार्यक्षेत्रातील)
५) कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
६) सदर योजनेची नोंदणी फी रु. १००/- वार्षिक शुल्क रु. १००/- अशी एकूण रक्कम र.रु.२००/- शुल्क आकारण्यात येत आहे.
शहरी गरीब योजना राबविताना पारदर्शकता येण्यासाठी माहे सप्टेंबर २०२२ पासून संगणक प्रणाली राबवण्यात येत आहे. बरेचसे रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सदर योजनेचे कार्ड काढून रुग्णालयात दाखल झाल्यापासूनचे लाभ मिळण्याची मागणी करीत आहेत. सन २०२३ – २०२४ च्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक आर्थिक वर्षात शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेच्या नियम व अटीशूर्तीनुसार पुणे मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पॅनेलवरील समाविष्ट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट पेशंटसाठी हमीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्याकरीता शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार सदर योजनेचे सभासद कार्ड अॅडमिशन पूर्वी तयार केलेले असणे पेशंटला अनिवार्य आहे. तसेच सभासदत्वाच्या दिनांकापासून वैद्यकीय उपचाराच्या बिलांची प्रतीपूर्ती अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या नियमानुसार पुणे मनपा कडून देय राहील. (Pune Municipal Corporation)
—–
News Title | PMC Shahari Garib Yojana | If you want the benefit of Urban Poor Medical Scheme of Pune Municipal Corporation, know this information