PMC Pune Shahari Garib Yojana | गरिबांनाच मिळतो आहे शहरी गरीब योजनेचा लाभ! | येरवडा परिसरातील गरिबांनी घेतला सगळ्यात जास्त लाभ

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

PMC Pune Shahari Garib Yojana | गरिबांनाच मिळतो आहे शहरी गरीब योजनेचा लाभ! | येरवडा परिसरातील गरिबांनी घेतला सगळ्यात जास्त लाभ

| पुणे महापालिका योजनेच्या लाभावरून समाधानी

PMC Pune Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) वतीने शहरी गरिबांसाठी आरोग्य योजना (Shahari Garib Yojana) सुरु केली आहे. वार्षिक उत्पन्न 1 लाख असणाऱ्या गरिबांना याचा लाभ दिला जातो. मात्र मागील काळात श्रीमंत लोक देखील याचा लाभ घेताना दिसत होते. मात्र पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) ही योजना ऑनलाईन करत यावर चाप बसवला आहे. त्यानुसार आता गरिबांनाच याचा लाभ मिळतो आहे. अशी महापालिकेची खात्री झाली आहे. कारण येरवडा, भवानी पेठ, धनकवडी, हडपसर अशा क्षेत्रीय कार्यालय (Ward Offices) अंतर्गत येणाऱ्या झोपडी धारकांनीच याचा जास्त लाभ घेतलेला दिसत आहे. अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ मनीषा नाईक (Assistant Health Officer Dr Manisha Naik) यांनी दिली. (PMC Pune Shahari Garib Yojana)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) ही पुणे मनपा (PMC Pune) कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असलेल्या दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनिंगकार्ड व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Yearly income) १ लाख पर्यंत असणाऱ्या कुटूंबीयांना लागू करण्यात आलेली आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना सभासदत्व देण्यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करुन पूर्णपणे कार्यान्वीत करणेत येत आहे. त्यानुसार नागरिकांचे सभासदत्व रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन प्रोसेस, प्री-अॅथोरायझेशन, बिलींग प्रोसेस याबाबत कार्यवाही करणेत येत आहे. चालू आर्थिक वर्षांपासून याची सुरवात करण्यात आली आहे. सुरुवातीला नागरिकांना याबाबतच्या गोंधळाला सामोरं जावे लागले. मात्र आता यात सुसूत्रितपणा आला आहे. तसेच पूर्वी जी महापालिकेची फसवणूक केली जायची ती देखील कमी झाली आहे. (PMC Pune Health Department)
शिवाय महापालिकेची खात्री झाली आहे कि या योजनेचा लाभ हा गरिबांनाच मिळतो आहे. कारण भवानी पेठ, येरवडा, हडपसर, धनकवडी, कसबा विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या झोपडीधारकांना याचा चांगला लाभ होताना दिसत आहे. यात सगळ्यात कमी संख्या ही औंध, वानवडी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिसरातील आहे. दरम्यान एप्रिल पासून आतापर्यंत महापालिका आरोग्य विभागाकडून 11 हजाराहून जास्त कार्ड दिले आहेत. सगळ्यात जास्त कार्ड भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय परिसरात म्हणजे 1802 दिले आहेत. त्या खालोखाल धनकवडी-सहकारनगर 1522, येरवडा 1177, तर कसबा 1017 कार्ड दिले आहेत. 
—-
 
शहरी गरीब योजना ऑनलाईन केल्यामुळे शहरातील खऱ्या गरिबांना लाभ घेता आला आहे. यामुळे योजनेत सुधारणा करण्याची संधी मिळाली. याचा लाभ  झोपडीतील लोकांना मिळतंय हे लक्षात आलं आहे.
 
डॉ मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी. 
—-

Ward Office Name and SGY 

1. AUNDH- BANER  – 279
2. BHAVANI PETH – 1802
3. BIBVEWADI – 583
4. DHANKAWADI-SAHAKAR NAGAR – 1522
5. DHOLE PATIL ROAD – 294
6. HADPSAR-MUNDHAWA – 1021
7. KASBA -VISHRAMBAG WADA – 1017
8. KONDHAWA YEOLEWADI – 130
9. KOTHRUD-BAVDHAN – 837
10. NAGAR ROAD-VADGAON SHERI – 446
11. SHIVAJI NAGAR-GHOLE ROAD – 811
12. SINGHAD ROAD – 535
13. VANWADI-RAMTEKDI – 104
14. WARJE-KARVE NAGAR – 616
15. YERWADA-KALAS-DHANORI – 1177