PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण नाही!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण नाही!

| महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले स्पष्ट

PMC shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरातील गरीब लोकांना (Poor People) आरोग्य सुविधा (Health service) मिळावी यासाठी शहरी गरीब योजना सुरु केली आहे. मात्र यातून गरिबांपेक्षा धनदांडग्याचाच लाभ होताना दिसत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या योजनेचे संगणकीकरण (Online) केले आहे. या माध्यमातून महापालिकेला खरा गरीब कोण हे शोधता येणे सोपे झाले आहे. दरम्यान या योजनेचे खाजगीकरण केले जाणार, अशा चर्चा केल्या जात होत्या. मात्र महापालिका प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत या योजनेचे खाजगीकरण (Privatization) केले जाणार नाही. असे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी सांगितले आहे. (PMC Shahari Garib Yojana)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) ही पुणे मनपा (PMC Pune) कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असलेल्या दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनिंगकार्ड व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Yearly income) १ लाख पर्यंत असणाऱ्या कुटूंबीयांना लागू करण्यात आलेली आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना सभासदत्व देण्यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करुन पूर्णपणे कार्यान्वीत करणेत येत आहे. त्यानुसार नागरिकांचे सभासदत्व रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन प्रोसेस, प्री-अॅथोरायझेशन, बिलींग प्रोसेस याबाबत कार्यवाही करणेत येत आहे. चालू आर्थिक वर्षांपासून याची सुरवात करण्यात आली आहे. सुरुवातीला नागरिकांना याबाबतच्या गोंधळाला सामोरं जावे लागले. मात्र आता यात सुसूत्रितपणा आला आहे. तसेच पूर्वी जी महापालिकेची फसवणूक केली जायची ती देखील कमी झाली आहे. (PMC Pune Health Department)
दरम्यान महापालिकेच्या CHS योजनेप्रमाणे शहरी गरीब योजनेचे देखील खाजगीकरण केले जाणार, योजना विमा कंपनीला चालवण्यासाठी दिल्या जाणार, अशा चर्चा केल्या जात होत्या. मात्र अशा कुठल्याही चर्चामध्ये तथ्य नसल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले कि, या योजनेचा गरीब लोकांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळे हि योजना महापालिकाच चालवणार आहे. याचा online पद्धतीने लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा मिळेल, याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच ही योजना संगणकीय दृष्ट्या अजून मजबूत केली जाणार आहे. त्यामुळे लोकांनी खाजगीकरणाच्या वावड्या वर विश्वास ठेऊ नये, असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. (Pune Municipal Corporation)
—–
News Title | PMC Shahari Garib Yojana | There is no privatization of Urban Poor Scheme of Pune Municipal Corporation under any circumstances!| Municipal Additional Commissioner Ravindra Binwade clarified