Kamala Nehru Hospital Dialysis Center | कमला नेहरू रुग्णालयातील डायलेसिस सेंटर चालवण्यास लायन्स क्लब असमर्थ!  | महापालिका आरोग्य विभागाने संस्थेकडून मागवला खुलासा 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

Kamala Nehru Hospital Dialysis Center | कमला नेहरू रुग्णालयातील डायलेसिस सेंटर चालवण्यास लायन्स क्लब असमर्थ!

| महापालिका आरोग्य विभागाने संस्थेकडून मागवला खुलासा

Kamala Nehru Hospital Dialysis Center| (Author – Ganesh Mule) | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कमला नेहरू रुग्णालयात डायलेसिस सेंटर (Kamala Nehru Hospital Dialysis Center) सुरु करण्यात आले आहे. शहरातील गरीब लोकांना माफक दरात सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिकेने हे सेंटर सुरु केले आहे. हे सेंटर लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला चालवण्यास देण्यात आले आहे. मात्र या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या या डायलेसिस सेंटरमध्ये दैनंदिन कामकाजात अनियमितता आढळून आलेल्या आहेत. याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लायन्स क्लब वर सेंटर चालवण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच संस्थेकडून खुलासा देखील मागवला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी ही माहिती दिली. (Kamala Nehru Hospital Dialysis Center)
लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टकडून हे सेंटर कुठलेही कारण न देता नुकतेच दीड दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने या सेंटरची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 17 जून ला  सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांनी या सेंटरची पाहणी केली. यामध्ये बऱ्याच अनियमितता आढळून आल्या आहेत. (PMC Health Department)
ट्रस्ट ला हे सेंटर 2016 साली 5 वर्षासाठी चालवण्यास देण्यात आले होते. याची मुदत संपल्यानंतर पुन्हा 5 वर्ष कालावधी वाढवून देण्यात आले आहे. करारानुसार संस्थेमार्फत डायलेसिस सेंटरचे कामकाज योग्य प्रकारे होणे अपेक्षित आहे. मात्र  सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी डायलेसिस सेंटरला भेट देऊन पाहणी केली असता एकूण 15 डायलेसिस मशिन्सपैकी 13 मशीन्स बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. तसेच सोमवार दि. 12 ते मंगळवार दि. 13/06/2023 रोजी दुपारपर्यंत सदर सेंटर सुमारे दीड दिवस बंद होते. पाहणीच्या वेळी सेंटरमध्ये नेफ्रालॉजिस्ट अथवा डॉक्टर्स तसेच वैद्यकीयदृष्टया माहिती असलेली परिचारिका कार्यरत नसल्याबाबत निदर्शनास आले. त्यामुळे सेंटरमध्ये डायलेसिसचे उपचार घेत असतांना रुग्णाची तब्येत गंभीर झाल्यास तातडीने आवश्यक उपचार करणेसाठी तज्ञ डॉक्टर्स व परिचारिका उपलब्ध नसल्यास अशा रुग्णास तातडीने अन्य ठिकाणी उपचारासाठी दाखल करणे शक्य होणार नाही. ही  बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे.
पाहणीच्या वेळी सेंटरच्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे सेंटरमध्ये इन्फेक्शन वाढून त्यामुळे तेथे उपचारासाठी येणा-या रुग्णांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेंटरमध्ये दैनंदिन निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा (Biomedical Waste) मागील सुमारे एक ते दीड वर्षापासून साठवून ठेवला असलेबाबत माहिती प्राप्त झाली. व त्यानुसार तेथे अनारोग्यकारक पध्दतीने साठवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेबाबत कोणतीही उपाययोजना आपण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. (PMC Pune Health service)
जुन 2022नंतर येथे निर्माण झालेला दैनंदिन जैव वैद्यकीय कचरा शास्त्रोक्त पध्दतीने निर्मुलनासाठी दिला नसून मागील सुमारे वर्षभरापासून या ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा साठवून ठेवला असल्याचे दिसून येत आहे. तसेच आजअखेर जैव वैद्यकीय कचरा निर्मुलन शुल्कापोटी र.रु. 89,870/- इतक्या रकमेची थकबाकीही असल्याचे दिसून येत आहे. या बाबी तपासणी दरम्यान निदर्शनास आल्या असून सदर डायलेसिस सेंटर नियम व अटींनुसार चालविणेस संस्था असमर्थ असल्याचा अहवाल सहायक आरोग्य अधिकारी यांनी दिला आहे. त्यानुसार आढळून आलेल्या त्रुटींबाबतचा खुलासा सादर करण्याबाबत आरोग्य विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. (Kamala Nehru Hospital Pune)
——
News Title | Kamala Nehru Hospital Dialysis Center | Lions Club unable to run dialysis center in Kamala Nehru Hospital!| The Municipal Health Department sought clarification from the organization