Bharatratna : महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी महापालिका करणार पाठपुरावा  : नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणीला यश 

Categories
cultural PMC social पुणे
Spread the love

महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी महापालिका करणार पाठपुरावा

नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणीला यश

पुणे: महात्मा जोतीराव फुले यांना भारत सरकार चा सर्वोच्च मानला जाणारा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी  मुख्यसभेमध्ये मागणी केली होती. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करण्या बाबत प्रस्ताव पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

:सर्वपक्षीय नेत्यांच्या  बैठकीत मंजुरी

महात्मा जोतीराव फुले हे पुणे शहराचे भूषण असून त्यांनी स्त्री शिक्षण, साक्षरता व अनेक सामाजिक सुधारणांचा पाया त्यांनी रोवला आहे. महात्मा जोतीराव फुले हे पुणे शहराचे एक महान भूषण व्यक्तिमत्व होते त्यामुळे पुणे शहराच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांना भारत सरकार चा सर्वोच्च मानला जाणारा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी महापालिकेच्या मुख्यसभेमध्ये मागणी केली होती. या मागणीला मुख्यसभेमध्ये दोन वेळा मान्याता देण्यात आली होती. याबाबत केंद्र व राज्य शासन यांच्या कडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी आज पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली.
महात्मा जोतीराव फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याकरिता पुणे पालिकेचे महापौर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व स्तरातील व पक्षीय नावलौकिक असलेल्याचा एक दबाव गट स्थापन करण्यात यावा तसेच पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये यासाठी विशेष कक्ष लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. अ़शीही मागणी नगरसेविका पाटील यांनी केली. या प्रस्तावाला बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Reply