PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या  शहरी गरीब योजनेच्या (PMC Shahari Garib Yojana) उपचारांची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवण्यात यावी. तसेच दुर्धर आजारांसाठी अडीच लाखापर्यंत उपचार देण्यात यावेत. अशी राष्ट्रवादी काँग्रेस कडून (NCP Pune) शहर अध्यक्ष दीपक मानकर (Dipak Mankar) आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव (Bhaiyyasaheb Jadhav) यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार महापालिकेकडून (PMC Pune) शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून 1 लाख 60 हजार रूपये केली आहे. त्यामुळे शहरातील गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. महापालिकेने 2011 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत अद्यापही नागरिकांना 1 लाख रूपयां पर्यंतचे उपचार महापालिकेच्या पॅनेलवरील रूग्णालयात मिळतात. तर काही दुर्धर आजारांसाठी 2 लाखांचे उपचार मिळतात. मात्र, वैद्यकीय उपचाराचा वाढलेला खर्च तसच महागाई लक्षात घेऊन उपचाराच्या खर्चाची मर्यादाही वाढविणे आवश्‍यक असून या योजनेतील कार्डधारकांना सरासकट 2 लाखांचे उपचार मिळावेत तसेच दुर्धंर आजारासाठी अडीच लाखां पर्यंत उपचार केले जावेत. महापालिकेत लोकप्रतिनिधीं नसल्याने शहराचे प्रशासक म्हणून आपल्या पातळीवर हा निर्णय घेतल्यास सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा मिळणार असून याबाबत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.
—-

PMC Shahari Garib Yojana |  पुणे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा लाभ हवा असेल तर ही माहिती जाणून घ्या  

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Shahari Garib Yojana |  पुणे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा लाभ हवा असेल तर ही माहिती जाणून घ्या

PMC Shahari Garib Yojana | २०२३ – २०२४ च्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक आर्थिक वर्षात शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेच्या (PMC Pune Urban Poor Medical Assistance scheme) नियम व अटीशूर्तीनुसार पुणे मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पॅनेलवरील समाविष्ट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अडमिट पेशंटसाठी हमीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्याकरीता शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार (Shahari Garib yojana policy) सदर योजनेचे सभासद कार्ड (Shahari Garib yojana card) अॅडमिशन पूर्वी तयार केलेले असणे पेशंटला अनिवार्य आहे. कार्ड नसल्यास साहाय्य करता येणार नाही. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (PMC Assistant Health officer) यांनी दिली. (PMC Shahari Garib Yojana)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पिवळे रेशनकार्डधारक, ग.व.नि सेवाशुल्क धारक व केशरी रेशनकार्डधारक ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणाऱ्या गरीब कुटुंबियासाठी दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत लागू करण्यात येते. तथापि ही सवलत फक्त जे नागरीक आरोग्य विमा योजनेचे सभासद होतील त्यांच्यापुरतीच लागू राहील. तसेच हि योजना फक्त जनरल वॉर्डसाठी लागू आहे. सेमी-प्रायव्हेट, प्रायव्हेट व डिलक्स रूम घेणाऱ्या रुग्णाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. (PMC Health Schemes)
शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत पॅनेलवरील प्रायव्हेट हॉस्पिटल मधील अंर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने ५०% किंवा १००% हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख (किडनी, हृद्यरोग व कॅन्सर) या कमाल मर्यादेपर्यंत खर्च करण्यात येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च सबंधित रुग्णाने भरणे आवश्यक आहे. (PMC Pune Health Department)

योजनेचे सभासदत्व घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) मनपा झोपडपट्टीत राहत असल्याचे ग.व.नि. विभागाचे चालू आर्थिक वर्षाचे सेवा शुल्क भरलेली पावती किंवा दारिद्र्य रेषेखालील असलेले पिवळे रेशनकार्ड पुरावा व वरील व्यतिरिक्त पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रात राहत- असलेल्या केशरी रेशनकार्डधारक ज्यांचे वार्षिक उत्पन्न र.रु. एक लाखपर्यंत असलेला मा. तहसीलदार, पुणे यांचा दाखला.
२) पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
३) आपत्यांचे आधार कार्ड (वय वर्ष २५ खालील)
४) कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधारकार्ड (पुणे मनपा कार्यक्षेत्रातील)
५) कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
६) सदर योजनेची नोंदणी फी रु. १००/- वार्षिक शुल्क रु. १००/- अशी एकूण रक्कम र.रु.२००/- शुल्क आकारण्यात येत आहे.
शहरी गरीब योजना राबविताना पारदर्शकता येण्यासाठी माहे सप्टेंबर २०२२ पासून संगणक प्रणाली राबवण्यात येत आहे. बरेचसे रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सदर योजनेचे कार्ड काढून रुग्णालयात दाखल झाल्यापासूनचे लाभ मिळण्याची मागणी करीत आहेत. सन २०२३ – २०२४ च्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक आर्थिक वर्षात शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेच्या नियम व अटीशूर्तीनुसार पुणे मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पॅनेलवरील समाविष्ट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट पेशंटसाठी हमीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्याकरीता शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार सदर योजनेचे सभासद कार्ड अॅडमिशन पूर्वी तयार केलेले असणे पेशंटला अनिवार्य आहे. तसेच सभासदत्वाच्या दिनांकापासून वैद्यकीय उपचाराच्या बिलांची प्रतीपूर्ती अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या नियमानुसार पुणे मनपा कडून देय राहील. (Pune Municipal Corporation)
—–
News Title | PMC Shahari Garib Yojana | If you want the benefit of Urban Poor Medical Scheme of Pune Municipal Corporation, know this information