Deepali Dhumal | शहराच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट सुरू करण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

शहराच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट सुरू करण्याची मागणी

| माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचे आयुक्तांना पत्र

पुणे | पुणे शहराची लोकसंख्या तसेच नव्याने जी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत त्याचे क्षेत्रफळ पाहता आणखी एक दोन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट ची महापालिकेला आवश्यकता आहे. तरी महापालिकेने शहरच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर) प्लांट सुरू करावा. अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

धुमाळ यांच्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये महापालिकेचा येरवडा परिसरात एकमेव हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट उपलब्ध आहे. सध्याच्या पुणे शहराची व्याप्ती व क्षेत्रफळ पाहता हा एकमेव प्लांट अपुरा पडत असल्याने वेळेवर रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी डांबर उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अनेक दिवस लागतात. त्यामुळे वाहतुकीची अडचण निर्माण होऊन नागरिकांचे फार हाल होत आहेत. सध्याची पुणे शहराची लोकसंख्या तसेच नव्याने जी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत त्याचे क्षेत्रफळ पाहता आणखी एक दोन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट ची महापालिकेला आवश्यकता आहे. तरी महापालिकेने शहरच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर) प्लांट सुरू करावा. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.