PMC Primary  Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेतील शिक्षक प्रश्नाबाबत महापालिका सकारात्मक | प्रशासन आणि पालकांची उद्या एकत्रित बैठक

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

PMC Primary  Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेतील शिक्षक प्रश्नाबाबत महापालिका सकारात्मक | प्रशासन आणि पालकांची उद्या एकत्रित बैठक

PMC Primary Education Department | पुणे | वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची (PMC Primary Education Department) कै. शामराव श्रीपती बराटे मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. इंग्रजी माध्यमातील शाळेत 6 शिक्षकांची कमी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले होते. त्याबाबत शाळेत अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप बाबा धुमाळ यांनी केली होती. याबाबत The Karbhari ने वृत्त प्रसारित केले होते. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिक्षण विभागाने या प्रश्नाबाबत प्रशासन व पालकांची एकत्रित बैठक बोलावली आहे.  (Pune Municipal Corporation)

प्र.क्र. ३२ वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची कै. शामराव श्रीपती बराटे मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सदर शाळेत गेले अनेक दिवसांपासून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेत 6 शिक्षक कमी आहे. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना
२ ते ३ वर्ग घ्यावे लागतात . त्याचप्रमाणे काही वर्गांना शाळेतील शिपाई तसेच बालवाडी शिक्षिका, मावशी व काही वेळेला पालक सुद्धा वर्गांना शिकवीत आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा अत्यंत चांगला असुन या वर्षी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत १७ विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आलेले आहेत. मात्र शिक्षक कमी असल्याने दर्जा खालावत आहे. (PMC School)

याबाबत परिसरातील पालकांनी दीपाली धुमाळ आणि प्रदीप बाबा धुमाळ यांच्याकडे समस्या मांडली होती. धुमाळ यांनी याबाबत पाठपुरावा करत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी पालक आणि प्रशासन यांची एकत्रित बैठक उद्या बोलावण्यात आली आहे. उपायुक्त राजीव नंदकर, शिक्षण प्रमुख श्री राठोड, उप शिक्षण प्रमुख शुभांगी चव्हाण, सहायक प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षिका व दोन्ही शाळांचे मुख्याध्यापिका यांच्या समवेत ही बैठक होणार आहे.
 (Pune Municipal Corporation school)
बराटे इंग्रजी शाळेत 6 शिक्षकांची कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आम्ही शिक्षण विभाग आणि पालकांची एकत्रित बैठक बोलावली आहे. हा प्रश्न तात्काळ सोडवला जाईल. नुकतीच काही इंग्रजी माध्यमासाठी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्यातील काही शिक्षक या शाळेत देण्यात येतील.
राजीव नंदकर, उपायुक्त, पुणे मनपा 
——-