Tag: PMC Primary Education Department
RTE Admission | आरटीई अंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याचे पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे आवाहन!
PMC Primary Education Department – (The Karbhari News Service) – शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) २५% राखीव जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. १६) सुरु झाली आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे (Sunanda Vakhare PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation Primary Education Department)
8 crores proposed for PMC Futuristic schools and 31.50 crores provision for DBT scheme!
PMC Futuristic School | महापालिका अभिनव शाळांसाठी 8 कोटी तर डीबीटी योजनेसाठी 31.50 कोटींची तरतूद!
– Sylabus तसेच मुख्य पोडीयम Wall अशा अत्याधुनिक सुविधांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे.
| या असतील योजना
– शिष्यवृत्ती परीक्षा – शिष्यवृत्ती परीक्षा व त्या अनुषंगाने केलेले शैक्षणिक नियोजन यासाठी र.रु. १ कोटी ५० लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.
र.रु. ३.९२ कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.
आलेली आहे.
PMC Shikshan Sevak Bharti 2024 : पुणे महापालिका शिक्षण सेवक पद भरती! उद्यापासून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी
मंगळवार 5 मार्च : स. 10 वा – ०१ ते २०० मराठी माध्यम
बुधवार 6 march : स 10 वा : २०१ ते २८७, मराठी माध्यम, ०१ ते १०० इंग्रजी माध्यम
गुरुवार 7 मार्च : स 10 वा : १०१ ते १४० इंग्रजी माध्यम, ०१ ते १४ उर्दू माध्यम
स्थळ : कै.वा.ब.गोगटे प्रशाला विद्यानिकेतन शाळा क्र.७, ३१८, नारायण पेठ, पुणे- 411030 (जवळची खूण मोदी गणपती, प्रभात प्रेस, विजय टॉकीज जवळ)
शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचालित मराठी अनुदानित, उर्दू अनुदानित व इंग्रजी माध्यमासाठी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात जमा होणाऱ्या रक्कमेतून चालविल्या जात असलेल्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षण सेवक पदाच्या नेमणुका करावयाच्या आहेत. मराठी माध्यम एकूण पदे – ३७८, उर्दू माध्यम पदे- ४३ व इंग्रजी माध्यम पदे १९८ आहेत.
PMC Shikshan Sevak Bharti 2024 : Recruitment for 619 Shikshan Sevak Posts in Pune Municipal Corporation Primary School!
PMC Shikshan Sevak Bharti 2024 : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत 619 शिक्षण सेवक पदांसाठी भरती!
शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचालित मराठी अनुदानित, उर्दू अनुदानित व इंग्रजी माध्यमासाठी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात जमा होणाऱ्या रक्कमेतून चालविल्या जात असलेल्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षण सेवक पदाच्या नेमणुका करावयाच्या आहेत. मराठी माध्यम एकूण पदे – ३७८, उर्दू माध्यम पदे- ४३ व इंग्रजी माध्यम पदे १९८ संवर्ग निहाय पदाचा तपशील पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. (Pune Municipal Corporation Teacher Recruitment 2024)
संपूर्ण जाहिरातीचा तपशील अधिक माहितीसाठी शासनाच्या https://tait2022.
mahateacherrecruitment.org.in पवित्र पोर्टलवरील या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या रिक्त पदासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपली पसंती / प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर विहीत कालावधीत नोंदवावा. तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनेप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करावी. असे आवाहन पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Vikram Kumar IAS | ९३ रजा मुदत शिक्षकांना ३१ डिसेंबर पूर्वीच नियुक्ती पत्र देणार | आयुक्त विक्रम कुमार
| चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून शिंदेशाही पगडी देऊन आयुक्तांचे विशेष अभिनंदन
Vikran Kumar IAS | पुणे महापालिका (PMC Pune) आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी ३१ डिसेंबर पूर्वी सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिल्याने या रजा मुदत शिक्षकांचा (PMC Teachers) दिवाळी प्रमाणे ३१ डिसेंबरचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनीही आयुक्त विक्रम कुमार यांचे शिंदेशाही पगडी देऊन अभिनंदन केले. तसेच सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे अभिनंदन करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शिक्षण सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी शासन आदेश नुकताच जारी झाला. त्याबद्दल शिक्षण सेवकांच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी आयुक्त विक्रम कुमार डिसेंबर अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिली. (PMC Education Department)
यावेळी आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शिक्षण विभागाचे राजू नंदकर, संतोष वारुळे, चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या सह सर्व ९३ रजा मुदत शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, राज्य सरकार हे सर्व सामान्यांप्रती समर्पित सरकार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करुन १६ हजार करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ पुणे महापालिकेच्या सर्व रजा मुदत शिक्षकांनाही मिळाला. त्यांना सेवेत कायम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय घेत दिलासा दिला. या सर्वांनाही यापूर्वीच थकबाकी आधीच मिळाली आहे. नियुक्ती पत्र डिसेंबरपूर्वीच मिळणार असल्याने वर्षाखेरचा आनंद देखील द्विगुणित होणार आहे.
शासनाने अतिशय जलदगतीने निर्णय घेऊन आपली भूमिका चोख बजावली आहे. त्यामुळे शिक्षकदेखील आपल्या कर्तव्यात कसूर बाकी न ठेवता, सुशिक्षित आणि सदृढ समाज निर्मितीत आपली मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, शासनाने शिक्षकांचा न्याय देण्यासाठी जलदगतीने निर्णय घेतला. पुणे महापालिका देखील ९३ शिक्षकांप्रती अनुकूल असून, सर्वांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, सर्व शिक्षकांनी कायम झाल्यानंतर उत्तम समाजासाठी चांगला व्यक्ती घडविण्यात मोलाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
PMC primary Education Department | महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्या मानधनात 10% वाढ
| शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी
PMC Éducation Department | महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांची दिवाळी होणार गोड!
| शिक्षण सेवकांचे मानधन वाढीचे परिपत्रक महापालिकेकडून जारी
| शिक्षण सेवकांडून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार
PMC Education Department | पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील (PMC Primary School) ९३ शिक्षण सेवकांची यंदाची दिवाळी गोड होणार असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या आदेशानुसार सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे मानधन सहा हजारावरुन १६ हजार करण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेने (PMC Circular) काढले आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावर मानधनवाढीचे परिपत्रक काढण्यात आल्याने शिक्षण सेवकांनी आनंद व्यक्त केला असून मंत्री श्री. पाटील यांचे आभार मानले आहेत. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत गेली १४ वर्षे मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षणसेवकांना उच्च न्यायालयाने शिक्षण सेवेत कायम करुन वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश फेब्रुवारी २०२३ मध्ये दिले होते. यासाठी न्यायालयाने सहा आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र, महापालिकेच्या शिक्षण विभागाने या आदेशावर कार्यवाही केलेली नव्हती.त्यामुळे सर्व शिक्षण सेवकांनी जून २०२३ मध्ये आंदोलनाचा पवित्रा घेत महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली होती. (PMC Pune News)
यावेळी जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करुन शिक्षण सेवकांना न्याय देण्याचे आश्वस्त केले होते. त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा करुन तत्काळ सर्व ९३ शिक्षण सेवकांना कायम करुन वेतन श्रेणी लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, महापालिकेने फेब्रुवारी २०२३ च्या शासन आदेशानुसार सर्व ९३ शिक्षण सेवकांना सहा हजारावरुन १६ हजार मानधन करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. परिपत्रकाद्वारे वित्त विभागाला तातडीने वेतन आदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षणसेवकांनी आनंद व्यक्त केला असून, मंत्री श्री. पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.