PMC Shikshan Sevak Bharti 2024 : Recruitment for 619 Shikshan Sevak Posts in Pune Municipal Corporation Primary School!

Categories
Breaking News Education PMC social पुणे महाराष्ट्र

PMC Shikshan Sevak Bharti 2024 : Recruitment for 619 Shikshan Sevak Posts in Pune Municipal Corporation Primary School!

 PMC Shikshan Sevak Bharti 2024 |  Pune Municipal Corporation (PMC) has released an opportunity to work as a Shikshan Sevak (PMC School Teachers Recruitment). This recruitment is going to be done for 619 posts in different media schools.  (PMC Primary Education Department)
 Education Department Primary, Pune Municipal Corporation-run Marathi subsidized, Urdu-subsidized and English-medium primary schools run from the budget of Pune Municipal Corporation are to be appointed for the post of Shikshan Sevak.  Marathi Medium Total Posts – 378, Urdu Medium Posts – 43 and English Medium Posts – 198 Cadre wise post details have been released on the pavitra portal.  (Pune Municipal Corporation Teacher Recruitment 2024)
 Full advertisement details Govt https://tait2022 mahateacherrecruitment.org.in.  for more information.
 This website is made available on the Pavitra  portal  School Education and Sports for this vacancy  Educational and professional qualification as prescribed by the department from time to time is required.  Above Eligible Candidate your Preference / Preference on pavitra Portal should be reported within the prescribed period.  Also the necessary action should be taken from time to time as per the instructions on the pavitra portal.  Such an appeal has been made on behalf of Pune Municipal Education Department.
the karbhari - pmc shikshan sevak bharti 2024

PMC Shikshan Sevak Bharti 2024 : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत 619 शिक्षण सेवक पदांसाठी भरती! 

Categories
Breaking News Education PMC social पुणे महाराष्ट्र

PMC Shikshan Sevak Bharti 2024 : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत 619 शिक्षण सेवक पदांसाठी भरती!

PMC Shikshan Sevak Bharti  2024 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) प्राथमिक शाळेत शिक्षण सेवक (PMC School Teachers Recruitment) म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विविध माध्यमांच्या शाळेत 619 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. (PMC Primary Education Department)

शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचालित मराठी अनुदानित, उर्दू अनुदानित व इंग्रजी माध्यमासाठी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात जमा होणाऱ्या रक्कमेतून चालविल्या जात असलेल्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षण सेवक पदाच्या नेमणुका करावयाच्या आहेत. मराठी माध्यम एकूण पदे – ३७८, उर्दू माध्यम पदे- ४३ व इंग्रजी माध्यम पदे १९८ संवर्ग निहाय पदाचा तपशील पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. (Pune Municipal Corporation Teacher Recruitment 2024)

संपूर्ण जाहिरातीचा तपशील अधिक माहितीसाठी शासनाच्या https://tait2022.
mahateacherrecruitment.org.in पवित्र पोर्टलवरील या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या रिक्त पदासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपली पसंती / प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर विहीत कालावधीत नोंदवावा. तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनेप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करावी. असे आवाहन पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

the karbhari - pmc shikshan sevak bharti 2024
पुणे महापालिका शिक्षण सेवक पदासाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात

PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत आणखी 100 हून अधिक कनिष्ठ अभियंता (JE) पदांसाठी भरती!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत आणखी 100 हून अधिक कनिष्ठ अभियंता (JE) पदांसाठी भरती!

| येत्या काही दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार

| अनुभवाच्या अटीमुळे प्रक्रियेत येत होता अडथळा

PMC Junior Engineer Recruitment | पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तिसऱ्या टप्प्यातील भरती (PMC Recruitment 2024) प्रक्रिया सुरु केली आहे. आता जवळपास 114 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. सोबतच आता महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 114 पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा  समावेश आहे. येत्या महिन्याभरात महापालिका प्रशासनाकडून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान JE  साठी 3 वर्ष अनुभवाची (Experience Condition) अट कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना चांगलीच संधी मिळणार आहे.  (Pune Mahanagarpalika Bharti 2024)

कुणाची होणार भरती

प्रशासनाने दिलेल्या  माहितीनुसार 114 पदांची भरती करण्याबाबत महापालिका आयुक्त (PMCCommissioner) यांनी आदेश दिले आहेत. या पदांमध्ये सर्व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) चा समावेश आहे.

– कधी होणार भरती?

याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले कि, दुसऱ्या टप्प्याच्या भरतीची आमची प्रक्रिया सुरु आहे. नुकताच फायरमन पदाचा निकाल घोषित करण्यात आला आहे. याचा अंतिम निकाल देखील येत्या आठवड्यात जाहीर होईल. यासोबत आता तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया आम्ही सुरु केली आहे. 114 पदासाठी भरती प्रक्रियेची प्रणाली आम्ही IBPS संस्थेकडून घेणार आहोत. त्यानंतर डेमो घेऊन एक टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर संस्थेकडून भरतीची तारीख दिली जाईल. तारीख आल्यानंतर आम्ही लगेच भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहोत. (PMC Pune Recruitment 2024)

– JE ची अनुभवाची अट कमी झाल्याने नवीन उमेदवारांना संधी

दरम्यान कनिष्ठ अभियंता (JE) साठी 3 वर्षाची अनुभवाची अट ठेवण्यात आली होती. मात्र याबाबत बऱ्याच दिवसापासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा  प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजूरी दिली आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. तर अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली आहे. याचा नुकतीच पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना फायदा होणार आहे.