PMC JE Recruitment | 2023 साली नियुक्त केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या कागदपत्रांची पुन्हा होणार तपासणी!

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC JE Recruitment | 2023 साली नियुक्त केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या कागदपत्रांची पुन्हा होणार तपासणी!

| नियुक्त अभियंत्यांना सोमवारी तपासणीला हजर राहण्याचे प्रशासनाचे आदेश

PMC JE Recruitment – (The Karbhari News Service) | पुणे महापालिका प्रशासनाकडून 2022 साली 448 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यात 144 कनिष्ठ अभियंता पदांचा समावेश होता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2023 साली एकूण 132 लोकांना नेमणूका देण्यात आल्या होत्या. मात्र अनुभवाच्या कारणावरून काही लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आता कोर्टाच्या आदेशानुसार सर्वच उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सोमवारी (ता. 11 मार्च) ला या उमेदवारांना कागदपत्रे घेऊन बोलावण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महापालिकेतील भरतीवरील निर्बंध उठवल्यानंतर 2022 साली महापालिका प्रशासनाकडून 448 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये वर्ग 2 आणि 3 मधील पदांचा समावेश होता. यामध्ये एकूण 144 कनिष्ठ अभियंता यांचा समावेश होता. त्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) | एकूण पदे-135,  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) | एकूण पदे-5 आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3) | एकूण पदे – 4 अशा पदांचा समावेश होता. या पदासाठी 3 वर्ष अनुभवाची अट होती. (Pune PMC JE Recruitment)
महापालिका प्रशासनाने सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करूनच 135 लोकांना पात्र केले होते. मात्र त्यातील काही उमेदवार आले नाहीत. त्यामुळे अशा एकूण 132 लोकांना 2023 साली नेमणुका दिल्या होत्या. मात्र अपात्र झालेले काही उमेदवार अनुभवाचे प्रमाणपत्र खोटे सादर केले असल्याचा आरोप करत   उच्च न्यायालयात गेले होते. यावर कोर्टाने उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने या 132 उमेदवारांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी बोलावले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या अभियंत्यांना अनुभव पात्रता, शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे घेऊन येत्या सोमवारी (11 मार्च) महापालिका नवीन इमारत दुसऱ्या मजल्यावर समिती सभागृहात हजर राहण्यास सांगितले आहे.
—-
The Karbhari- PMC Circular

PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत आणखी 100 हून अधिक कनिष्ठ अभियंता (JE) पदांसाठी भरती!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत आणखी 100 हून अधिक कनिष्ठ अभियंता (JE) पदांसाठी भरती!

| येत्या काही दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार

| अनुभवाच्या अटीमुळे प्रक्रियेत येत होता अडथळा

PMC Junior Engineer Recruitment | पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तिसऱ्या टप्प्यातील भरती (PMC Recruitment 2024) प्रक्रिया सुरु केली आहे. आता जवळपास 114 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. सोबतच आता महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 114 पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा  समावेश आहे. येत्या महिन्याभरात महापालिका प्रशासनाकडून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान JE  साठी 3 वर्ष अनुभवाची (Experience Condition) अट कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना चांगलीच संधी मिळणार आहे.  (Pune Mahanagarpalika Bharti 2024)

कुणाची होणार भरती

प्रशासनाने दिलेल्या  माहितीनुसार 114 पदांची भरती करण्याबाबत महापालिका आयुक्त (PMCCommissioner) यांनी आदेश दिले आहेत. या पदांमध्ये सर्व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) चा समावेश आहे.

– कधी होणार भरती?

याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले कि, दुसऱ्या टप्प्याच्या भरतीची आमची प्रक्रिया सुरु आहे. नुकताच फायरमन पदाचा निकाल घोषित करण्यात आला आहे. याचा अंतिम निकाल देखील येत्या आठवड्यात जाहीर होईल. यासोबत आता तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया आम्ही सुरु केली आहे. 114 पदासाठी भरती प्रक्रियेची प्रणाली आम्ही IBPS संस्थेकडून घेणार आहोत. त्यानंतर डेमो घेऊन एक टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर संस्थेकडून भरतीची तारीख दिली जाईल. तारीख आल्यानंतर आम्ही लगेच भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहोत. (PMC Pune Recruitment 2024)

– JE ची अनुभवाची अट कमी झाल्याने नवीन उमेदवारांना संधी

दरम्यान कनिष्ठ अभियंता (JE) साठी 3 वर्षाची अनुभवाची अट ठेवण्यात आली होती. मात्र याबाबत बऱ्याच दिवसापासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा  प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजूरी दिली आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. तर अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली आहे. याचा नुकतीच पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना फायदा होणार आहे.