RTE Admission | आरटीई अंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याचे पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे आवाहन!

Categories
Breaking News Education PMC social पुणे

RTE Admission | आरटीई अंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याचे पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे आवाहन!

PMC Primary Education Department – (The Karbhari News Service) – शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) २५% राखीव जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. १६) सुरु झाली आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे (Sunanda Vakhare PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation Primary Education Department)

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क व अधिनियम २०१२ मधील तरतुदीनुसार व सुधारित अधिसूचना 9 फेब्रुवारी नुसार सन २०२४-२५ या वर्षाची आर.टी.ई. २५% प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेंतर्गत १६ एप्रिल ते ३०/ एप्रिल या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी संकेतस्थळ.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal

NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश

Categories
Breaking News Education Political social पुणे

आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ

| राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश

 

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील आरटीई मार्फत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज आता २५ मार्च २०२३ पर्यंत स्वीकारले जातील असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे काढण्यात आलेला आहे. ऑनलाइन प्रवेशांमध्ये मुदतवाढ मिळावी यासाठी अनेक पालकांनी मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा विषय उचलून धरला होता.

या विषयासंदर्भात गिरीश गुरनानी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा यांनी शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीला अनुसरून प्राथमिक शिक्षण संचलनालयाने आवश्यक तो बदल करीत अनेक पालकांचा महत्वपूर्ण प्रश्न सोडवल्या आहे. समाजातील दुर्बल व वंचित घटकांना शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आरटीई योजना राबविण्यात येते.

Girish Gurnani | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूडची मागणी

Categories
Breaking News Education Political पुणे

आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची मागणी

| राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक यांना निवेदन

पुणे :
 आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळणे बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.. पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईटच्या विलंबामुळे फॉर्म भरण्यास उशीर होत होता. बऱ्याच पालकांच्या तक्रारी या संदर्भात आल्या होत्या. असे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.
तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत असे निदर्शनात येत आहे की अनेक एजंट लोक या योजनेच्या नियमावलीत पात्र नसलेल्या पालकांकडून पैसे मागून प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमिष दाखवत आहेत. तरी प्रवेश प्रकिया कायदेशीर नियमानुसार करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक, पुणे औदुंबर उकिरडे आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक गणेश खाडे यांना सादर करण्यात आले होते..
आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरोखरच आर्थिक दुर्बल घटक पालक योजनेपासून वंचित रहात आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असली तरी अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या एजंटगिरीला बळी पडून पालकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यात यावी. खरोखर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेचा लाभ मिळावा. कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन प्रशासनाने द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करत आहोत असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष मोहित बराटे देखील उपस्थित होते.