Monorail Project Pune |  थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Monorail Project Pune |  थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध!

| राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) कोथरुड विधानसभा मतदारसंघाने विचारले प्रश्न

 

पुणे – ( The Karbhari News Service) – Monorail Project Pune | राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध केला आहे.

कोथरूड येथे मध्यवस्तीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अनेक वर्षांपासून थोरात उद्यान नामक सुंदर, मोठे आणि मनमोहक असे पुणे मनपाचे एक उद्यान स्थित आहे. हे उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि घेण्यासाठी मोकळा श्वास देत आले आहे. खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या सोयीचे बनले आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी मोनोरेल साकारण्यासाठी पुणे मनपाच्या मोटार वाहन विभागातर्फे काही बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी प्रस्तावित मोनोरेलसाठी वृक्षांची कत्तल केली जाणार असून अनेक ठिकाणी बांधकाम करणेही मनपाला आवश्यक आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून विरोधही केला जात आहे.

सदर ठिकाणी नागरिकांतून कोणतीही मागणी नसताना हा प्रकल्प साकारला जात आहे. असे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले.

या प्रकल्पामुळे पर्यावरणीय नुकसान तर अटळ असून याचसह मनपातर्फे आजवर विकसित करण्यात आलेल्या सुविधाही हटवल्या जातील, ज्यामुळे आजवर या सुविधांवर नागरिकांच्या कररूपी निधीतून केलेला खर्च पाण्यात जाणार आहे. एक सुजाण नागरिक म्हणून या प्रकल्पाला विरोध करत नैसर्गिक उद्यान चिरंतन ठेवणे, हे नक्कीच आमचे कर्तव्य आहे.

त्वरित हा प्रकल्प थांबवण्याची सूचना केली असून असे न केल्यास भविष्यात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही गुरनानी यांनी दिला.

MLA Sunil Kamble | NCP Youth Kothrud | भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

MLA Sunil Kamble | NCP Youth Kothrud | भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

 

MLA Sunil Kamble | NCP Youth Kothrud |भाजपा आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble MLA BJP) यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Kothrud) कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी (Girish Gurnani) यांनी अनोखे आंदोलन केले.

या वेळी कोथरूड मध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सुनील कांबळे यांचा निषेध व्यक्त केला. ससून हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमांमध्ये स्टेजवरून उतरत असताना तोल जाऊन पडणाऱ्या सुनील कांबळे यांना सावरणाऱ्या पोलिसाच्या कानशिलात लगावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदार आमच्या रक्षकांचे भक्षक बनले असल्याच्या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यावेळी जनतेचे लक्ष वेधून घेतले. अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले की हा एका पोलिस कर्मचाऱ्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसाचा व त्याबरोबरच सामान्य जनतेचाही अपमान आहे. जर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी मीडिया व कॅमेरा असताना आणि जनतेने गजबजुन भरलेल्या समारंभाच्या ठिकाणी भाजप आमदार असे वागत असतील तर जनतेने विचार करायला हवा की हे त्यांच्याशी कसे वागतील असेही गिरीश गुरूनानी यांनी सांगितले.

भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवली आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवक चे ऋषिकेश शिंदे,तेजस बनकर,सचिन यादव,आयुष बोडके,स्वप्नील धारिया,पृथ्वी दहिवाळ,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन

Categories
Breaking News Political social पुणे

NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार

| कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन

NCP Youth Kothrud | समाजात तेढ निर्माण करणे तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात कोथरूड येथील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांनी कोथरूड पोलीस स्टेशन (Kothrud Police Station) येथे तक्रार नोंदवली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी अनेक व्हिडिओ तसेच मुलाखती प्रसार माध्यमांच्या मार्फत प्रकाशित केल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचे कारण असल्याचा ठप्पा शरद पवार यांच्यावर ठेवला आहे. तसेच काही वादग्रस्त व टोकाची भूमिका घेणारे शब ही वापरले आहेत. मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या मध्ये संघर्ष निर्माण करणारे अनेक वक्तव्य केल्याचे तसेच शरद पवार यांचे नाव वारंवार घेऊन अनेक बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर केले असल्याचे नमूद करत गुरनानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कोथरूड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत नामदेवराव जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा भा. द. वी. कलम १९७, १५३, १५३(अ), १५३(ब), २९५(अ), २९८, ४९९, ५००, ५०३, ५०४, ५०५ (२) प्रमाणे दाखल करावा अशी मागणी केली आहे. असे न केल्यास सदरील व्यक्ति जोमाने जाती धर्माच्या नावाखाली सोशल मीडिया वर खोटी व बनावट माहिती प्रसारित करुन तरुणांना दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहित करेल याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील हे ही गुरनानी यांनी नमूद केले.

या वेळी कोथरूड सामाजिक न्याय विभागाचे विनोद हनवते आणि राष्ट्रवादी युवतीच्या ऋतुजा देशमुख देखील उपस्थित होत्या….

Sambhaji Bhide | NCP Youth | संभाजी भिडे यांनी गांधीजी बद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक कडून निषेध

Categories
Breaking News Political social पुणे

Sambhaji Bhide | NCP Youth | संभाजी भिडे यांनी गांधीजी बद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक कडून निषेध

| कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन

Sambhaji Bhide | NCP Youth | महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्या प्रकरणी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर्ती गुन्हा दाखल व्हावा,  असे निवेदन राष्ट्रवादी युवक (NCP youth Kothrud) काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड पोलीस स्टेशन चे सिनिअर पी आय हेमंत पाटील यांना देण्यात आले. कोथरूड विधानसभा युवक  अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आणि कठोर कारवाही ची मागणी करण्यात आली. (Sambhaji Bhide | NCP Youth)
संपूर्ण भारत देशाचे गौरव असलेले महात्मा गांधीजी ज्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला,अशा या महापूरशाबाबत बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी आताच नव्हे तर असे बऱ्याचदा महपूर्षांवर्ती व महिलांवरती बेताल वक्तव्य करून देशात अशांती निर्माण करण्याचे प्रयत्न केला आहे असे गुरनानी म्हणाले. त्यातच त्यांनी जे आपले महापुरुष म्हणून आपण ज्यांना संबोधित करतो असे आपले बापू म्हणजेच महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे.हा फक्त महात्मा गांधीचाच अपमान नसून संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे असे निवेदनात गिरीश गुरनानी यांनी म्हंटले आहे. (Mohandas Karamchand Gandhi)
या अपमानास्पद वत्व्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर कलम ५०४,५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा असे निवेदनात गुरनानी यांनी म्हंटले आहे. संभाजी भिडे यांच्यावरती त्वरित कारवाही करावी जेनेकरून यापुढे कोणीही कुठल्याही प्रकारचे महापुरुषांबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करून, समाजामध्ये आणि नागरिकांमध्ये तेढ निर्माण होणार नाही. (Sambhaji Bhide News)
या वेळी राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड,ऋषेकेश शिंदे,तेजस बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
——-
News Title | Sambhaji Bhide | NCP Youth | Nationalist youth protest against Sambhaji Bhide’s statement about Gandhiji

Girish Gurnani | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूडची मागणी

Categories
Breaking News Education Political पुणे

आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची मागणी

| राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक यांना निवेदन

पुणे :
 आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळणे बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.. पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईटच्या विलंबामुळे फॉर्म भरण्यास उशीर होत होता. बऱ्याच पालकांच्या तक्रारी या संदर्भात आल्या होत्या. असे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.
तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत असे निदर्शनात येत आहे की अनेक एजंट लोक या योजनेच्या नियमावलीत पात्र नसलेल्या पालकांकडून पैसे मागून प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमिष दाखवत आहेत. तरी प्रवेश प्रकिया कायदेशीर नियमानुसार करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक, पुणे औदुंबर उकिरडे आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक गणेश खाडे यांना सादर करण्यात आले होते..
आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरोखरच आर्थिक दुर्बल घटक पालक योजनेपासून वंचित रहात आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असली तरी अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या एजंटगिरीला बळी पडून पालकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यात यावी. खरोखर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेचा लाभ मिळावा. कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन प्रशासनाने द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करत आहोत असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष मोहित बराटे देखील उपस्थित होते.