PMC Pune Workshop | मानसिक आरोग्य विषयक कार्यशाळेचा महापालिकेच्या ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Pune Workshop | मानसिक आरोग्य विषयक कार्यशाळेचा महापालिकेच्या ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

 

PMC Pune Workshop | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशिक्षण प्रबोधिनी व पुणे महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी (PMC Employees and officers) यांना मानसिक आरोग्य (Mental Health) विषयक जागरूकता निर्माण करणे आणि पॅरामेडिकल्सचे ज्ञान (Paramedical Knowledge) वाढविणे याबाबत प्रशिक्षण/ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रशिक्षणाचा लाभ ४०० अधिकारी /कर्मचारी यांनी घेतला. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, एनएएम, जीएनएम यांना ‘मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण डॉ. स्मिता पानसे व डॉ. सनद पवार यांचेकडून देण्यात आले .तसेच दुपारच्या सत्रात 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मानसिक आरोग्य आणि वैय्यक्तिक कल्याण याबाबत चे प्रशिक्षण डॉ. अनघा लवळेकर यांनी दिले. त्या नंतर  ‘ताणतणावाचे व्यवस्थापन करून कामाची परिणामकारकता व गती कशी वाढवावी’ याबाबतचे मार्गदर्शन श्री राजीव नंदकर, (उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका यांचेकडून देण्यात आले. श्री नंदकर यांनी यावेळी महानगरपालिकेचे २०० अधिकारी यांची वेलनेस स्कोअर व तणाव चाचणी स्कोअर तपासणी करून घेतली. त्या अनुषंगाने त्यांनी कामकाजात गतिमानता कशी आणावी याबाबत टिप्स त्यांनी दिल्या. (PMC Pune News)

यावेळी डॉ. सीमा उपळेकर यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे ‘मानसिक आरोग्य माहिती पुस्तकेचे केलेले मराठी भाषांतर बाबत माहिती सर्वांना देऊन ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यशाळेमुळे  पुणे महानगरपालिका प्रशासन कार्यक्षमतेने व परिणामकारक रीतीने चालविणे व प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी अधिकारी / कर्मचा-यांना उपयोग होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या प्र.आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, श्री राजीव नंदकर,(उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका, पुणे महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती केतकी कुलकर्णी व डॉ. सीमा उपळेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा उपळेकर यांनी केले.


News Title | PMC Pune Workshop | 400 officers and employees of the Municipal Corporation benefited from the workshop on mental health

PMC Pune Employees | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य विषयक प्रशिक्षण | प्रशिक्षण बंधनकारक : उपायुक्त राजीव नंदकर

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Pune Employees | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य विषयक प्रशिक्षण | प्रशिक्षण बंधनकारक : उपायुक्त राजीव नंदकर

PMC Pune Employees | पुणे | पुणे महिला मंडळ मार्फत पुणे महानगरपालिका अधिकारी आणि  कर्मचारी (PMC Pune Officers and Employees) यांना मानसिक आरोग्य (Mental Health) विषयक जागरुकता निर्माण करणे आणि पॅरामेडीकल्सचे (Paramedicals) ज्ञान वाढविणे याबाबत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. 12 सप्टेंबरला दोन सत्रात हे प्रशिक्षण होणार आहे. हे प्रशिक्षण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक आहे, अशी माहिती प्रशिक्षण प्रबोधिनीचे उपायुक्त राजीव नंदकर (Deputy commissioner Rajiv Nandkar) यांनी दिली. (PMC Pune Employees)
पुणे महापालिकेच्या प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात. त्यानुसार पुणे महिला मंडळ मार्फत पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना मानसिक आरोग्य  विषयक जागरुकता निर्माण करणे आणि पॅरामेडीकल्सचे ज्ञान वाढविणे याबाबत प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात आले आहेत. 12 सप्टेंबरला दोन सत्रात हे प्रशिक्षण होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी 9:30 ते दुपारी 2 पर्यंत   आरोग्य विभागातील २०० पॅरामेडीकल्स स्टाफ साठी खालील विषयावर अर्धा दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली  आहे. (Pune Municipal Corporation)
१) जागतिक आरोग्य संघटना मानसिक आरोग्य मार्गदर्शिका बाबतची माहिती व मार्गदर्शन
२) मानसिक आरोग्य बाबतची आव्हाने व उपाय योजना

तर प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे महानगरपालिका व पुणे महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमानाने दुपारच्या सत्रात 3 ते 6 वेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल) येथे घेण्यात येणार आहे. वर्ग- १, २ आणि ३ चे अधिकारी / कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येईल. यात खालील विषय असतील. (PMC Pune News)

1) Mental Health and Personal Wellbeing | ३:०० ते ४:३० | डॉ. अनघा लवळेकर
२) How to Work Effectively and Efficiently | 4:40 ते 5:40 | श्री राजीव नंदकर
महापालिकेच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्य बाबतचे प्रशिक्षण वेगवेगळ्या टप्प्यात दिले जाणार आहे. लवकरच दुसरा टप्पा घेण्यात येईल. हे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे.
राजीव नंदकर, उपायुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी 
—-
News Title | PMC Pune Employees | Mental Health Training for Pune Municipal Employees and Officers Training Compulsory : Deputy Commissioner Rajeev Nandkar

Pune Municipal Corporation | आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ तीन च्या उपायुक्त पदाची जबाबदारी | राजीव नंदकर यांच्याकडील मोटार वाहन विभागाचा कार्यभार काढून घेतला

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ तीन च्या उपायुक्त पदाची जबाबदारी

| राजीव  नंदकर यांच्याकडील मोटार वाहन विभागाचा कार्यभार काढून घेतला

Pune Municipal Corporation | पुणे | पुणे महापालिकेच्या (PMC Pune) परिमंडळ तीन च्या उपायुक्तपदी आशा राऊत (Deputy Commissioner Aasha Raut) यांची नेमणूक करण्यात आली आहे. राऊत पूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) उपायुक्त होत्या. मात्र या पदावर संदीप कदम (Sandeep Kadam) यांची नेमणूक केली होती. राऊत यांना अजून कुठला पदभार दिला नव्हता. अखेर आयुक्तांनी त्यांच्याकडे परिमंडळ तीन ची जबाबदारी दिली आहे. (Pune Municipal Corporation)
दरम्यान उपायुक्त राजीव नंदकर (Deputy Commissioner Rajiv Nandkar) यांच्याकडून मोटार वाहन विभाग (PMC Vehicle Depot) काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे शिक्षण विभाग (PMC Éducation Department) कायम ठेवण्यात आला आहे. तर परिमंडळ तीन ला जयंत भोसेकर (Deputy Commissioner Jayant Bhosekar) काम करत होते. त्यांच्याकडे आता मोटार वाहन विभाग आणि मागासवर्ग विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

News Title | Pune Municipal Corporation | Asha Raut holds the charge of Deputy Commissioner of Circle Three Rajiv Nandkar took charge of Motor Vehicle Department