PMC Pune Workshop | मानसिक आरोग्य विषयक कार्यशाळेचा महापालिकेच्या ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

PMC Pune Workshop | मानसिक आरोग्य विषयक कार्यशाळेचा महापालिकेच्या ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

 

PMC Pune Workshop | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशिक्षण प्रबोधिनी व पुणे महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी (PMC Employees and officers) यांना मानसिक आरोग्य (Mental Health) विषयक जागरूकता निर्माण करणे आणि पॅरामेडिकल्सचे ज्ञान (Paramedical Knowledge) वाढविणे याबाबत प्रशिक्षण/ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रशिक्षणाचा लाभ ४०० अधिकारी /कर्मचारी यांनी घेतला. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, एनएएम, जीएनएम यांना ‘मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण डॉ. स्मिता पानसे व डॉ. सनद पवार यांचेकडून देण्यात आले .तसेच दुपारच्या सत्रात 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मानसिक आरोग्य आणि वैय्यक्तिक कल्याण याबाबत चे प्रशिक्षण डॉ. अनघा लवळेकर यांनी दिले. त्या नंतर  ‘ताणतणावाचे व्यवस्थापन करून कामाची परिणामकारकता व गती कशी वाढवावी’ याबाबतचे मार्गदर्शन श्री राजीव नंदकर, (उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका यांचेकडून देण्यात आले. श्री नंदकर यांनी यावेळी महानगरपालिकेचे २०० अधिकारी यांची वेलनेस स्कोअर व तणाव चाचणी स्कोअर तपासणी करून घेतली. त्या अनुषंगाने त्यांनी कामकाजात गतिमानता कशी आणावी याबाबत टिप्स त्यांनी दिल्या. (PMC Pune News)

यावेळी डॉ. सीमा उपळेकर यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे ‘मानसिक आरोग्य माहिती पुस्तकेचे केलेले मराठी भाषांतर बाबत माहिती सर्वांना देऊन ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यशाळेमुळे  पुणे महानगरपालिका प्रशासन कार्यक्षमतेने व परिणामकारक रीतीने चालविणे व प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी अधिकारी / कर्मचा-यांना उपयोग होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या प्र.आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, श्री राजीव नंदकर,(उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका, पुणे महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती केतकी कुलकर्णी व डॉ. सीमा उपळेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा उपळेकर यांनी केले.


News Title | PMC Pune Workshop | 400 officers and employees of the Municipal Corporation benefited from the workshop on mental health