PMC Pune Education Department | शिक्षण विभाग समायोजन प्रक्रियेला वेग! | सामान्य प्रशासन विभागाने मागवली 18 पदांची सविस्तर माहिती

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Pune Education Department | शिक्षण विभाग समायोजन प्रक्रियेला वेग! | सामान्य प्रशासन विभागाने मागवली 18 पदांची सविस्तर माहिती 

 
PMC Pune Education Department | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर  मंडळ हा एक महापालिकेचा (PMC Pune) विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती (promotion) पर्यंतच्या या अडचणी आहेत. मात्र आता या प्रक्रियेला वेग आला आहे. समायोजनच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजूरी दिल्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाकडील 18 पदांची सविस्तर माहिती शिक्षण विभागाकडे मागितली आहे. याबाबत The Karbhari ने नुकतेच एक वृत्त प्रसारित केले होते. (Pune Municipal Corporation)
 महापालिका सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या प्रस्ताव आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. मात्र अजूनही समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून सेवाज्येष्ठता ठरवून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार या प्रक्रियेला वेग आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाकडे 18 पदांची 31 ऑगस्ट 2023 पर्यंतची सविस्तर माहिती मागवली आहे. यामध्ये मंजूर पदे, रिक्त पदे, कार्यरत पदे, तसेच पुणे महापालिकेकडील समकक्ष पद, अशी सगळी माहिती मागवली आहे. दरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर प्रक्रिया लवकर होणे अपेक्षित आहे. (PMC Education Department)
 
 

या पदांची मागवली आहे माहिती 

प्रशासकीय अधिकारी (वर्ग 1), उपप्रशासकीय अधिकारी (वर्ग 2), सहायक प्रशासकीय अधिकारी (वर्ग 2), क्रीडाप्रमुख(वर्ग 2), पर्यवेक्षक (वर्ग 3), सहा. प्रशासकीय अधिकारी क्रीडा विभाग (वर्ग 2), शारीरिक शिक्षण संघटक (क्रीडा अधिकारी वर्ग 2),  स्वीय सहा. लघुलेखक (वर्ग-३), कनिष्ठ अभियंता (वर्ग-३), प्रशासन अधिकारी (वर्ग-२), अधिक्षक (वर्ग-३), उपअधिक्षक (वर्ग-३), वरिष्ठ लिपिक (वर्ग-३), लिपिक टंकलेखक (वर्ग- ३), शिपाई (वर्ग-४), रखवालदार (वर्ग-४), बिगारी (वर्ग-४) व माळी (वर्ग-४) (PMC Pune)

या पदावरील शिक्षकेतर पदावरील सेवकांच्या सेवाजेष्ठ्ता पुणे मनपाव्या आस्थापनेवरील सेवकांमध्ये सेवाज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट करणे, पुणे मनपाकडील मंजूर पदे आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडील मंजूर पदे, कार्यरत पदे एकत्रित करून एकच रोस्टर तयार करणे आणि सदर सेवकांच्या बदल्या मनपाच्या इतर खात्यामध्ये करणेबाबत समितीने एकमताने निर्णय घेतलेला आहे.  प्राथमिक शिक्षण विभागाकडील समावेशन करावयाचे पदावरील कर्मचारी पद निहाय संख्या जवळपास 450 आहे. यामध्ये वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची संख्या 200 हून अधिक आहे. (Pune Municipal Corporation education department)
 
——