Pune DP | पुण्याच्या गरजांचा आढावा घेऊन विकास आराखडा तयार करावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Pune DP |  पुण्याच्या गरजांचा  आढावा घेऊन  विकास आराखडा तयार करावा

| खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune DP | बदलत्या काळानुसार (Changing Pune) पुणे शहरासह (Pune city) पीएमआरडीए परिसरातील (PMRDA area) नागरी सुविधांसंबंधी (Civic Infrastructure) गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तरी राज्य शासनाने सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. (Pune DP)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले असून तसे ट्वीटही (Tweet) केले आहे. पुणे हे ऐतिहासिक शहर (Historical city pune) असून राज्याची सांस्कृतिक राजधानी (Cultural Capital) म्हणूनही ओळखले जाते. हे शहर शिक्षणाचे माहेरघर असून यादृष्टीने हे ‘पुर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाते. येथील पायाभूत सुविधांचा विकास पाहता  काही वर्षांपुर्वी वास्तव्याच्या दृष्टीने हे अतिशय योग्य शहर मानले जात असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये बदल झाला असून नागरी सुविधांमध्ये प्रचंड त्रुटी आढळून येत आहेत, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. (Pune News)
बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराच्या नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या आहेत. वीज, पाणी, कचऱ्याचे नियोजन, अंतर्गत रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, शाळा, दवाखाने यांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण, फुटपाथ याखेरीज रस्ते सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे अतिशय गरजेचे आहे. शहराचा विस्तार झालेला असून समाविष्ट गावांमध्येसुद्धा वरील मुलभूत भौतिक सुविधा पुरविण्यासाठी निधीसह दिर्घकालिन नियोजनाची देखील आवश्यकता आहे, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.  (Pune Devlopment Plan)
या बाबींचा विचार करता खास पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा विकास आराखडा करण्याची गरज असून राज्य सरकारने याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे. याबाबत सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास आराखडा तयार करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे. (Pune Marathi News)
—-
News Title | Pune DP |  A development plan should be prepared after reviewing the needs of Pune |  MP Supriya Sule’s demand to the Chief Minister