MHADA Pune | महत्वाची बातमी | म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र
Spread the love

MHADA Pune | महत्वाची बातमी | म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

MHADA Pune – (The Karbhari News Service) – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 4 हजार 777 सदनिकांची सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी नागरिकांना 8 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र, म्हाडाने या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना म्हाडाच्या घरासाठी 30 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडा प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (MHADA News)

म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास दि.7 मार्च 2024 पासून सुरुवात झाली. या सोडतीमध्ये म्हाडा योजनेअंतर्गत प्र्थम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 2 हजार 416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएमएवाय योजनेत 59 सदनिका, पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेत 978 सदनिका, 20 टक्के योजनेतील पुणे मनपा मध्ये 745 सदनिका आणि 20 टक्के योजनेतील पिंपरी चिंचवडमध्ये 561 सदनिका आहेत. नागरिकांनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केल्याने म्हाडाने ही मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरीता अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर प्रथम येणाऱ्यास प्रधम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.