MHADA Pune | महत्वाची बातमी | म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

MHADA Pune | महत्वाची बातमी | म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

MHADA Pune – (The Karbhari News Service) – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 4 हजार 777 सदनिकांची सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी नागरिकांना 8 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र, म्हाडाने या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना म्हाडाच्या घरासाठी 30 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडा प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (MHADA News)

म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास दि.7 मार्च 2024 पासून सुरुवात झाली. या सोडतीमध्ये म्हाडा योजनेअंतर्गत प्र्थम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 2 हजार 416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएमएवाय योजनेत 59 सदनिका, पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेत 978 सदनिका, 20 टक्के योजनेतील पुणे मनपा मध्ये 745 सदनिका आणि 20 टक्के योजनेतील पिंपरी चिंचवडमध्ये 561 सदनिका आहेत. नागरिकांनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केल्याने म्हाडाने ही मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरीता अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर प्रथम येणाऱ्यास प्रधम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

MHADA Pune | Shivajirao Adhalrao Patil | शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडा अध्यक्ष पदावर नियुक्ती 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

MHADA Pune | Shivajirao Adhalrao Patil | शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडा अध्यक्ष पदावर नियुक्ती

 

MHADA Pune | Shivajirao Adhalrao Patil | पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या (Pune Mhada) अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदाचा कार्यभार महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या उपस्थितीत श्री.आढळराव पाटील यांनी आज पदभार स्वीकारला.

म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, म्हाडा वसाहतींमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करून त्यांना न्याय देण्याचे कार्य नवनिर्वाचित अध्यक्षांद्वारे केलं जाईल याचा विश्वास आहे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Mhada Pune | पुणे मंडळ म्हाडाच्या सोडतीस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद | ७५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने केले अर्ज

Categories
Breaking News social पुणे

Mhada Pune | पुणे मंडळ म्हाडाच्या सोडतीस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

| ७५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने केले अर्ज

 

Mhada Pune | पुणे मंडळ म्हाडातर्फे (Pune Mhada Lottery) प्रसिद्ध करण्यात आलेल्या ऑक्टोबर २०२३ च्या सोडतीच्या जाहिरातीस अनुसरुन ७५ हजारापेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत. यापैकी एकूण ५१ हजार ६०० अधिक नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे. (Pune Mhada)

अनामत रक्कम जमा करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असून अर्जदारांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत तसेच ऑनलाईन पद्धतीने रात्री बारा वाजेपर्यंत अनामत रक्कम जमा करता येता येणार आहेत.

तरी अर्जदारांनी या संधीचा लाभ घेऊन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करावा, असे आवाहन पुणे मंडळ म्हाडाच्यावतीने करण्यात आले आहे.

MHADA Pune News | म्हाडातर्फे आरामदायी व आधुनिक सुविधांनी सज्ज ‘ ईडन गार्डन’ गृहप्रकल्प सादर

Categories
Breaking News social पुणे

MHADA Pune News | म्हाडातर्फे आरामदायी व आधुनिक सुविधांनी सज्ज ‘ ईडन गार्डन’ गृहप्रकल्प सादर

 

MHADA Pune News | आपलं स्वतःचे हक्काचे घर असावे, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते. सामान्य माणसाचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुणे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळ (MHADA) तर्फे बंगळुरू – मुंबई महामार्गाला लागूनच ताथवडे येथे ईडन गार्डन हा गृह व व्यावसायिक प्रकल्प सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही ग्राहकांना घरांचा ताबा देण्यात आलेला असून उर्वरित घरे रेडी टू मूव्ह आहेत. घरखरेदीसाठी इच्छुक ग्राहकांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पातील घरांचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हाडा तर्फे करण्यात आले आहे.

भव्य व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या गृह प्रकल्पांत 851 चौरस फुटाच्या 2 BHK च्या आणि 1702 चौरस फुटाच्या 4 BHK च्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा, मोठा लॉबी एरिया आणि हॉल आणि बेडरूमला लागून असलेल्या स्पेसिअस बाल्कनीचा समावेश आहे. या प्रकल्पात २२ मजली चार टॉवर्स असून निवासी सदनिकेची किंमत ६८ लाखांपासून सुरू होते आहे. विशेष इथे कोणतेही फ्लोअर राईज चार्जेस नसून सदनिकेच्या याच किंमतीतच चार चाकी पार्किंग देखील समाविष्ट आहे.

या प्रकल्पापासून ग्राहकांना व त्यांच्या कुटुंबियांना हव्या असलेल्या बाजारपेठ, शाळा, हॉस्पीटल व जीवनाश्यक सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर आहेत. तर ईडन गार्डन प्रकल्पापासून भूमकर चौक सहा मिनिटे हिंजवडी आयटी पार्क पंधरा मिनिटे, आकुर्डी रेल्वे स्टेशन पंधरा मिनिटे, कोर्टयार्ड मॅरिएट हॉटेल सोळा मिनिटे, बालेवाडी क्रीडा संकुल १२ मिनिटे व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम केवळ १४ मिनिटांच्या अंतरावर आहे.
बंगळुरू – मुंबई महामार्गावर, जेएसपीएम महाविद्यालयाच्या समोर ताथवडे सारख्या मागणी असलेल्या भागात तुलनेने एवढ्या योग्य किंमतीत घरांची अत्याधुनिक, आरामदायी व स्पेसिअस घरांची उपलब्धता हेच या प्रकल्पांचे वैशिष्ट्य आहे. अशी माहिती म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवन बोबडे, म्हाडा पुणे यांचे कार्यकारी अभियंता – १ महेश दातार व शिर्के ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन कदम यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
घरखरेदीसाठी इच्छुक ग्राहकांनी ईडन गार्डन प्रकल्पाला भेट द्यावी व प्रकल्पात तयार असलेल्या शो फ्लॅटला भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी 7447440008 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन म्हाडा तर्फे करण्यात आले आहे.

———-

म्हाडाने आतापर्यंत राज्यभरात साडे सात लाख समाधानी कुटुंबांसाठी घरांची उभारणी केली आहे. सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात आम्ही सातत्याने व प्रयत्नशील आहोत. पुण्यातही ताथवडे सारख्या मागणी असलेल्या व अगदी महामार्गावर असलेल्या या प्रकल्पांत कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय अगदी आवाक्याच्या किंमतीत पण आरामदायी घर व सुविधा उपलब्ध असणाऱ्या घराचे स्वप्न पूर्ण करता येईल. मोक्याच्या लोकेशनवर अत्याधुनिक आणि आरामदायी सुविधांसह या प्रकल्पांत ग्राहकांना गुणवत्तापूर्ण घर देण्यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे. या प्रकल्पातील घरे तुमच्या ग्राहकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व गरजा पूर्ण करतील असा आमचा विश्वास आहे.

अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा)
पुणे विभाग

————–

प्रकल्पातील सुविधा

– स्विमिंग पूल
– सांडपाणी प्रक्रिया व व्यवस्थापन
– लोकप्रिय ताथवडे उपनगरात मध्यभागी लोकेशन
– क्लबहाऊस
– चार चाकी पार्किंग
– सेंद्रिय पद्धतीने कचरा व्यवस्थापन
– रेन वॉटर हार्वेस्टींग
– प्रत्येक सदनिकेसाठी तीन बाल्कनी
– लँडस्केप गार्डन
– खेळणीसह मुलांच्या खेळासाठी स्वतंत्र जागा
– ओपन जिम
– प्रत्येक इमारतीत हाय स्पीडच्या तीन स्पेसिअस लिफ्ट
– कॉमन एरीयासाठी सोलर एनर्जीचा पुरवठा