कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी महापालिका सक्षम : महापालिका सभागृह नेता गणेश बिडकर यांनी दिला विश्वास : बेड्स, ऑक्सिजन प्लांट, औषधांचा पुरेसा साठा

Categories
PMC पुणे
Spread the love

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी महापालिका सक्षम

: महापालिका सभागृह नेता गणेश बिडकर यांनी दिला विश्वास

: बेड्स, ऑक्सिजन प्लांट, औषधांचा पुरेसा साठा

पुणे: येणाऱ्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या जरी कोरोनाचा जोर कमी असला तरीही तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका पूर्ण सक्षम आहे, असा विश्वास महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिला आहे. शिवाय यासाठी बेड्स, ऑक्सिजन प्लांट, औषधांचा पुरेसा साठा महापालिकेकडे उपलब्ध आहे, असे ही बिडकर यांनी सांगितले.

शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्याचा जोर जरी कमी झालेला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. अशातच देशभरातील वैज्ञानिकांनी तसेच केंद्र आणि राज्य सरकार ने देखील तिसरी लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून महापालिकेला देखील सगळी यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे. याबाबत महापालिकेचे सभागृह नेता गणेश बिडकर यांनी सांगितले की, पुणे महापालिका तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार आहे. या काळात बेड व औषधाचा साठा कमी पडू दिला जाणार नाही. नागरिकांना सगळ्या सुविधा दिल्या जातील. प्रथम प्राधान्य पुणेकरांचे आरोग्य या तत्वावर आम्ही कटिबद्ध आहोत, असे ही बिडकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी भाजप पूर्ण क्षमतेने तयार असून महापालिकेच्या च्या माध्यमातून बेड्स, ऑक्सिजन प्लांट, औषधांचा पुरेसा साठा या सगळ्यांची व्यवस्था केली आहे. प्रथम प्राधान्य पुणेकरांचे आरोग्य या तत्वावर आम्ही कटिबद्ध आहोत.

गणेश बिडकर, सभागृह नेता, महापालिका.

Leave a Reply