PMRDA News  | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

PMRDA News  | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

 

PMRDA News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी हटवावेत किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३१ मार्चपर्यंत ते लावण्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (PMRDA Pune)

पीएमआरडीए क्षेत्रात असलेल्या मुख्य चौक, गर्दी वा वर्दळीच्या ठिकाणी, जास्त लांबी, रुंदी व उंचीचे, उंच इमारतीवरील कमाल मर्यादेपेक्षा मोठे तथा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनधिकृत, धोकादायक असलेले आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स येणाऱ्या उन्हाळी वाऱ्यामुळे पडून किंवा कोसळून जीवितहानी वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत हटविण्यात आले नसल्यास पीएमआरडीकडून निष्कासित करण्यात येतील. तसेच होर्डिंगमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित जाहिरातदार संस्था यांना व्यक्तिशः जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही पीएमआरडीचे विकास परवानगी विभागाचे महानगर नियोजनकार सुनिल मरळे यांनी कळविले आहे

PMRDA Pune | PMRDA च्या दोन शैक्षणिक सुविधा भूखंडांचे होणार ई लिलाव

Categories
Breaking News social पुणे

PMRDA Pune | PMRDA च्या दोन शैक्षणिक सुविधा भूखंडांचे होणार ई लिलाव

PMRDA Pune | माण-हिंजवडी परिसरात पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) मौजे माण ता मुळशी येथील दोन शैक्षणिक सुविधा भूखंड ८० वर्षाच्या दीर्घ मुदतीने भाडेपट्ट्याने ई लिलावा (E Auction) द्वारे देण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. अशी माहिती रामदास जगताप उप आयुक्त जमीन व मालमत्ता विभाग (Ramdas Jagtap PMRDA) यांनी दिली.

ई लिलाव होणारे माण तालुका मुळशी येथील सं. नं. ९८/९९/१०१ मधील १३५ आर आणि सं.नं. २८८ मधील ६२ आर क्षेत्र हे दोन्ही भूखंड शैक्षणिक प्रयोजनासाठी आरक्षित केलेले सुविधा भूखंड असून त्याचे ई लिलावासाठी इच्छुक असणाऱ्या शैक्षणिक संस्था अथवा धर्मादाय संस्थांना दि. २४ जानेवारी पर्यंत ई लिलाव पोर्टलवर (https://eauction.gov.in ) नोंदणी करता येईल व प्रत्यक्ष ई लिलाव  ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजले पासून सुरु होईल.

पुणे महानगर प्रदेशातील पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या विकासाठी प्राधिकरणाच्या मालकीचे हे दोन्ही सुविधा भूखंड ८० वर्षाच्या दीर्घ मुदत भाडेपट्ट्याने वितरीत करण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी ई लिलाव केले जाणार आहेत त्यातून प्राधिकरणाला सुमारे २० ते २५ कोटीचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. या ठिकाणा वापर संबंधीत संस्थेला फक्त शैक्षणिक कारणासाठीच करता येईल प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे. क्षेत्राने मोठे सदरचे दोन्ही भूखंड मान हिंजवडी च्या विकसित क्षेत्रात असल्याने या ठिकाणी उच्च दर्जाचे शैक्षणिक संकुल विकसित होण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरेल.

PMRDA | PMC Pune | PMRDA कडून समाविष्ट ३४ गावातील रस्ते व सुविधा भूखंडाचे पुणे  महानगरपालिकेकडे हस्तांतरण

Categories
Breaking News PMC पुणे

PMRDA | PMC Pune | PMRDA कडून समाविष्ट ३४ गावातील रस्ते व सुविधा भूखंडाचे पुणे  महानगरपालिकेकडे हस्तांतरण

PMRDA | PMC Pune | ​पुणे महानगर प्रदेश विकास प्रा‍धिकरणाकडुन (PMRDA Pune) , पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ठ झालेल्या 34 गावांमधील (Included 34 Villages), प्राधिकरणाच्या ताब्यात असलेले सुविधा भूखंड (Amenity Spaces) आणि रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र (Road Widening) पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune| ताब्यात देणेची कार्यवाही सुरु करणेत आली आहे. (PMRDA | PMC Pune)

​त्या अनुषंगाने, प्राधिकरणाचे जमिन व मालमत्ता विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभाग यांनी प्राधिकरणाचे उप अभियंता श्री. वसंत नाईक, व पुणे महानगरपालिकेचे उप अभियंता यांचे नेतृत्वाखाली संयुक्त पथक तयार करुन, फुरसुंगी, मांजरी बु., मुंढवा, उंड्री, किरकटवाडी, आंबेगाव खु. आंबेगाव बु., औताडे हांडेवाडी, लोहगांव व वाघोली या गावांमधील एकूण 36 रस्ता क्षेत्र 54901 चौ.मी. व एकूण 34 सुविधा भुखंडाचे क्षेत्र 211024 चौ.मी. असे एकूण 265925 चौ.मी. क्षेत्र म्हणजेच 2 हे. 59 आर क्षेत्र 22/12/2023 अखेर प्राधिकरणाकडुन महानगरपालिकेकडे ताब्यात देणेत आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रावर विकसनासाठी पुणे महानगरपालिकेला सोयीसुविधांचा विकास करणेसाठी सहाय्यभूत ठरेल.

एकूण रस्ता व सुविधा क्षेत्र चौ.मी. मध्ये
265926.07 चौ.मी.

Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project | माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ प्रकल्पास अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून  PPP मेट्रो प्रकल्प पुरस्कार 

Categories
Breaking News social पुणे

Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project | माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ प्रकल्पास अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून  PPP मेट्रो प्रकल्प पुरस्कार

|  रिनाज पठाण यांना मॉडर्न मेट्रो वुमन ऑफ द इयर पुरस्कार

Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) राबविण्यात येत असलेल्या माण – हिंजवडी ते शिवाजीनगर (Metro Line-3) चे काम प्रगतीत असून सदर प्रकल्पास अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून (Urban Infra Group) दिला जाणारा सन २०२३ चा सर्वात नाविन्यपूर्ण PPP मेट्रो प्रकल्प हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यासोबतच अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून श्रीमती. रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पुमप्रविप्रा, पुणे यांना मॉडर्न मेट्रो वुमन ऑफ द इयर – २०२३ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार सोहळ्यास प्राधिकरणाच्या वतीने  रिनाज पठाण, मुख्य अभियंता, राजू ठाणगे, कार्यकारी अभियंता व दर्शन बंब, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.  (Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन – ३ मास रॅपिड ट्रान्झिट (Mass Rapid Transit) अंतर्गत या प्रकल्पाचे काम राज्य शासनाच्या मान्यतेने हाती घेतले आहे. सदर उन्नतमार्ग मेट्रो मार्गाची लांबी २३.२०३ कि.मी. असून सदर मार्गिकेत २३ स्थानके आहेत. केंद्र सरकारच्या मेट्रो रेल धोरण २०१७ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर संकल्पना करा, बांधा, अर्थ पुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा (DBFOT) मॉडेल अंतर्गत राबविण्यात येत असलेला हा पहिला प्रकल्प आहे. श्री. राहुल महिवाल, मा. महानगर आयुक्त, पुमप्रविप्रा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती. रिनाज पठाण या यशस्वीरीत्या पार पाडत असून माहे नोव्हेंबर-२०२३ अखेरपर्यंत मेट्रो लाईन – ३ प्रकल्पाचे भौतिक काम सुमारे ५१.१४% व आर्थिक उद्दिष्ट ४६.६८% पूर्ण झाले आहे.

Lonavala Sky Walk Project | PMRDA | लोणावळ्या जवळ होणार स्काय वॉक प्रकल्प विकसित

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Lonavala Sky Walk Project | PMRDA | लोणावळ्या जवळ होणार स्काय वॉक प्रकल्प विकसित

 

Lonavala Sky Walk Project | PMRDA |मावळ विधानसभा मतदारसंघाचे (Maval Constituency) आमदार  सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांचे संकल्पनेतून लोणावळा परिसर पर्यटन क्षेत्र विकासासाठी लोणावळ्यापासून १५ किमी अंतरावरील प्रसिद्ध लायन्स व टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाच्या (PMRDA Administration) वतीने देण्यात आली. (Lonavala Sky Walk Project | PMRDA)

मावळ तालुक्यातील वन विभागाच्या मौजे आतवन येथील राखीव वन गट नं. १६६ मधील ८ हेक्टर क्षेत्रात हा स्काय वॉक पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसित केला जाणार असून त्यास्तही पर्यटन विकास विभागाकडून वित्त पुरवठा केला जाणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वित्त मात्री आदरणीय अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पीएमआरडीए ने हाती घेतले आहे.

PMRDA receives Rs. 410 cr from Centra Government for the Pune Metro Line

Categories
Breaking News पुणे

PMRDA receives Rs. 410 cr from Centra Government for the Pune Metro Line

 

The Pune Metropolitan Region Development Authority has undertaken the development of 23.203 km long Pune Metro Line 3 Project connecting Maan Hinjawadi with city centre at Shivajinagar on Public Private Partnership basis.The State Government had accorded approval to undertake the said Project on Public Private Partnership model vide Government Resolution dated 09/02/2018. Accordingly, the Consortium of TRIL Urban Transport Pvt Ltd and Siemens Project Ventures GmbH was awarded the Project and a Special Purpose Vehicle Pune IT City Metro Rail Limited was formed to undertake the said Project. The Concession Agreement was signed on 21/09/2019 and the Appointed Date was declared on 25/11/2021 marking the start of construction work. About 45% of the project work is complete.

Since the Project is proposed on PPP basis, Viability Gap Funding (VGF) of Rs. 1225 cr was envisaged from the Central Government. After infusion of 100% equity by the Concessionaire and proportionate disbursement of debt by the banks, the PMRDA has applied to the State Government for disbursement of VGF to the tune of Rs. 410 cr out of the total VGF of Rs. 1225 cr. The proposal was sent to Department of Economic Affairs, Ministry of Finance, Government of India. PMRDA Commissioner, Shri Rahul Mahiwal and Chief Engineer, Smt. Rinaj Pathan continuously followed up for the disbursement of the said amount.

—-

With the timely receipt of the first tranche from the central government, no other financial difficulties are remained and project will progress as per schedule

Rahul Mahiwal, Commissioner, PMRDA

Hinjewadi- Shivajinagar Metro | हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी केंद्र शासनाकडून ४१० कोटी प्राप्त

Categories
Breaking News social पुणे

Hinjewadi- Shivajinagar Metro | हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो साठी केंद्र शासनाकडून  ४१० कोटी प्राप्त

Hinjewadi – Shivajinagar Metro | माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन (Man-Hinjewadi- Shivajinagar Metro Line) साठी  ४१० कोटी केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. सदर निधी प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाची गती वाढून प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती PMRDA च्या वतीने देण्यात आली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत २३.२०३ कि.मी. लांबीचा व रु.८३१३ कोटी इतक्या अंदाजित खर्चाचा पुणे मेट्रो लाईन – ३ माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाने ०९ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. या सवलतकार कंपनीमार्फत करण्यात येत आहे. प्रकल्पाचा सवलतकरारनामा २१ सप्टेंबर २०१९ रोजी स्वाक्षांकित करण्यात आला आहे. तसेच, २५ नोव्हेंबर २०२१ रोजी देण्यात आली असून  प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत.
सदर मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबविण्यात येत असलेने या प्रकल्पाकरिता केंद्र शासनामार्फत एकूण रु. १,२२५ कोटी इतका व्यवहार्यता तफावत निधी अपेक्षित आहे. प्रकल्पाचे सवलतकार पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेड यांनी १००% Equity ची गुंतवणूक केली असुन त्याप्रमाणात बँकेद्वारे कर्ज पुरवठा करण्यात आल्यामुळे केंद्र शासनास रु. १,२२५ कोटी पैकी रु. ४१० कोटी मिळणेबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता.
प्राधिकरणाचे आयुक्त श्री. राहुल महिवाल, मुख्य अभियंता श्रीमती रिनाज पठाण यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मिळाला.
——
माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन साठी  ४१० कोटी केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. सदर निधी प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाची गती वाढून प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण होण्यास निश्चितच मदत होईल.
राहुल  महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए, पुणे

PMRDA Draft DP | पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा | उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News social पुणे

PMRDA Draft DP | पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा | उपमुख्यमंत्री अजित पवार

 

PMRDA Draft DP | उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या (PMRDA Draft DP) आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल (PMRDA Commissioner Rahul Mahiwal), क्रीडा आयुक्त सुहास दिवसे (Sport Commissioner Suhas Diwase), पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपक सिंघल (PMRDA Additional Commissioner Deepak Singhal) आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आराखड्यात पुरेशा प्रमाणात हरितक्षेत्र आणि पाण्यासाठी लोकसंख्येनुसार आवश्यक नियोजन करण्यात यावे. पीएमआरडीएमध्ये नव्या आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती करतांना पूर्वी काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेण्याविषयी एमपीएससीला विनंती करण्यात यावी. भौगोलिक रचना लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रणा उभी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी क्रीडा विद्यापीठासाठी जागा निवडीबाबत चर्चा करण्यात आली. क्रीडा विद्यापीठाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे श्री.पवार यांनी सांगितले.

महाराणी सईबाई स्मृतीस्थळ स्मारक विकास आराखड्याबाबत बैठक संपन्न
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या उपस्थितीत महाराणी सईबाई स्मृतीस्थळ स्मारक विकास आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार अतुल बेनके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वहाणे उपस्थित होते.

उत्खननात आढळलेल्या पुरातन वाड्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी २५ कोटी रुपये देण्यात येतील. वाड्याची जागा संपादन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. समाधी स्थळच्या विकासासाठी आराखडा ऑक्टोबर अखेरपर्यंत सादर करावा. दोन्ही ठिकाणी जोडणाऱ्या रस्त्यांचाही आराखड्यात समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

खेड तालुक्यात वाफगाव येथील होळकर किल्ला स्मारक विकासाबाबतही यावेळी सादरीकरण करण्यात आले. या परिसरातील शाळा स्थलांतर व स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्मारकाच्या कामाबाबत माहिती दिली.

प्रगतीतील इमारत कामांचा आढावा

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यातील प्रगतीतील सारथी कार्यालय, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय, अप्पर कामगार आयुक्तालय, कृषी भवन, रावेत येथील ईव्हीएम गोदाम या इमारतींसह सैनिकी शाळा सातारा इमारतीच्या कामांचा आढावा घेतला.

यासोबत मंजूर झालेल्या प्रादेशिक मनोरुग्णालय, राज्य उत्पादन शुल्क प्रशासकीय इमारत, मोशी येथील फौजदारी न्यायालय इमारत, येरवडा येथील फौजदारी न्यायालय इमारत, ऑलिम्पिक भवन, मध्यवर्ती इमारत नुतनीकरण, उपविभागीय अधिकारीच व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सारथी प्रादेशिक कार्यालय व मुलामुलींचे वसतिगृह आदी कामांच्या प्रगतीबाबत आणि प्रस्तावित कामांबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करण्यात यावी. मंजूर कामे तातडीने सुरू करावी. सर्व इमारती बाहेरून सुंदर दिसतील आणि सर्व सुविधांनी युक्त असतील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केल्या. मध्यवर्ती इमारतीचे नुतनीकरण करतांना तिचे जुने स्वरूप कायम ठेवण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी आमदार अशोक मोहिते पाटील उपस्थित होते. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे इमारतींच्या कामाच्या प्रगती विषयी माहिती दिली.

PMRDA | Busan | पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब 

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे

PMRDA | Busan | पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पुण्याचे विकासाला चालना देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा पुरविण्याकरीता सहकार्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करण्यासाठीचा एक प्रयत्न स्वरुप दक्षिण कोरिया येथील ‘बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन’ (Busan Metropolitan Corporation) सोबत च्या सामंजस्य करारावर ५ ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी केली.

या सामंजस्य कराराचा उद्देश सदर सामंजस्य करारामध्ये नमुद केले नुसार परस्पर हितसंबंध आणि विशेष कौशल्य असलेल्या क्षेत्रांमध्ये आणि इतर सामाजीक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य सुलभ करणे, दीर्घकालीन सहयोग दृढ व वृध्दिंगत करणेच्या दृष्टिकोनातून मुहुर्तमेढ स्थापणे तसेच माहितीची परस्पर देवाणघेवाण करणे आणि माहिती, समानता, परस्पर लाभ आणि सहकार्याच्या तत्त्वांनुसार, पथदर्शी प्रकल्प किंवा संकल्पनेवर आधारित प्रत्यक्ष योजनेची कल्पना व अंमलबजावणी करणे हा आहे. (PMRDA Pune)

बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्री किम  तसेच बुसान कार्पोरेशनचे नियोजन विभाग आणि कॉम्प्लेक्स बिझनेस विभागातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळाने पुणे बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे प्रतीनीधी स्वरुपात उपस्थीत होऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर महानगर आयुक्त, पीएमआरडीए श्री राहुल महिवाल व बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्री. किम यांनी स्वाक्षरी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात कार्यरत असलेली सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क ही संस्था या दोन्ही शहरांमधील सामंजस्य कराराची समन्वय संस्था म्हणून काम करेल असे निश्चित करण्यात आले.

PMRDA ने प्रस्तावीत प्रारुप विकास आराखडा , माण- हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणारी पुणे मेट्रो लाईन 3, रिंगरोड प्रकल्प, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र प्रकल्प आणि भोसरी जिल्हा केंद्र यासारख्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहीती उपस्थीत प्रतीनिधींना दिली. त्याचप्रमाणे, बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनच्या प्रतिनिधींनी त्यांचे विविध यशोगाथांचे सादरीकरण केले . या द्वारे दोन्ही शहरांमधील नियोजन , प्रशासन आणि अंमलबजावणी मधील यशस्वी प्रयत्नांचे बौध्दिक अदानप्रदान पार पडले.

Indrayani River Devlopment Project | PMRDA | पीएमआरडीएचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर!

Categories
Breaking News social पुणे

Indrayani River Devlopment Project | PMRDA | पीएमआरडीएचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर!

Indrayani River Devlopment Project | PMRDA |  इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पीएमआरडीएतर्फे ( PMRDAs Indrayani River Devlopment Project)  प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. राज्य सरकारने नुकतीच याला मान्यता दिली आहे. आता हा प्रकल्प अंतिम मंजूरीसाठी केंद्र सरकार कडे पाठवण्यात आला आहे. अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
या प्रकल्पात पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari Chinchwad Municipal Corporation) क्षेत्र व इतर 46 गावे आहेत. देहू व आळंदी (Dehu and Alandi) ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहेत. इंद्रायणी नदीत (Indrayani River) घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी, मैला सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदीचे पात्र स्वच्छ करणे व शुद्धीकरण करण्यासाठी उपाय योजना सुचविणे. नदी काठावरील मुख्य ठिकाणी रिव्हरफ्रंट्स विकसित करण्याची योजना तयार करणे. नदीत जलवाहतूक प्रणाली पुरविण्याच्या व्यवहार्यतेचे मुल्यांकन करणे, तसेच आवश्यक असल्यास दरवाजाची व्यवस्था करण्याच्या तरतुदींसह जलवाहतूक प्रस्तावित करणे.  पूर्व सुसाध्यता अहवाल तयार करणे, मास्टर प्लॅन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे. सदर प्रकल्पाअंतर्गत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील एकूण 54 गावे व शहरे या मधून निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून नदी प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने नियोजन करताना विचारात घेतलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव दाभाडे व आळंदी या तीन नगरपरिषदा, वडगाव व देहू या दोन नगरपंचायती, देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड, 15,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन ग्रामपंचायती व इतर 46 ग्रामपंचायती यांचा समावेश आहे. सदरचा प्रस्ताव राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे सादर केला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्रदूषण नियंत्रण या कामास भांडवली किंमतीच्या 60:40 टक्के प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. )PMRDA Pune)
——
सद्यस्थितीत 577.16 कोटी रकमेचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनास सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनांच्या पर्यावरण विभागाने स्वीकारला असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर  केला आहे.  हा प्रस्ताव केंद्र शासन स्थरावर देखील लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा आहे.
अशोक भालकर, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विभाग, पीएमआरडीए.