PMRDA News  | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

PMRDA News  | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे आवाहन

 

PMRDA News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी हटवावेत किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३१ मार्चपर्यंत ते लावण्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (PMRDA Pune)

पीएमआरडीए क्षेत्रात असलेल्या मुख्य चौक, गर्दी वा वर्दळीच्या ठिकाणी, जास्त लांबी, रुंदी व उंचीचे, उंच इमारतीवरील कमाल मर्यादेपेक्षा मोठे तथा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनधिकृत, धोकादायक असलेले आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स येणाऱ्या उन्हाळी वाऱ्यामुळे पडून किंवा कोसळून जीवितहानी वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत हटविण्यात आले नसल्यास पीएमआरडीकडून निष्कासित करण्यात येतील. तसेच होर्डिंगमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित जाहिरातदार संस्था यांना व्यक्तिशः जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही पीएमआरडीचे विकास परवानगी विभागाचे महानगर नियोजनकार सुनिल मरळे यांनी कळविले आहे

PMRDA Hoarding Policy | पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्सला बसणार चाप | PMRDA ची होर्डिंग पॅालिसी प्रसिद्ध

Categories
Breaking News social पुणे

PMRDA Hoarding Policy | पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्सला बसणार चाप | PMRDA ची होर्डिंग  पॅालिसी प्रसिद्ध

PMRDA Hoarding Policy |  पी एम आर डी ए (PMRDA) च्या क्षेत्रामध्ये होर्डिंग्ज उभारण्याबाबत आजपर्यंत कोणतेही धोरण (Policy) किंवा नियंत्रणाचे नियम नव्हते. त्यामुळे संबंधितांकडून हजारो अनधिकृत होर्डिंग् (Illegal Hoardings) उभारण्यात आले आहेत. त्यास कोणाचीही परवानगी नाही. यांपैकी बरेच होर्डिंग्स  संरचनात्मक स्थिरता (Hoardings Structure) नसल्यामुळे अपघात होत आहेत… परिणामी अलीकडच्या काळात काही नागरिकांना त्यामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. पण कायदेशीर तरतुदीनुसार त्यांच्यावर कारवाई करणे अडचणीचे होत होते . आता ह्या धोरणानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी दिली. (PMRDA Hoarding Policy)
ज्यांनी असे अनधिकृत होर्डिंग्स उभारलेले आहेत, त्यांच्यावर आता कायदेशीर नोटिसा बजावण्यात येणार असून त्यापैकी जे अर्जदार त्यांचे होर्डिंग्स नियमित करण्यासाठी अर्ज करणार नाहीत त्यांचे होर्डिंग्स पाडून टाकण्याची कारवाई करण्यात येणार आहेत. जे नियमितीकरणासाठी अर्ज करतील त्यांना विकास शुल्का च्या दुप्पट तडजोड शुल्क आकारून नियमितीकरण करण्यात येईल. (PMRDA Pune)
स्ट्रक्टरल इंजिनिअर चा दाखला दर 2 वर्षांनी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उभारण्यात आलेले होर्डिंग हे अधिकृत असल्याचं सर्वसामान्य जनतेला तसेच प्राधिकरणाच्या अधिकार्याना लगेच कळणे शक्य व्हावे म्हणून प्रत्येक होर्डिंग वर मंजुरीचा नंबर , दिनांक , वैधता कधीपर्यंत आहे हे लिहिणे बंधनकारक केले आहे . शिवाय मंजुरीच्या आदेशावरचा  क्यू आर कोड देखील ठळकपणे दिसू शकेल असा होर्डिंग वर छापणे बंधनकारक केले आहे , जेणेकरून मंजुरीच्या सत्यता सामान्य नागरिकाला देखील तपासता येऊ शकेल अशी रचना या धोरणात केली आहे . (PMRDA Policy)
आता पीएमआरडीए ने ह्या परवानग्या फास्ट ट्रॅकवर देण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे . लवकरच online मंजुरी साठी सोफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे.  पीएमआरडीएकडून या साठी राष्ट्रीय व राज्यमहामार्ग , प्रमुख जिल्हामार्ग यांसन्मुख होर्डिंग्स साठी रु 70 प्रति चौरस फूट प्रति वर्ष,  पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दींपासून दहा किमी पर्यंतच्या जमिनीसाठी रु 60 प्रति चौरस फूट प्रति वर्ष आणि पी एम आर डी ए च्या उर्वरित क्षेत्रासाठी रु 50 प्रति चौरस फूट प्रति वर्ष याप्रमाणे जाहिरात शुल्क आकारले जाणार आहे. त्याशिवाय होर्डिंग खालील जमिनीसाठी विकास शुल्क आकारले जाणार आहे. (Pune Hoarding)
——-
News Title | PMRDA Hoarding Policy | Unauthorized hoardings under the jurisdiction of PMRDA will be covered Hoarding policy of PMRDA announced

PMRDA Pune | पहिल्याच दिवशी २३४ सदनिकांचे ताबे पुर्ण

Categories
Breaking News social पुणे

PMRDA Pune | पहिल्याच दिवशी २३४ सदनिकांचे ताबे पुर्ण

| पेठ क्र. 12 गृहप्रकल्पातील सदनिकांची ताबा प्रक्रिया सुरु

PMRDA Pune | ​पेठ क्र. 12 गृहप्रकल्पातील EWS आणि LIG गटातील सदनिकांची ताबा प्रक्रीया ६ जून पासून सुरु करण्यात आली. यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पोर्टलवर (PMRDA Portal) ६ जून  ते १९ जून पर्यंतचा ताब्याचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार इमारतनिहाय ताबा देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली. अशी माहिती PMRDA प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  (PMRDA Pune)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे EWS सदनिकांसाठी 8 पथके आणि LIG सदनिकांसाठी 2 पथके तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये 3 कर्मचारी असून सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत 1 ते 6 मजल्यावरील आणि दुपारी 2.00 ते सायं. 5.00 या कालावधीत 7 ते 11 मजल्यावरील सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. (Pune PMRDA News)

​ताबा घेतेवेळी लाभार्थ्यांनी सदनिकेचे अंतिम वाटपपत्र व आधारकार्डची मूळ प्रत इ. कागदपत्रे सोबत घेऊन येणेचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ताबा हा सदनिकेच्या मूळ अर्जदारास देण्यात येणार आहे. मूळ अर्जदार हा सदनिकेचा ताबा घेण्यास काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यास सह अर्जदार यांच्या नावाने नोंदणीकृत Power of Attorney करुन दिली असल्यास सह अर्जदारास सदनिकेचा ताबा देता येईल. (Pune News)

​सुधारीत वेळापत्रकानुसार लाभार्थी हे सदनिकेचा ताबा घेण्यास हजर न राहील्यास अशा लाभार्थ्यांना दि. 19/06/2023 नंतर ताबा देण्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करणेत येईल. ​आज पहिल्या दिवशी EWS गटातील 182 आणि LIG गटातील 52 अशा एकूण 234 सदनिकांचे ताबे देण्याची प्रक्रीया सुरळीतपणे पार पडल्याची माहिती बन्सी गवळी, सह आयुक्त यांनी दिली.


News Title |PMRDA Pune | Possession of 234 flats completed on the first day | Peth No. 12 Possession process of flats in  housing projects started

PMRDA Pune News | पेठ क्र. 12 येथील गृहप्रकल्पातील LIG व EWS गटातील लाभार्थ्यांना  ६ जून  पासून सदनिकांचा  दिला जाणार ताबा

Categories
Breaking News social पुणे

PMRDA Pune News | पेठ क्र. 12 येथील गृहप्रकल्पातील LIG व EWS गटातील लाभार्थ्यांना  ६ जून  पासून सदनिकांचा  दिला जाणार ताबा

PMRDA Pune ​News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत (PMRDA Office) पेठ क्र. 12 येथील गृहप्रकल्पातील LIG व EWS गटातील सदनिकांची (Flats) ऑनलाईन लाॅटरी (Online Lottery) पद्धतीने विक्री करणेत आलेली आहे. गृहप्रकल्पातील LIG व EWS गटातील लाभार्थ्यांना  ६ जून  पासून सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे. अशी माहिती प्राधिकरण च्या वतीने देण्यात आली आहे. (PMRDA Pune News)

ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेचे सर्व हप्ते अदा केले आहेत आणि ज्या लाभार्थ्यांसमवेत आर्टीकल ऑफ अॅग्रीमेंट दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशा लाभार्थ्यांना इमारतनिहाय सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा दि. 06/06/2023 ते दि. 19/06/2023 या कालावधीत देण्याचे प्रस्तावीत आहे. त्याबाबतचे सुधारीत परिपत्रक व वेळापत्रक https://lottery.pmrda.gov.in/PMRDAPostLottery/applicantLandingPage

या संकेतस्थळावर (PMRDA Website) प्रसिद्ध करणेत आलेले आहे. तरी सदर सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे लाभार्थ्यांनी इमारतनिहाय सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा घेणे कामी उपस्थित राहावे. असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या वतीने कळवण्यात आले आहे. (Pune PMRDA)


News Title | PMRDA Pune News | Peth No. 12 The LIG and EWS beneficiaries of the housing project here will be given possession of the flats from June 6.