PMRDA Pune | पहिल्याच दिवशी २३४ सदनिकांचे ताबे पुर्ण

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

PMRDA Pune | पहिल्याच दिवशी २३४ सदनिकांचे ताबे पुर्ण

| पेठ क्र. 12 गृहप्रकल्पातील सदनिकांची ताबा प्रक्रिया सुरु

PMRDA Pune | ​पेठ क्र. 12 गृहप्रकल्पातील EWS आणि LIG गटातील सदनिकांची ताबा प्रक्रीया ६ जून पासून सुरु करण्यात आली. यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पोर्टलवर (PMRDA Portal) ६ जून  ते १९ जून पर्यंतचा ताब्याचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार इमारतनिहाय ताबा देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली. अशी माहिती PMRDA प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  (PMRDA Pune)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे EWS सदनिकांसाठी 8 पथके आणि LIG सदनिकांसाठी 2 पथके तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये 3 कर्मचारी असून सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत 1 ते 6 मजल्यावरील आणि दुपारी 2.00 ते सायं. 5.00 या कालावधीत 7 ते 11 मजल्यावरील सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. (Pune PMRDA News)

​ताबा घेतेवेळी लाभार्थ्यांनी सदनिकेचे अंतिम वाटपपत्र व आधारकार्डची मूळ प्रत इ. कागदपत्रे सोबत घेऊन येणेचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ताबा हा सदनिकेच्या मूळ अर्जदारास देण्यात येणार आहे. मूळ अर्जदार हा सदनिकेचा ताबा घेण्यास काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यास सह अर्जदार यांच्या नावाने नोंदणीकृत Power of Attorney करुन दिली असल्यास सह अर्जदारास सदनिकेचा ताबा देता येईल. (Pune News)

​सुधारीत वेळापत्रकानुसार लाभार्थी हे सदनिकेचा ताबा घेण्यास हजर न राहील्यास अशा लाभार्थ्यांना दि. 19/06/2023 नंतर ताबा देण्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करणेत येईल. ​आज पहिल्या दिवशी EWS गटातील 182 आणि LIG गटातील 52 अशा एकूण 234 सदनिकांचे ताबे देण्याची प्रक्रीया सुरळीतपणे पार पडल्याची माहिती बन्सी गवळी, सह आयुक्त यांनी दिली.


News Title |PMRDA Pune | Possession of 234 flats completed on the first day | Peth No. 12 Possession process of flats in  housing projects started